जळगाव पीपल्स बँक आयोजित दिवाळी महोत्सव 2023

0
15

साईमत जळगाव प्रतिनिधी

दि जळगाव पीपल्स को.ऑप. बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजितमहिला बचत गट उत्पादन विक्रीचा पाच दिवसीय ‘दिवाळी महोत्सव 2023’ दिनांक २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे राबविण्यात येत आहे.

दिवाळी महोत्सवाचा आरंभ गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, महानगरपालिका बचत गट विभागाच्या गायत्री पाटील यांच्या हस्ते तसेच बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, चेअरमन-बीओएम भालचंद्र पाटील, संचालक डॉ. सी.बी.चौधरी, प्रविण खडके, बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

प्रास्ताविक बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी केले. यावेळी आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, महानगरपालिका बचत गट विभागाच्या गायत्री पाटील यांनी महिलांना अमुल्य मार्गदर्शन केले.
बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांनी बँकेबद्दल माहिती दिली. तसेच बचत गट सदस्यांना मार्गदर्शन करीत सांगितले की, सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत या महिला बचत गटाच्या माध्यमातून समाजात वेगळही ओळख निर्माण करण्यासाठी महिला झटतात, बँकेला तुमचा अभिमान आहे. त्यासाठी 11 वर्षांपासून बँक या महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देते आहे. तुमच्या उत्पादनाची या पाच दिवसात विक्री झाली नाही तरी ते अपयश नाही. यातून तुम्ही नवे अनुभव मिळवता, आजुबाजुच्या स्टॉल्स कडून नवीन कल्पना संवाद होतो. आपल्यालाही नवीन काही करण्याची कल्पना सुचते. या सर्व प्रक्रियेचा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
महोत्सवात खान्देशी व इतर खाद्यपदार्थांचा तडका, दिवाळी फराळ, साडी-ड्रेस मटेरीयल, सोलापुरी चादरी, बेडशिटस्‌‍-पिलो कव्हर्स, पायपुसणी व गोधडी, गिफ्ट आर्टीकल्स, बॅग्स-पर्सेस, देवाचे वस्त्र, फुड कोर्ट, सर्व प्रकारचे पापड व मसाले अशी अनेक उत्पादने मेळाव्यात विक्रीस उपलब्ध आहेत. डोंबिवली, कोल्हापुर, धुळे, जालना, भंडारा, नागपुर, सांगली, नंदुरबार, रत्नागिरी अशा विविध ठिकाणाहून महिला बचत गट मेळाव्यात सहभागी झाले आहेत. तसेच विवीध मनोरजंनपर कार्यक्रम, आरोग्य तपासणी तसेच बायर सेलर मीट, सरप्राइज गेम शो कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जळगावकरांनी मेळाव्यास अवश्य भेट द्यावी असे आवाहन बँकेतर्फे व नाबार्डतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन अनिता वाघ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here