विसर्जनासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना फुड पॅकेटचे वितरण

0
11

साईमत जळगाव प्रतिनिधी

गणपती विसर्जनासाठी ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी बंधु भगिनी यांना जळगाव पीपल्स बँकेच्या वतीने त्यांच्या ड्युटीच्या जागेवर जाऊन सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे जेवणाचे पॅकेटस्‌ देण्यात आले. सदर पॅकेटमध्ये पराठे, छोले भाजी, व्हेज बिरयानी, गुलाबजाम, समोसा, सलाद व बिसलेरी पाणी बॉटल असे स्वादिष्ट जेवण हवाबंद डब्यामध्ये पॅकींग करुन देण्यात आले.

प्रत्येक नागरीकांस लाभणारी सुरक्षितता व निश्चिंतता यामागे पोलीस बंधु-भगिनी कार्य करीत असतात त्यामुळे आपण सर्व नागरीक प्रत्येक सण व उत्सव शांततेने व उत्साहाने साजरा करीत असतो. या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक उत्तरदायित्व आणि पोलीसांप्रती असलेला आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने दि जळगाव पीपल्स को-ऑप बँक अनंत चतुर्दशी गणेश विसर्जना दिवशी डयुटीवर असलेल्या पोलीस बंधु भगिनींसाठी जेवणाचे वाटप करीत असते. 2013 पासून हा उपक्रम अव्याहतपणे आयोजित केला जातो.

फुड पॅकेट वाटप उपक्रमाचा आरंभ शहर पोलीस स्टेशन जवळ पोलीस अधिक्षक मेघनाथन राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, चेअरमन-व्यवस्थापन मंडळ व संचालक भालचंद्र पाटील, तसेच बँकेचे संचालक मंडळ यांच्या हस्ते पोलीस प्रातिनिधीक स्वरुपात फुड पॅकेट देउन करण्यात आली.

प्रसंगी बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, चेअरमन-व्यवस्थापन मंडळ भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन डॉ.प्रकाश कोठारी, संचालक डॉ. सी.बी.चौधरी, सुनिल पाटील, प्रवीण खडके, राजेश परमार, ज्ञानेश्वर मोराणकर, व्यवस्थापन मंडळ सदस्य भुषण चौधरी, निर्णय चौधरी, एमडी व सीइओ रोहित भुजबळ उपस्थित होते.

जळगाव शहर पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, महेश महाले, निलेश पाटील, शनि पेठ पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, शहर वाहतुक शाखा यांचे सोबत बँकेचे कर्मचारी सुधीर भलवतकर, शिवकुमार शर्मा, अनिल वाणी, गोविंद खांदे, दिपक खडसे, गणेश राणे , गणेश खांडरे, सतीश पाटील, रविंद्र कोष्टी, वैभव नाईक, रूपेश वाणी, राजेंद्र जोशी, भरत भंगाळे, पवन भावसार, हेमंत जाधव, गोपाळ सुतार, अतुल भंगाळे, शांताराम भिल, किशोर कलाल, संतोष ठाकुर, अभय गयावाले, देवीदास पाटील, दिपक साळी, सचिन चौधरी, भुषण पाटील, मनोज बारी, मोहन पाटील यांनी वाटपाचे काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here