बिल्डींग पेन्टर कामगारांना बोनस द्या

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

नोंदणी कृत बिल्डींग पेन्टर कामगारांना वाढती महागाई लक्षात घेता १५ हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी हिन्दू मुस्लिम एकता बिल्डींग पेन्टर वेलफेअर असोशिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ व नोंदणी कृत बिल्डींग पेन्टर कामगारांना २०१९ मध्ये दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रूपये मिळाले होते. मात्र त्यानंतर दिवाळी बोनस मिळाला नाही. त्यासाठी नोंदणीकृत पेन्टर बांधवांना वाढती महागाई लक्षात घेता १५ हजार रुपये बोनस देण्यात यावा असे म्हटले आहे.

यावेळी हिन्दु मुस्लीम एकता बिल्डींग पेन्टर वेलफेअर असोशियशन चे अध्यक्ष- इस्माईल भाई खान, जिल्हा सचिव अल्ताफ भाई खान, जिल्हा मार्गदर्शक दगडू दादा, इकबाल शेख, अनवर शेख, विजय फुलमाळी, सलिम पेन्टर, कलिम मीर्जा, राजेश शिव कुमार, तौफीक पेन्टर, कलिम पेन्टर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here