Author: Saimat

साईमत धरणगाव प्रतिनिधी नामांकित फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यासाठी विमा काढण्याचे सांगून जीवनराम आनंदराम कुमावत (४२, रा. धरणगाव) यांची नऊ लाख १५ हजार ९८ रुपयामध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव येथील जीवनराम कुमावत हे व्यापारी असून त्याच्याशी मीनाक्षी अग्रवाल, आलिया, रुही शर्मा, सुधीर सक्सेना असे नाव सांगणाऱ्या चार अनोळखींनी संपर्क साधला. त्यांना एका नामांकित फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. कर्जासाठी त्यांना याच कंपनीसह व अन्य कंपनींचा विमा काढण्यास भाग पाडले. त्यासाठी २७ मार्च…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून श्रींच्या घरगुती मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन कसे करावे याचे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी रसायनशास्त्र विषय इन्चार्ज प्रा.राजश्री महाजन यांनी श्रींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्ती नदी-तलावात विसर्जित करून जलस्त्रोत दूषित न करता, दुर्मिळ जैव विविधतेच्या अस्तित्वास हानी न पोहचविता अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणामध्ये सदर मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मूर्तींचे विघटन कसे होते ते दाखविले. या प्रयोगात तयार होणाऱ्या अमोनियम सल्फेटच्या द्रावणाचा उत्तम खत म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. याद्वारे नदी व तलावातील पाण्याचे होणारे प्रदूषण टाळता येऊ शकते. अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी माध्यम स्वातंत्र्याशिवाय लोकशाहीला काहीही अर्थ नाही. सशक्त्त लोकशाहीसाठी पत्रकार आणि पत्रकारिता आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून जळगाव येथे ऊर्दू माध्यमाच्या पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले, त्यात ते बोलत होते. संमेलनाचे उदघाटन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ऊर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मुफ्ती मोहम्मद हारून नदवी होते. जळगावमधील ईकरा महाविद्यायाच्या सभागृहात पार पडलेल्या या अधिवेशनास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, मुजतबा फारुकी, विनोद बोरे,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वच्छतेचा पंधरवडा अभियान अंतर्गत “स्वच्छ्ता श्रमदान उपक्रम” दि. ०१ ऑक्टोबर रोजी लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून या अभियानात जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे. स्वच्छतेचा पंधरवडा अभियान अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत स्वच्छ्ता ही सेवा व एक तारीख एक घंटा ” “स्वच्छ्ता श्रमदान उपक्रम” जळगाव महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध खाजगी सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने दि.२६ मंगळवार रोजी आयुक्त…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र शासनाचा ” माझी माती माझा देश ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे क्षेत्रा अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” काढण्यात आली. १ सप्टेंबर पासून अमृत कलश यात्रेची सुरुवात जळगाव महानगरपालिका हद्दीत करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत देशातील प्रत्येक गावातील घरांमधून या अमृत कलशात माती संकलित करण्यात येणार आहे. या संकलित झालेल्या मातीमधून शहिदांचे स्मरणार्थ दिल्ली येथे अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे क्षेत्रा अंतर्गत “…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नोंदणी कृत बिल्डींग पेन्टर कामगारांना वाढती महागाई लक्षात घेता १५ हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी हिन्दू मुस्लिम एकता बिल्डींग पेन्टर वेलफेअर असोशिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ व नोंदणी कृत बिल्डींग पेन्टर कामगारांना २०१९ मध्ये दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रूपये मिळाले होते. मात्र त्यानंतर दिवाळी बोनस मिळाला नाही. त्यासाठी नोंदणीकृत पेन्टर बांधवांना वाढती महागाई लक्षात घेता १५ हजार रुपये बोनस देण्यात यावा असे म्हटले आहे. यावेळी हिन्दु मुस्लीम एकता बिल्डींग पेन्टर वेलफेअर असोशियशन चे अध्यक्ष- इस्माईल भाई खान, जिल्हा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्ह्यात सर्पदंशामुळे मागील चार महिन्यात 23 जणांचा मृत्यु झाला आहे. तर 13 जण किरकोळ जखमी आहेत. तेव्हा सर्पदंशावर वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. सर्पदंश झाल्यावर तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे शक्य नसते व ती मिळण्यापूर्वी केलेले उपचार म्हणजेच प्रथमोपचार होय. आतापर्यंत बऱ्याच सर्पदंशाच्या प्रकरणांत या प्रथमोपचारामुळेच किती तरी लोकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यामुळे सावध राहणे गरजेचे आहे. सर्पदंशावर वैद्यकीय पथकांच्या मदतीने उपचार करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जळगाव जिल्ह्यात वन्यजीव संरक्षण संस्था सर्प मानव आणि पर्यावरण या विषयावर शून्य सर्पदंश अभियान राबवित आहे. यातून जनजागृती, सर्पदंश, प्रथमोपचार, आणि अंधश्रध्दा निर्मुलन यावर कार्य करत आहेत. तर संस्थेचे…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी प्रधानमंत्री यांच्या दृढ संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. स्वच्छ भारत दिवस 2023 च्या निमित्ताने दि.15 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता ही सेवा (SHS) “कचरामुक्त भारत” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्वच्छता संवाद कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीव्‍दारे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाणी…

Read More

साईमत जळगाव जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित शहरातील कांताई सभागृहात झालेल्या १४ व्या ज्युनिअर‎ रोल बॉल स्पर्धेत मुलींच्या गटात जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात‎ प्रथम‎ क्रमांक पटकावला. विजयी संघामध्ये‎ गीत जैन, विधी सोनी, पेहेल गद्या,संजम चाबडा, तान्या चतरानी, लबडी पांगरिया, तस्नीम बदामिया या‎ खेळाडूंचा समावेश होता. विजयी ठरलेल्या विद्यार्थिनीचा जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले. त्या म्हणाल्या की, या संघास जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक मंडळ, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यासह सर्व पालक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या यशामागे…

Read More

साईमत जळगाव जळगाव गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या… असे म्हणत डीजे समवेत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली असून या मिरवणूकी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच भावी खासदार डॉ.केतकी पाटील यांच्यासह पाटील कुटूबियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पाच दिवसांचा गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी महाविद्यालय परिसरात आकर्षक सजावट करुन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन दाखविणारा देखावा देखील यावर्षीचे आकर्षण ठरला. शनिवार दिनांक २३ सप्टेंबर रोजी पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला वाजत-गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. मिरवणूकीत संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील,…

Read More