Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी पारंपारिक आणि आधुनिक शिक्षण पध्दत यात नवनविन संकल्पना आल्यामुळे आशादायी व स्थिर फरक निर्माण झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करतांना अत्यंत खडतर मार्गाने प्रवास करावा लागतो. शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमानेच यशस्वी डॉक्टर घडत असल्याचे प्रतिपादन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डिन डॉ. एन.एस. आर्विकर यांनी केले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अ‍ॅनाटॉमी विभागातर्फे एमबीबीएसच्या प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व्हाइट कोट समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. राज्यात प्रथमच डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून अशा प्रकारचा समारंभ घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. समारंभाच्या सुरूवातीला डिन एन.एस.आर्विकर यांच्या हस्ते आरोग्य देवता धन्वंतरीचे पूजन करून दीपप्रज्वलन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संघातर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष मनपा क्षेत्र शालेय खो – खो स्पर्धेत सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालयाने आर. आर. विद्यालयावर चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय संपादन करून नाशिक विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. विद्यालयातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशासाठी संस्था अध्यक्ष माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार लताताई सोनवणे, संचालिका डॉ. अमृता सोनवणे, मुख्याध्यापक आर.पी.खोडपे, गुलाबराव पाटील, शिक्षक पालक संघाच्या छाया फिरके, सुनीता खोंडे आदींनी अभिनंदन करत विभागीय खो-खो स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी संघास विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अनिल माकडे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उर्वरित जिल्हा १४,१७,१९वर्ष मुले व मुलीच्या आट्यापाट्या क्रीडा स्पर्धेमध्ये डोणगाव, धानोरा, अमळनेर, कुरवेल येथील संघानी अंतिम सामन्यात विजय मिळवून प्रथमच विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. धानोरा येथील झि. तो. म. माध्यमिक विद्यालयाने १७ वर्षे मुले, १४,१९ वर्षे मुलींच्या गटात यश संपादित केले आहे. इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल डोणगाव येथील शाळेने १४ वर्षे वयोगटात अटीतटीच्या अतिंम सामन्यात बारी समाज माध्यमिक विद्यालयावर विजय मिळविला व विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली . १९ वर्षे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीड़ा संकुल येथे पार पडलेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाच्या बळावर विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या विशाल ज्ञानेश्वर पवार व सुमेध सुशांत पाटिल या दोघा विद्यार्थ्यांची विभागीय निवड चाचणी स्पर्धेत निवड होवून पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धेसाठी राज्य व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडुचे शालेय व्यवस्थापन मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटिल , ज्येष्ठ शिक्षक जगदीश चौधरी, विभाग प्रमुख राजेंद्र पाटिल, सूर्यकांत पाटिल, सर्व क्रीड़ा शिक्षक यांनी अभिनंदन केले. दोघा विद्यार्थ्यांना राष्ट्रिय व्हॉलीबॉल प्रशिक्षक क्षितिज सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

साईमत भुसावळ प्रतिनिधी माणुसकीच्या बिजाला दातृत्वाचे धुमारे फटतात तेंव्हा… दोन घासांच्या रंगी,‘ अवघा रंग एक कसा होतो; याची शब्दश: प्रचिती दरवर्षीप्रमाणे यंदाही भुसावळात आली. निमित्त होते, गणेश विसर्जनाच्या दिवशी साईभक्त पिंटू कोठारी यांच्याकडून भाविकांसाठी आयोजित महाभंडाऱ्याचे. अक्षरश: कुणीही या आणि जेवून जा, या शब्दांची प्रचिती देणारा हा महाभंडारा यंदाही भुसावळकरांनी मर्मबंधातल्या ठेवीसारखा भक्तीपूर्ण अंत:करणात आराधनेने ओथंबून राहावा, असा जपून ठेवला आहे. भुसावळच्या साई मंदिरांच्या विश्वस्तांपैकी एक आणि प्रथितयश व्यापारी पिंटू कोठारी यांची साईभक्ती सर्वश्रूत आहेच. माणुसकी म्हणून अगदी कुणी अनोळखी आला तरी त्याच्यासाठी आपल्या मनाचा हळवा कोपरा कायम मोकळा ठेवणारा, आहे त्या परिस्थितीत अन्‌‍‍ शक्य त्या मदतीला नेहमी उभा राहणारा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, आ. राजू मामा भोळे यांच्या हस्ते निर्माल्य संकलनाला सुरुवात झाली. शहरातुन ३२ ट्रॅक्टर, २ डंपर , ८ घंटागाड्याच्या मदतीने १११२ श्री सदस्यांनी ७६ टन निर्माल्य संकलन करण्यात आले, मन्यारखेडा परिसरातून ६ ट्रॅक्टरमधून ७६ श्री सदस्यांनी १२ टन निर्माल्य संकलन केले, सावखेडा पिंप्राळा परिसरातून १ ट्रॅक्टरच्या मदतीने ३५ श्री सदस्यांनी २.५ टन निर्माल्य संकलन केले. स्वयंसेवक, गणेशभक्त व श्री सेवकांमार्फत निर्माल्य संकलन केले जात होते. मेहरुण तलावातील गणेश घाट, सेंट टेरेसा स्कूल, शिवाजी उद्यान, सागर पार्क, चंदूअण्णानगर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधी कॉलनी, नेरी नाका आदी ठिकाणी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गणपती विसर्जनासाठी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी बंधु भगिनी यांना जळगाव पीपल्स बँकेच्या वतीने त्यांच्या ड्युटीच्या जागेवर जाऊन सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे जेवणाचे पॅकेटस्‌ देण्यात आले. सदर पॅकेटमध्ये पराठे, छोले भाजी, व्हेज बिरयानी, गुलाबजाम, समोसा, सलाद व बिसलेरी पाणी बॉटल असे स्वादिष्ट जेवण हवाबंद डब्यामध्ये पॅकींग करुन देण्यात आले. प्रत्येक नागरीकांस लाभणारी सुरक्षितता व निश्चिंतता यामागे पोलीस बंधु-भगिनी कार्य करीत असतात त्यामुळे आपण सर्व नागरीक प्रत्येक सण व उत्सव शांततेने व उत्साहाने साजरा करीत असतो. या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक उत्तरदायित्व आणि पोलीसांप्रती असलेला आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने दि जळगाव पीपल्स को-ऑप…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी मारुती पेठेतील युवा मारुती पेठ मित्र मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वधर्मसमभाव विषयावर आधारित आरास सादर केली आरासचे सादरी करण मानसी पाटील, केशव पाटील, यश सोनार, ध्रुव वाणी, पियुष कासार, भावेश शिंपी यांनी केले. यंदा मंडळाचे ४८ वे वर्ष होते सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू असलेल्या या मंडळाने मागील कालखंडात देखील ज्वलंत विषयावरील तसेच विविध प्रकारचे समाजप्रबोधनात्मक सजीव आरास सादर करून आजपर्यंत सामाजिक एक रुपयाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे. बाप्पाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या तालावर बालगोपालांसह ज्येष्ठ तसेच मुली व महिलांनी देखील लेझीम खेळूनगणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी ८ वर्षाचा चिमुकला कृष्णा सोनवणे याने एकाच…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ईद ए मिलादुन्नबी निमित्त गुरुवार २८ सप्टेंबर रोजी जिल्हा मुस्लिम मणियार तसेच हिटलर डेनिम संस्थेच्या सहकार्याने शहरात विविध ठिकाणी ईदच्या शिदोरीचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कांताई सभागृह, शिरसोली नाका झोपडपट्टी, गणेश मंडळाचे निर्माल्य जमा करणारे कार्यकर्ते व बंदोबस्त करणारे पोलीस बांधवांना शिदोरीसह पाण्याची बॉटल देण्यात आली. ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची जयंती या निमित्त मन्यार बीरादरीने हा स्तुत्य उपक्रम राबविला. अंतिम प्रेषित हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ईश्वराने त्यांना या भूतलावर पाठवले होते व त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे. जगाला दाखवून दिल्याने त्यांच्या या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे अनाठाई खर्च किंवा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जमाबंदी आयुक्तालयाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तेथेच करता येईल. सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी ई- हक्क ही नवीन ऑनलाईन आज्ञावली वापर करता येणार आहे. अर्जदार संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतो आणि तलाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात. वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव…

Read More