साईमत जळगाव प्रतिनिधी गणपती विसर्जनासाठी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी बंधु भगिनी यांना जळगाव पीपल्स बँकेच्या वतीने त्यांच्या ड्युटीच्या जागेवर जाऊन सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे जेवणाचे पॅकेटस् देण्यात आले. सदर पॅकेटमध्ये पराठे, छोले भाजी, व्हेज बिरयानी, गुलाबजाम, समोसा, सलाद व बिसलेरी पाणी बॉटल असे स्वादिष्ट जेवण हवाबंद डब्यामध्ये पॅकींग करुन देण्यात आले. प्रत्येक नागरीकांस लाभणारी सुरक्षितता व निश्चिंतता यामागे पोलीस बंधु-भगिनी कार्य करीत असतात त्यामुळे आपण सर्व नागरीक प्रत्येक सण व उत्सव शांततेने व उत्साहाने साजरा करीत असतो. या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक उत्तरदायित्व आणि पोलीसांप्रती असलेला आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने दि जळगाव पीपल्स को-ऑप…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी मारुती पेठेतील युवा मारुती पेठ मित्र मंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वधर्मसमभाव विषयावर आधारित आरास सादर केली आरासचे सादरी करण मानसी पाटील, केशव पाटील, यश सोनार, ध्रुव वाणी, पियुष कासार, भावेश शिंपी यांनी केले. यंदा मंडळाचे ४८ वे वर्ष होते सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू असलेल्या या मंडळाने मागील कालखंडात देखील ज्वलंत विषयावरील तसेच विविध प्रकारचे समाजप्रबोधनात्मक सजीव आरास सादर करून आजपर्यंत सामाजिक एक रुपयाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला आहे. बाप्पाला निरोप देताना विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांच्या तालावर बालगोपालांसह ज्येष्ठ तसेच मुली व महिलांनी देखील लेझीम खेळूनगणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी ८ वर्षाचा चिमुकला कृष्णा सोनवणे याने एकाच…
साईमत जळगाव प्रतिनिधी ईद ए मिलादुन्नबी निमित्त गुरुवार २८ सप्टेंबर रोजी जिल्हा मुस्लिम मणियार तसेच हिटलर डेनिम संस्थेच्या सहकार्याने शहरात विविध ठिकाणी ईदच्या शिदोरीचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालय, कांताई सभागृह, शिरसोली नाका झोपडपट्टी, गणेश मंडळाचे निर्माल्य जमा करणारे कार्यकर्ते व बंदोबस्त करणारे पोलीस बांधवांना शिदोरीसह पाण्याची बॉटल देण्यात आली. ईद-ए-मिलादुन्नबी म्हणजे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची जयंती या निमित्त मन्यार बीरादरीने हा स्तुत्य उपक्रम राबविला. अंतिम प्रेषित हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ईश्वराने त्यांना या भूतलावर पाठवले होते व त्यांनी आपले जीवन कसे जगावे हे. जगाला दाखवून दिल्याने त्यांच्या या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचे अनाठाई खर्च किंवा…
साईमत जळगाव प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर वारसाची नोंद, मयताचे नाव कमी करणे, बँकेचा कर्जाचा बोजा चढविणे व उतरवणे यांसह इतर महत्त्वाच्या कामासाठी अर्ज दाखल करण्यासाठी जमाबंदी आयुक्तालयाने ‘ई-हक्क’ प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. एवढेच नव्हे तर दाखल अर्जामध्ये त्रुटी असल्यास त्या तलाठ्याकडून या पोर्टलवर अर्जदाराच्या लॉगिनमध्ये कळविण्यात येतील आणि त्या त्रुटींची पूर्तताही तेथेच करता येईल. सध्या फेरफार नोंदीसाठी तलाठ्यांकडे अर्ज दाखल करावा लागतो. परंतु आता तलाठ्याकडे न जाता अर्ज दाखल करण्यासाठी ई- हक्क ही नवीन ऑनलाईन आज्ञावली वापर करता येणार आहे. अर्जदार संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करू शकतो आणि तलाठी अर्ज मंजुरीची प्रक्रिया करू शकतात. वारसाची नोंद करण्यासाठी किंवा मयताचे नाव…
साईमत धरणगाव प्रतिनिधी नामांकित फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यासाठी विमा काढण्याचे सांगून जीवनराम आनंदराम कुमावत (४२, रा. धरणगाव) यांची नऊ लाख १५ हजार ९८ रुपयामध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव येथील जीवनराम कुमावत हे व्यापारी असून त्याच्याशी मीनाक्षी अग्रवाल, आलिया, रुही शर्मा, सुधीर सक्सेना असे नाव सांगणाऱ्या चार अनोळखींनी संपर्क साधला. त्यांना एका नामांकित फायनान्स कंपनीचे नाव सांगून त्या कंपनीकडून तुम्हाला कर्ज मिळवून देतो, असे आमिष दाखवित त्यांचा विश्वास संपादन केला. कर्जासाठी त्यांना याच कंपनीसह व अन्य कंपनींचा विमा काढण्यास भाग पाडले. त्यासाठी २७ मार्च…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाकडून श्रींच्या घरगुती मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन कसे करावे याचे विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. याप्रसंगी रसायनशास्त्र विषय इन्चार्ज प्रा.राजश्री महाजन यांनी श्रींच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेश मूर्ती नदी-तलावात विसर्जित करून जलस्त्रोत दूषित न करता, दुर्मिळ जैव विविधतेच्या अस्तित्वास हानी न पोहचविता अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणामध्ये सदर मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्यासाठी त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे मूर्तींचे विघटन कसे होते ते दाखविले. या प्रयोगात तयार होणाऱ्या अमोनियम सल्फेटच्या द्रावणाचा उत्तम खत म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. याद्वारे नदी व तलावातील पाण्याचे होणारे प्रदूषण टाळता येऊ शकते. अशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत…
साईमत जळगाव प्रतिनिधी माध्यम स्वातंत्र्याशिवाय लोकशाहीला काहीही अर्थ नाही. सशक्त्त लोकशाहीसाठी पत्रकार आणि पत्रकारिता आवश्यक आहे, असे मत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून जळगाव येथे ऊर्दू माध्यमाच्या पत्रकारांचे राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले, त्यात ते बोलत होते. संमेलनाचे उदघाटन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलित करून करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ऊर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार मुफ्ती मोहम्मद हारून नदवी होते. जळगावमधील ईकरा महाविद्यायाच्या सभागृहात पार पडलेल्या या अधिवेशनास ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, मुजतबा फारुकी, विनोद बोरे,…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वच्छतेचा पंधरवडा अभियान अंतर्गत “स्वच्छ्ता श्रमदान उपक्रम” दि. ०१ ऑक्टोबर रोजी लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून या अभियानात जळगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपा प्रशासनाच्या वतीने केले आहे. स्वच्छतेचा पंधरवडा अभियान अंतर्गत दि. ०१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत स्वच्छ्ता ही सेवा व एक तारीख एक घंटा ” “स्वच्छ्ता श्रमदान उपक्रम” जळगाव महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध खाजगी सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व लोकसहभागातून शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने दि.२६ मंगळवार रोजी आयुक्त…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र शासनाचा ” माझी माती माझा देश ” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यानुसार मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे क्षेत्रा अंतर्गत ” अमृत कलश यात्रा ” काढण्यात आली. १ सप्टेंबर पासून अमृत कलश यात्रेची सुरुवात जळगाव महानगरपालिका हद्दीत करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत देशातील प्रत्येक गावातील घरांमधून या अमृत कलशात माती संकलित करण्यात येणार आहे. या संकलित झालेल्या मातीमधून शहिदांचे स्मरणार्थ दिल्ली येथे अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव मनपाच्या प्रभाग समिती क्रमांक ४ चे क्षेत्रा अंतर्गत “…
साईमत जळगाव प्रतिनिधी नोंदणी कृत बिल्डींग पेन्टर कामगारांना वाढती महागाई लक्षात घेता १५ हजार रुपये बोनस मिळावा अशी मागणी हिन्दू मुस्लिम एकता बिल्डींग पेन्टर वेलफेअर असोशिएशनच्या वतीने निवेदनाद्वारे केली आहे. या आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ व नोंदणी कृत बिल्डींग पेन्टर कामगारांना २०१९ मध्ये दिवाळी बोनस म्हणून तीन हजार रूपये मिळाले होते. मात्र त्यानंतर दिवाळी बोनस मिळाला नाही. त्यासाठी नोंदणीकृत पेन्टर बांधवांना वाढती महागाई लक्षात घेता १५ हजार रुपये बोनस देण्यात यावा असे म्हटले आहे. यावेळी हिन्दु मुस्लीम एकता बिल्डींग पेन्टर वेलफेअर असोशियशन चे अध्यक्ष- इस्माईल भाई खान, जिल्हा…