साईमत जळगाव प्रतिनिधी
यंदा आकाशवाणी भागात बाप्पा खरेदीसाठी गणेशभक्त येत असून जलसा व्हेजचे सेल्फी पॉईंट आकर्षण ठरत आहे.
भारतातच नाही तर जगभरात गणपती या देवतेची आराधना केली जाते. गणपतीला बुद्धीची देवता मानले जाते. तसेच सर्व विघ्नांचा हर्ता म्हणून देखील गणपतीकडे सर्व आशेच्या नजरेने पाहतात. आपल्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी आपण आकाशवाणी भागात जाणार असाल तर जलसा व्हेज सेल्फी पॉईंटला नक्की भेट देऊन आपल्या आठवणी आयुष्यभर जपून ठेवा. सोबतच तुमची तहानही येथे भागवली जाणार आहे, आणि हो सेल्फी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने काढता येणार आहे. ही व्यवस्था गेल्या ३ वर्षांपासून नियमित पणे केली जात आहे. जलसा व्हेज व्यावसायिक नव्हे सामाजिक भावनेतून ही सेवा श्री गणेश भक्तांसाठी करत असून या सेल्फी पॉईंटला भेट देऊन आपला आनंद द्विगुणित करा.