Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी गोवा येथे मनोहर पर्रीकर इनडोर स्टेडियम ३७ व्या नॅशनल गेम्स् स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यात बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी ५×५ या क्रीडा प्रकारात जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर), धनदाई माता महाविद्यालय अमळनेर ची विद्यार्थीनी मनिषा हटकर तसेच ३×३ या क्रीडा प्रकारात मुळजी जेठा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल हटकर अशा तिघांची या खेळासाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वीही यांची विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती. वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निपूण‌ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात १० ते २० ऑक्टोंबर या कालावधीत इयत्ता १ ली ते ७ वीच्या मुलां-मुलींसाठी ‘दहा दिवस गणितासाठी’ उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील १ हजार ७११ शाळांमधील १ लाख ७४ हजार ४४१ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यात कमालीचा यशस्वी झाला असून विद्यार्थ्यांच्या पायाभूत आकलन क्षमतेत २० टक्के वाढ झाली आहे. पूर्वीपेक्षा ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात प्राविण्य मिळवले आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे अंकगणित कौशल्य वृध्दींगत व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या शिक्षण…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा झाला. त्यात विविध विद्याशाखांच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला व आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.के. पटनाईक, उपप्राचार्य डॉ. एस. बी. पवार, कार्यक्रमाचे संयोजक प्रा अमोल वाणी, सूत्रसंचालक प्रा एन एम काझी उपस्थित होते. २००३ साली इलेक्ट्रॉनिक्स विषयात महाविद्यालयातून पदवी घेतलेले व सध्या लंडन येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ संचालक असलेले आशिषकुमार पांडे हे मुख्य अतिथी म्हणून व २००५ साली महाविद्यालयातील संगणक विषयातून उत्तीर्ण झालेले व आता सिडनी येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर कार्यरत ज्वालीन सोनावाला हे अनुक्रमे इंग्लंड…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी महासंघ जळगाव तालुका शाखेच्या वतीने तालुक्यातील सर्व शाळा संपर्क साधण्याच्या हेतूने विद्यार्थी दैवत मानून विद्यार्थींमधिल सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यासाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेसाठी वर्षा आबासाहेब अहिरराव व सुमन दोधू लोखंडे यांचे दातृत्व लाभले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि म्हणून जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खलिल शेख, शालेय पोषण अधीक्षक विजय पवार, संजय खंबायत, वर्षा अहिरराव, अशोक मदाने ,राज्य सहसचिव टि. के. पाटील, राज्य सदस्य देवेन्द्र चौधरी, राज्य शिक्षकेतर प्रतिंनिधी सोमनाथ लोखंडे, सविता चौधरी, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी अखतरुद्दीन काझी , शाम ठाकरे , सुनील पवार, गोविंदा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील श्री महर्षि वाल्मिक क्रीडा व शिक्षण प्रसारक संस्था आयोजित आद्यकवी श्री महर्षि वाल्मिक जयंती निमित्त आंतरशालेय खो-खो स्पर्धेस वाल्मिक नगर मधील नवीन बालविकास विद्या मंदिराच्या प्रांगणात उत्साहात सुरूवात झाली. स्पर्धेचे उदघाटन आ. राजुमामा भोळे यांनी आद्यकवी श्री महर्षि वाल्मिक यांच्या पुतळ्याचे पूजन करून श्रीफळ वाढवून केले. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक सचिव प्रभाकरआप्पा सोनवणे, सदस्य भरत सपकाळे, माजी खेळाडू निलेश(आबा) तायडे, भाऊसाहेब राऊत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे सचिव राहुल पोळ, एन. डी. सोनवणे, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव, जळगाव जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव प्रशांत जगताप, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सहसचिव नितिन…

Read More

साईमत अमळनेर प्रतिनिधी लहान मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी नृत्य, नाट्य व संगीताच्या माध्यमातून सातत्याने कार्य करणाऱ्या नाट्यरंग थिएटर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालनाट्याविषयी आवड जोपासावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, ‘बालनाट्य प्रेक्षकांपर्यंत’ या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये बालप्रेक्षकांसाठी बालनाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमातंर्गत अमळनेर येथील अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी विद्यालयात गाठोड्याचं गुपित या बालनाट्याचे चार प्रयोग सादर झाले. एकूण १५०० विद्यार्थ्यांनी बालनाट्याचा आनंद लुटला. गाठोड्याचं गुपित या बालनाट्याची निर्मिती नाट्यरंग थिएटर्स जळगाव यांची असून अमोल ठाकूर यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. हे बालनाट्य संस्कारक्षम असून गाठोड्यात लपलेल्या यंत्राद्वारे दोन विद्यार्थी जगण्यातील संस्कारांचे मूल्य बालप्रेक्षकांना समजावून सांगतात. अभ्यासू,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून नाक-कान-घसा विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहे. विशेषत: अभ्यासक्रमावर आधारीत हे उपक्रम असून या विभागात रूग्णसेवा प्रभावी क्षमतेने वाढली आहे. नाक-कान-घसा विभागातर्फे आयोजित प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यसाठी समर्पित भावना ठेवा असा सल्ला गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या नाक-कान-घसा विभागातर्फे क्वीज बी-२०२३ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.एस. आर्विकर, नाक-कान-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. पंकजा बेंडाळे, डॉ. तन्वी पाटील, डॉ. तृप्ती भट, डॉ. जान्हवी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीड़ा संकुल नागपुर येथे १७ वर्षाखालील मुले /मुली शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने अटितटीच्या अंतिम सामन्यात कोल्हापुर विभागाचा पराभव करुन स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले. संघातील सृष्टि बागुल, जानवी पाटील, चैताली पाटील यांची उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्र संघात निवड होवून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. विजयी संघाचे अभिनंदन विवेकानंद प्रतिष्ठान व्यवस्थापन मंडळ तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील, विभाग प्रमुख सूर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील यांच्यातर्फे करण्यात आले. या स्पर्धेसाठी विजयी संघाला शाळेचे क्रीडा शिक्षक संजय यादव, क्षितिज सोनवणे, जितेंद्र पाटील, सिद्धार्थ शिंदे, ललित लोहार, प्रशिक्षक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी साने गुरुजी हे मुला-फुलांचे कवी होते. लहान मुलांमध्ये ते लहान होऊन मिसळून जात. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारत होते. त्यांना गोष्टी सांगत होते. अशा मातृहृदयी गुरुजींच्या नावाने सुरु असलेली कथामाला गेली अनेक वर्षे अव्याहत सुरु ठेवणाऱ्या कै.सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ शाळेला आणि कथामाला संयोजकांना धन्यवाद दिले पाहिजे, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा. सी. एस.पाटील यांनी कथामाला उद्घाटनासह प्रथम पुष्प गुंफतांना केले. अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापिका प्रिया सफळे होत्या. ईशस्तवन, स्वागतगीत आणि साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना संगीत शिक्षक राजू क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थिनींनी सादर केल्याने वातावरण निर्मिती छान झाली. प्रा.सी.एस.पाटील यांच्या कथाकथनाने मुले भारावली होती. प्रमुख पाहुणे प्रा.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी स्वातंत्र्यानंतर 1947 साली कै.ग्यानचंद हासवानी यांनी महाराष्ट्रातील जळगावच्या भूमीवर पाऊल ठेवले. उदरनिर्वाहाच्या शोधात फूटपाथवर कपडे विकायला सुरुवात केली. आज घटस्थापनेला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारतातील कलात्मक आधुनिक पोशाखांचे एक भव्य शोरूम असलेले ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’ आपल्या वस्त्रविश्वाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड, आनंदाचा आणि असंख्य क्षणांचा उत्सव आहे. ज्याने केवळ सेलिब्रेटींचे जीवनच नव्हे तर त्यांच्या प्रियजनांचे जीवन देखील समृद्ध केले आहे. ‘सुरेश कलेक्शन्स् अ‍ॅण्ड क्रिएशन’च्या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण म्हणजेच अमृतमहोत्सवानिमित्त शहर व जिल्ह्यातीलच नव्हे तर भारतातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संचालक मुकेश ग्यानचंद हासवानी यांनी सांगितले की, गतवर्षी शारदीय…

Read More