साईमत जळगाव प्रतिनिधी
स्वच्छतेचा पंधरवडा अभियान अंतर्गत “स्वच्छ्ता श्रमदान उपक्रम” दि. ०१ ऑक्टोबर रोजी लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून या अभियानात जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे.
स्वच्छतेचा पंधरवडा अभियान अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत स्वच्छ्ता ही सेवा व एक तारीख एक घंटा ” “स्वच्छ्ता श्रमदान उपक्रम” जळगाव महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध खाजगी सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने दि.२६ मंगळवार रोजी आयुक्त यांचे कार्यालयीन दालनाचे सभागृहात बैठक घेण्यात आली.
यावेळी बैठकीस सह आयुक्त अश्विनी गायकवाड, सह आयुक्त उदय पाटील, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक उल्हास इंगळे, जितेंद्र किरंगे, नंदू साळुंखे , नागेश लोखंडे, आरोग्य युनिट प्रमुख आदीसह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.