साईमत जळगाव प्रतिनिधी वीज कर्मचाऱ्यांसाठी महावितरणच्या वतीने १ ते ४ फ़ेब्रृवारी दरम्यान छत्रपती संभाजी नगर येथे आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. संपूर्ण राज्यभरातून आलेल्या खेळाडू वीज कर्मचाऱ्यांतून जळगांव परिमंडलातील दोन खेळाडूंनी सुवर्ण पदक तर तीन खेळाडूंनी रौप्य पदक पटकावले. स्पर्धेत खो-खो क्रीडा प्रकारात जळगांवचा महिला संघ उपविजेता ठरला. महावितरणच्या जळगाव विभागातील अबरार अशपाक पटेल (वरिष्ठ तंत्रज्ञ) याने १५०० मीटर धावणे स्पर्धेत तर धरणगांव विभागातील भानुदास शंकर वसावे (तंत्रज्ञ) याने कुस्तीच्या १२५ वजनी गटातून प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले. जळगावच्या सावदा विभागातील विजय उत्तम बाहरे (विद्युत सहाय्यक) याने ४०० मीटर धावणे स्पर्धेत व याच विभागातील परेश दिगंबर चौधरी याने…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पीएच.डी. प्रवेश पूर्व परीक्षा ( पेट ) २०२३ नुसार तात्पुरत्या प्रवेशित विद्यार्थ्यांची रिसर्च मेथॉडॉलॉजी या विषयावरील कार्यशाळेस सोमवार दि. ५ फेब्रुवारी पासून विद्यापीठात प्रारंभ झाला. या कार्यशाळेचे उद्धाटन कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेचा लाभ ३७६ विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कार्यशाळेचे अध्यक्ष प्रा.पी.पी.माहुलीकर, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा.एस.टी.भुकन आणि विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रााचार्य एस.एस.राजपूत उपस्थित होते. या प्रसंगी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चा विषय निवडी संदर्भात व संशोधनासंदर्भात विविध मुद्दयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. ही कार्यशाळा दि.५ ते १० फेब्रुवारी दरम्यान…
साईमत जळगाव प्रतिनिधी रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. याच संघटनेची जळगाव जिल्हा शाखा २०१९ पासून अस्तित्वात आली. जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार हास्यजत्राफेम अभिनेते हेमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. दि. २ फेब्रुवारी रोजी आय.एम.आर.महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केसीईचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, केसीई व्यवस्थापन समिती सदस्य ॲड.प्रविणचंद्र जंगले, नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, नाट्यजागर कलेचा स्पर्धा समन्वयक दिलीप दळवी (मुंबई), डॉ.अनिल बांदिवडेकर…
साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यार्थ्यांन जीवन जगण्याविषयीचा तसेच यश संपादन करण्यासाठी शॉर्टकट मार्ग न स्वीकारता दीर्घकाळ अभ्यासाचे उपासक रहावे, माणसाचे आयुष्य खूपच कमी आहे. असे प्रतिपादन कला व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतिन मेढे यांनी केले. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या. माध्यमिक शिक्षक सदन येथील कै.रा.या. प्रचंड सभागृहात शिक्षक पाल्यांचा गुणगौरव सोहळ्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठराव गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर जयश्री महाजन, कला व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतिन मेढे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य…
साईमत जळगाव प्रतिनिधी गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपचे विचार तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी. समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचा भाजपच्या २०२४ च्या महाविजयात खारीचा वाटा असेल, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी विजय चौधरी यांनी केले. शहरातील ब्राम्हण सभा येथे सोमवार दि. २९ रोजी भाजपा पूर्व व पश्चिम जिल्हा तसेच जळगाव महानगर यांच्यातर्फे गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित जळगाव जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना श्री. चौधरी बोलत होते. यावेळी खासदार उन्मेश पाटील, माजी खासदार डॉ.…
साईमत (जळगाव)चित्रपती भालजी पेंढारकर नगरी प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पार पडला. या फेस्टिवलसाठी 109 शॉर्टफिल्म आल्या त्यातील विशेष 62 शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत. यातील संजय दैव दिग्दर्शक यांची ‘देशकरी’ ही उत्कृष्ट शॉर्ट फिल्म विजेती ठरली आहे तर अरविंद जोशी यांची “पिलग्रीम ऑफ हतनूर’उत्कृष्ठ माहितीपटाचा मान मिळाला आहे. तर “द डील” ने उत्कृष्ठ कॅम्पस फिल्म ठरली.जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक विजय लोटन पाटील, नितीन…
साईमत जळगाव प्रतिनिधी नागपूर येथे २९ जानेवारी पासून सुरू होत असलेल्या राज्यस्तरीय आंतर जिल्हा खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धांना सुरुवात होत असून जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना ३० जानेवारी रोजी पालघर जिल्हा सोबत होत असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. संघाच्या कर्णधार पदी भुसावळचा आकाश पाल तर उप कर्णधार पदी जळगावच्या उत्कर्ष देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी निवड समिती सदस्य भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, उज्ज्वल काळे, अब्दुल मोहसीन यांच्या समितीने निवड केलेल्या संघाची यादी सेक्रेटरी यांना सुपूर्द केली व तिची घोषणा फारुक शेख यांनी केली. कर्णधार पदी भुसावळचा आकाश पाल व उप…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी इग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रजाकसत्ता दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी खा.डॉ उल्हास पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाचे वाचन करून देशभक्तीपर नृत्य, नाटक भाषण, यातून विद्यार्थ्यांनी आपली देशभक्ती सादर केली. कार्यक्रमाच्या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालिका डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय पाटील , स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी, लॉ कॉलेजच्या प्रा. नयना झोपे, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे रजिस्टर प्रमोद भिरूड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
साईमत जळगाव प्रतिनिधी विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही मात्र अलिकडच्या काळात विज्ञानाधारित साधनांवर विश्वास ठेवला जात असून साधनेवर मात्र विश्वास ठेवला जात नाही अशी खंत बीएपीएस स्वामी नारायण रिसर्च इन्स्टिट्यूट, अक्षरधाम नवी दिल्ली येथील सहायक संचालक डॉ. ज्ञानानंददास स्वामी यांनी व्यक्त केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शनिवार दि. २७ जानेवारी रोजी यशोवल्लभ व्याख्यानमाले अंतर्गत डॉ. ज्ञानानंददास स्वामी यांचे ‘विज्ञान आणि अध्यात्म: मानवी प्रगतीचे संश्लेषण’ या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्याख्यानमालेचे प्रायोजक ॲङ गिरीधरलाल गुजराथी उपस्थित होते. डॉ. ज्ञानानंद स्वामी म्हणाले की, आज दिसणाऱ्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या अंतर्गत विद्यार्थ्यांचे कवी संमेलन झाले. या कवी संमेलनात प्रज्ञा नांदेडकर, बाबुराव देसाई, निलेश चौरे, पवन वसावे, गौरव खराटे, अनुष्का पवार, अजय पवार, कवीता बोरसे, महेश सुर्यवंशी,कृष्णा संदानशीव, डॉ. सुदर्शन भवरे, नेत्रा उपाध्ये, डॉ. दीपक खरात, भारती सोनवणे यांनी कवीता सादर केल्या. डॉ. म.सु.पगारे यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. प्रिती सोनी यांनी आभार मानले.