साईमत जळगाव प्रतिनिधी
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “यमन को नमन” सोनेरी यादे हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी केसीई सोसायटीचे सचिव ॲड. प्रमोद पाटील, सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, कोषाध्यक्ष डी.टी.पाटील, हरीश मिलवानी व प्राचार्य संजय भारंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची प्रास्ताविक शशिकांत वडोदकर यांनी केले.
ओ शाम कुछ अजीब थी, वो जब याद आये, जब दीप जले आना, नाम गुम जायेगा, इस मोड से जाते है ,अभी ना जाओ छोडकर ,चंदन सा बदन, जो वादा किया वो निभाना पडेगा अशी सुमधुर गीते यावेळी सादर करण्यात आले. या अभी गाण्यांना ऐकल्यानंतर त्यांना वन्स मोर अशी साथ घालत प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.
“यमन को नमन” कार्यक्रमाची संकल्पना शशिकांत वडोदकर, निवेदन शशिकांत वडोदकर व ईशा वडोदकर, नेपथ्य प्रा. मिलन भामरे आणि पियुष बडगुजर, गायक मयुरी हरीमकर, वैशाली शिरसाळे, कपिल शिंगाने, अक्षय गजभिये, रितेश भोई, साथसंगत कीबोर्ड गौरव काळंगे, ऑक्टोपॅड कैलास निकम ,बासरी लक्ष्मण राजपूत, तबला तेजस मराठे, ढोलक कृष्णा सोनवणे यांनी साथसंगत केला.
यावेळी प्राचार्य अशोक राणे, प्रा.के. बी. महाजन ,प्रा.विश्वनाथ झोपे साहेबराव भुकन, सुभाष तळेले, शरद डोंगरे तसेच विविध विद्याशाखेचे संचालक व प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.