गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

0
9

साईमत जळगाव प्रतिनिधी

गोदावरी इग्लिश मिडीयम स्कुलमध्ये प्रजाकसत्‍ता दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी खा.डॉ उल्हास पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाचे वाचन करून देशभक्तीपर नृत्य, नाटक भाषण, यातून विद्यार्थ्यांनी आपली देशभक्ती सादर केली.

कार्यक्रमाच्या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालिका डॉ. केतकी पाटील, हृदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय पाटील , स्कूलच्या प्राचार्या निलिमा चौधरी, लॉ कॉलेजच्या प्रा. नयना झोपे, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजचे रजिस्टर प्रमोद भिरूड, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here