मनपा प्रभाग ४ मध्ये निघाली “अमृत कलश यात्रा”

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र शासनाचा ” माझी माती माझा देश ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे क्षेत्रा अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” काढण्यात आली.

१ सप्टेंबर पासून अमृत कलश यात्रेची सुरुवात जळगाव महानगरपालिका हद्दीत करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत देशातील प्रत्येक गावातील घरांमधून या अमृत कलशात माती संकलित करण्यात येणार आहे. या संकलित झालेल्या मातीमधून शहिदांचे स्मरणार्थ दिल्ली येथे अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे.

त्यानुसार जळगाव मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे क्षेत्रा अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” काढण्यात आली. यामध्ये विविध नागरिक, सामाजिक व राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान, “अमृत कलश ” यात्रेत शहरातील नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन या अमृत कलशामध्ये माती संकलित करावी, या अभियानात नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे प्रशासक तथा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here