साईमत जळगाव प्रतिनिधी विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित करण्यात आला असून सदर चा संघ नूतन मराठा महाविद्यालय येथील व्हॉलीबॉल मैदानात झालेल्या निवड चाचणी मधून निवडण्यात आला आहे. महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन च्या सहकार्याने विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धचे आयोजन ११ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नासिक येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे वतीने नूतन मराठा महाविद्यालय येथील व्हॉलीबॉल मैदानात निवड चाचणी घेण्यात आली यात जिल्ह्यातील ३५ मुलांनी सहभाग नोंदविला व त्यातून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला. संघाची घोषणा अध्यक्ष फारुक शेख,…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची ग्वाही विमा कंपनीने दिली आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२२-२३ साठी राज्य हिस्स्याची १९६ कोटी इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी देवून निधी वितरित केला होता. यामुळे जिल्ह्यातील रखडलेला पिक विमा नुकसान भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होवून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा शासनाचा…
साईमत जळगाव प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन झालेल्या १४३ शेतकऱ्यांना २०१८ मध्ये पन्नास टक्के मोबदला रक्कम मिळाली होती. त्यानंतर पाच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ३ कोटी ७४ लाख ९२ हजारांची उर्वरित मोबदला रक्कम मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद गगनात मावत नव्हता. शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत आभार मानले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भडगाव (जुवार्डी, आडळसे, पथराड,गुढे), एरंडोल (गालापूर) व पारोळा (पळासखेडे सिम, नगांव, मंगरूळ, मोरफळ) तालुक्यातील ६ नदीजोड…
साईमत जळगाव प्रतिनिधी तंत्रज्ञानात दररोज बदल होत असतो आणि हे नवनवीन तंत्रज्ञान कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचे काम अॅग्रोवर्ल्ड मागील 9 वर्षांपासून करीत आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी केले. दरम्यान, प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद लाभला. प्रदर्शनस्थळी शेतकर्यांनी विक्रमी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल (एम. जे. कॉलेज) येथे दि. ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते झाले. प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे राजेंद्र गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा,…
साईमत जळगाव प्रतिनिधी पाणी वापर हा काटकसरीने करून गिरणा प्रकल्पावरील कालवा प्रणालीवरीलअनुषंगिक बांधकामे, माती भराव यासह तात्काळ दुरुस्तीच्ची कामे हाती घेण्यात यावी, गिरणा कालवा प्रणालीची कामे ६० वर्षांपूर्वी झाली असल्याने “कालवा प्रणालीचा नुतनीकरणाचा प्रस्ताव“ शासनास सादर करावा तसेच जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाई उपाययोजना बाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समिती आणि कालवा सल्लागार समितीची बैठक ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. गिरणा धरण यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ ५७ टक्के भरल्याने सिंचनाचे आवर्तन सोडण्यास अडचण निर्माण होणार आहे. मात्र…
साईमत जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव तर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार जळगाव शहरामध्ये राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये इयत्ता तिसरी सहावी तसेच नववीच्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित या विषयाची चाचणी घेण्यात आली. पायाभूत स्तर तपासण्यासाठी इयत्ता ३ री ,प्राथमिक स्तर तपासण्यासाठी इयत्ता सहावी तर मध्यस्थर तपासण्यासाठी इयत्ता ९ वी च्या वर्गाची ही परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेत प्रत्येक वर्गासाठी एकूण ३० विद्यार्थी प्रमाणे मनपा क्षेत्रासाठी ९० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. सदर चाचणी साठी समाजकार्य विभाग चे विद्यार्थी उ.म.वि.जळगावचे क्षेत्रीय अन्वेषक यांचे अनमोल…
साईमत जळगाव प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को.ऑप. बँक आयोजित व नाबार्ड प्रायोजितमहिला बचत गट उत्पादन विक्रीचा पाच दिवसीय ‘दिवाळी महोत्सव 2023’ दिनांक २ ते ६ नोव्हेंबर दरम्यान यशोदया हॉल, रिंग रोड, जळगाव येथे राबविण्यात येत आहे. दिवाळी महोत्सवाचा आरंभ गुरुवार दि. २ नोव्हेंबर रोजी आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, महानगरपालिका बचत गट विभागाच्या गायत्री पाटील यांच्या हस्ते तसेच बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील, चेअरमन-बीओएम भालचंद्र पाटील, संचालक डॉ. सी.बी.चौधरी, प्रविण खडके, बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रास्ताविक बचत गट विभाग प्रमुख शुभश्री दप्तरी यांनी केले. यावेळी आय.एम.आर. कॉलेजच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, महानगरपालिका बचत गट विभागाच्या गायत्री…
साईमत जळगाव प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, विभागस्तर शालेय स्क्वॅश क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन नुकतेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात एकलव्य क्रीडा संकुलातील स्क्वॅश अॅकॅडमीच्या १७ खेळाडूंची शालेय राज्यस्तर स्पर्धेत निवड करण्यात आली. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील नाशिक, धुळे व जळगांव येथील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. राज्य स्तर स्क्वॅश स्पर्धेकरिता एकलव्य स्क्वॅश अॅकॅडमीतील निवड झालेल्या खेळाडूमध्ये १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये आर्या देशपांडे, इशा देशपांडे , पल्लवी मांडे, मुले- अथर्व खांडरे, यश हेमनानी, तन्मय पाटील, आरुष चौधरी ,…
साईमत जळगाव प्रतिनिधी कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या आठ वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्या अॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे 3 ते 6 नोव्हेंबर दरम्यान भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी (3 नोव्हेंबर) रोजी दुपारी 12 वाजता होईल. निर्मल सीड्सचे डॉ. सुरेश पाटील, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, ओम गायत्री नर्सरीचे मधुकर गवळी, मेट्रोजेन बायोटेकचे प्रियंक शहा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. प्रदर्शनात प्रवेश मोफत असून तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे. तब्बल चार एकर परिसरात 210…
साईमत एरंडोल प्रतिनिधी आपण वनस्पतीचे गार्डन पाहतो, फुलांचा बगीचा पाहिला असेल. मात्र एरंडोल नगरपरिषदेने तब्बल ३३ गुठ्यांत पुस्तकाचा बगीचा साकारला आहे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यासाठी हा प्रयोग आदर्श ठरू शकणार आहे. राज्यातला अशा प्रकारचा पुस्तकांचा एकमेव बगीचा आहे हे विशेष ! आपण विविध प्रकारचे गार्डन पाहता, मात्र एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून वाचन संस्कृती टिकून राहावी, त्यात वाढ व्हावी या उद्देशाने शहरात पुस्तकांच्या बगीच्याची निर्मिती केली आहे. हा बगीचा एरंडोल शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. ३३ गुठ्यांत साकारणार पुस्तक बगीचा शहरातील आनंद नगर भागात 33 गुंठे म्हणजेच बीघा भर जागेत पुस्तकांचा बगीचा साकारला जातो आहे. या नाविन्यपूर्ण…