साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी जळगाव च्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवर्य प. वि.पाटील प्राथ.विद्यामंदिर तसेच ए. टी.झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहर स्तरीय नाट्यछ्टा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन ओरिअन स्टेट बोर्ड शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर सूनकरी , डॉ.शमा सराफ, प्रसाद देसाई , मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे , मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते गणरायाच्या मुर्तीचे पुजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धा इयत्ता १ली ते थी पहिला गट , ५ वी ते ७ वी दुसरा गट , ८वी ते १० वी तिसरा गट अशा एकूण तीन गटामध्ये सदर स्पर्धा घेण्यात आली.त्यात सावित्रीबाई फुले , श्यामची आई ,हिरकणी , शेतकरी…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी संगीत महाविद्यालय तर्फे आयोजित गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेत काव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे यांनी बाजी मारली. स्पर्धेचे उदघाटन गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्राचार्य पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, परीक्षक धुळे येथील वीणा कमलाकर, आसावरी विंचुरकर उपस्थीत होते. तर सायंकाळी समारोप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजीस्ट) प्राचार्या पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी संगीतात रियाजाला महत्व असून यासाठी वेळेचे नियोजन करणे गरजेचे असते असे सांगत संगीतामूळे मानवाला जगण्याची नवी उमेद मिळत…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळातर्फे १० वी, १२वी, पदवी, पदविका व अन्य परीक्षेत उत्तीर्ण ५०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजुमामा भोळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, महापौर जयश्री महाजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले होते. व्यासपीठावर जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष महेश चौधरी, सचिव नारायण चौधरी, नगरसेविका मंगला चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, प्रल्हाद चौधरी, वामन चौधरी, अनिल चौधरी, भोलाआप्पा चौधरी, ॲड. महेंद्र चौधरी, अशोक चौधरी, शांताराम चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेशनाना चौधरी, सुरेशआण्णा चौधरी, संतोष चौधरी, विजय चौधरी, सतीश चौधरी, चंद्रकांत चौधरी,…
साईमत जळगाव प्रतिनिधी यंदा आकाशवाणी भागात बाप्पा खरेदीसाठी गणेशभक्त येत असून जलसा व्हेजचे सेल्फी पॉईंट आकर्षण ठरत आहे. भारतातच नाही तर जगभरात गणपती या देवतेची आराधना केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. तसेच सर्व विघ्नांचा हर्ता म्हणून देखील गणपतीकडे सर्व आशेच्या नजरेने पाहतात. आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी आपण आकाशवाणी भागात जाणार असाल तर जलसा व्हेज सेल्फी पॉईंटला नक्की भेट देऊन आपल्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवा. सोबतच तुमची तहानही येथे भागवली जाणार आहे, आणि हो सेल्फी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येणार आहे. ही व्यवस्था गेल्या ३ वर्षांपासून नियमित पणे केली जात आहे. जलसा व्हेज व्यावसायिक नव्हे सामाजिक भावनेतून ही सेवा…
साईमत जळगाव प्रतिनिधी आमदार राजुमामा भोळे कर्तृत्वशून्य आहेतच अन् त्यांची वृत्तीही संकुचित असल्याचे सांगत आज पत्रपरिषदेत महापालिकेतील विरोधी पक्षनेते व महापौर जयश्री महाजन यांचे पती सुनिल महाजन यांनी आमदार राजुमामा भोळे यांच्या आमदारकीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह लावत त्यांचा आडमूठपणा उजागर करणारे आरोप केल्यामुळे खळबळ उडाली आहे. महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते सुनिल महाजन पुढे म्हणाले की, स्वतःकाही करायचं नाही, फक्त कोणी काही करत असेल तिथे े आडकाठी निर्माण करायची ; हेच काम मनापापसून करणारे आ. राजूमामा भोळे हे जिल्ह्यातील अन्य आमदारांपैकी सर्वात कमी निधी आणणारे एकमेव आमदारठरले आहेत.सतत विकासकामात खोडा घालण्याचे काम आमदार राजूमामा भोळे यांनी केले आहे. जिल्ह्यात गिरीश…
साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव जिल्हा विविध योजना व उपक्रमांच्या अंमलबजावणीत कायम अग्रेसर राहिला आहे. ‘आयुष्यमान भव:’ या योजनेत ही जिल्ह्याचे काम राज्यात अग्रेसर ठरेल, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणारे ‘आयुष्यमान कार्ड’ चे घरोघरी वितरण करण्याचे काम प्रशासनाने करावे. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ‘आयुष्मान भव:’ अभियानांचा जळगाव जिल्ह्याचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, नागरिक यांच्यांशी फेसबुक लाईव्हद्वारे थेट संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झालेला असतांना राज्यातील दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकुल योजना नाही. त्यांच्यासाठी लवकरच स्वतंत्र घरकुल योजना राबविणार असल्याची ग्वाही ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली. महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांच्या अध्यक्षते खाली पार पडली असून त्या एकूण १७ ठराव सर्वानुमते पारित करण्यात आली. त्यात विशेष करून २५ डिसेंबरला सामूहिक विवाह, साखरपुडा मोठ्या प्रमाणात करणार नाही, साखरपुड्यात भावी नवरदेव ला सोन्याची अंगठी देण्यात येणार नाही, वधूकडे जास्त वराती घेऊन जाणार नाही, लग्नात डीजे वाजवला जाणार नाही, कोणीही व्यक्ती एकाच वेळी तीन तलाक देणार नाही, वधू वर मेळाव्याचे आयोजन, बिरादरीच्या भूखंडा वर शादी हॉल निर्माण करावा, प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमाची सुरुवात करावी, शैक्षणिक, वैद्यकीय व स्वयरोजगारासाठी बिरादी तर्फे आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्यात यावी असे एकूण १७ ठराव सर्व…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील इच्छा देवी चौकात जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत तसेच जनतेच्या साक्षीने रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. मोदी सरकार विरोधात आक्रोश पदवीधर युवकांना बेरोजगार करण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचा निषेध व्यक्त करण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातील युवकांना दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन दिले आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला…
साईमत जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्या अनुषंगानेभाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा अ.भा. क्षत्रिय नामदेव महासंघांचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी त्याच्या जिवनातील २५ व्यांदा म्हणजेच रौप्यमहोत्सवी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला. भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा अ.भा. क्षत्रिय नामदेव महासंघांचे राज्य संघटक मनोज भांडारकर यांनी इंडियन रेडक्रास सोसायटी येथे रविवारी सकाळी ११ वाजता रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला. यावेळी इंडियन रेडक्रास सोसायटीचे डॉ. अरविंद चौधरी, उज्वला वर्मा, उमाकांत शिंपी यांनी रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र…