युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिवस पकोडे तळून “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून केला साजरा

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील इच्छा देवी चौकात जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत तसेच जनतेच्या साक्षीने रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

मोदी सरकार विरोधात आक्रोश

पदवीधर युवकांना बेरोजगार करण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातील युवकांना दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन दिले आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला मोदी सरकार रोजगार देऊ शकले नाही.

जिल्हाभरात युवक काँग्रेसने केला राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा

भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या आदेशानुसार देशभरात याच पद्धतीने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
त्यां अनुषंगाने जिल्हा स्तरावर शहरातील इच्छा देवी चौकात देखील मोठ्या संख्येने युवा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पकोडा आंदोलन करण्यात आले. यावेळी युंवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष मुजीब पटेल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, तेनु सोनार, आशिष पाटील, नयन कोळी, निलेश पाटील, वसीम बापू, जमील शेख, टिपू बागवान, इसा व्यापारी, विजय चौधरी, राजू पाटील, भगवान सिंग पाटील, लोकमान शेख, ईबा बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here