‘देशकरी’ ठरली तिसऱ्या देवगिरी शॉर्ट फिल्म ची उत्कृष्ट फिल्म

0
1

साईमत (जळगाव)चित्रपती भालजी पेंढारकर नगरी प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेचे खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे पार पडला. या फेस्टिवलसाठी 109 शॉर्टफिल्म आल्या त्यातील विशेष 62 शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत.

यातील संजय दैव दिग्दर्शक यांची ‘देशकरी’ ही उत्कृष्ट शॉर्ट फिल्म विजेती ठरली आहे तर अरविंद जोशी यांची “पिलग्रीम ऑफ हतनूर’उत्कृष्ठ माहितीपटाचा मान मिळाला आहे. तर “द डील” ने उत्कृष्ठ कॅम्पस फिल्म ठरली.जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक विजय लोटन पाटील, नितीन भास्कर,संगीतकार रोहित नागभीडे, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे रजिष्ठार डॉ विनोद पाटील,कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य राजेंद्र नन्नवरे उदयोगपती प्रकाश चौबे,प्रांत सह कार्यवाह स्वानंद झारे, अॅड. सुशील अत्रे, देवगिरी फिल्म चे प्रांत संयोजक किरण सोहळे, कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थी विकास संचालक डॉ प्रा जयंद्र लेकुरवाळे, विवेकानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष शोभाताई पाटील उपस्थित होते.
500 कोटींचा चित्रपट जो संदेश देऊ शकत नाही मात्र कमी खर्चात बनवलेल्या पाच मिनिटांच्या शॉर्ट फिल्म देतो ही ताकद आहे असं मत अशोक भाऊ जैन यांनी व्यक्त केले. देवगिरी शॉर्ट फिल्मच्या उपक्रमात जैन उदयोग समूह कायम पाठीही राहिल अश्या भावना अशोक जैन यांनी व्यक्त केल्यात.
देवगिरी चित्र साधना आयोजित तिसरा देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवल 27 व 28 जानेवारी दोन दिवस चालणाऱ्या छत्रपती संभाजी नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला. पुरस्कार सोहळ्यासाठी यावेळी विविध शॉर्टफिल्मच्या स्क्रिनिंग दाखवण्यात आल्या. फेस्टिवलसाठी 109 शॉर्टफिल्म आल्या असून विशेष 62 शॉर्टफिल्म दाखवण्यात आलेत .
विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई पाटील, सचिव डॉ. रत्नाकर गोरे, सौ. हेमलता अमळकर, चित्र साधना प्रांत संयोजक किरण सोहळे,विनीत जोशी,संजय हांडे, सुचित्रा लोंढे, संतोष सोनवणे, प्रा सचिन कुंभार गौरव नाथ, पार्थ ठाकर, विवेकानंद प्रतिष्ठान विद्यालयातील शिक्षक तसंच कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाठी सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here