राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ रवाना

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

नागपूर येथे २९ जानेवारी पासून सुरू होत असलेल्या राज्यस्तरीय आंतर जिल्हा खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धांना सुरुवात होत असून जळगाव जिल्ह्याचा पहिला सामना ३० जानेवारी रोजी पालघर जिल्हा सोबत होत असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. संघाच्या कर्णधार पदी भुसावळचा आकाश पाल तर उप कर्णधार पदी जळगावच्या उत्कर्ष देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी निवड समिती सदस्य भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, उज्ज्वल काळे, अब्दुल मोहसीन यांच्या समितीने निवड केलेल्या संघाची यादी सेक्रेटरी यांना सुपूर्द केली व तिची घोषणा फारुक शेख यांनी केली.
कर्णधार पदी भुसावळचा आकाश पाल व उप कर्णधार पदी जळगावचा उत्कर्ष देशमुख, व्यवस्थापक पदी भुसावळ सेंटर रेल्वेचा उज्वल काळे, मुख्य प्रशिक्षक पदी जैन स्पोर्ट्सअकॅडमी अब्दुल मोहसीन व सहाय्यक प्रशिक्षक पदी आबिद खान यांच्या नावांची सुद्धा घोषणा करण्यात आली.निवड झालेला संघाच्या खेळाडूंना जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे शुभेच्छासह किट देऊन गौरवण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अस्मिता पाटील, खजिनदार शेखर देशमुख, सचिव फारुख शेख, संचालक भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, इम्तियाज शेख, ताहेर शेख ,एडवोकेट आमिर शेख आदींची उपस्थिती होती.
निवड झालेल्या संघात आकाश पाल (कर्णधार), उत्कर्ष देशमुख(उप कर्णधार ), कुलदीप पाटील, कौशल पवार, अरविंद चिल्लरवार, आशुतोष शुक्ला, निखिल सोनवणे, जॉय शेळके, कौशल पवार, फवाद सय्यद, सुफियान सय्यद, कदीर तडवी, सादिक सय्यद, धनंजय धनगर, आकाश कांबळे, अर्षद शेख, वसीम शेख, अर्पित वानखेडे, पंकज पाटील, शाबास काझी आदींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here