Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून सकाळी ११.३० वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक जळगाव शहर, दुपारी २ वाजता आठवडे बाजार शिरसोली, दुपारी ४ वाजता कस्तुरीबाई नंदराम मंत्री माध्यमिक विद्यालय मैदान कासोदा (ता.एरंडोल), सायंकाळी ६ वाजता भडगाव शेतकरी सहकारी संघ मैदान, भडगाव येथे सभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वात सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, दिपकसिंग राजपूत, वैशाली सुर्यवंशी, महानगरप्रमुख शरद तायडे, शिवसेना जिल्हा संघटक गजानन मालपुरे, जयश्री महाजन, कुलभूषण पाटील, महानंदा पाटील, युवासेना विभागीय सचिव विराज…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी ग्राम संवाद युवकांनी गांधी विचारांच्या प्रसारासाठी समाज माध्यमाचा नाविन्यपूर्ण रीतीने प्रभावी वापर करावा असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या अंबिका जैन यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, समन्वयक उदय महाजन, प्रा. डॉ. अश्विन झाला, यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी, सुधीर पाटील व यात्रा प्रमुख प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. आपल्या मनोगतात अंबिका जैन पुढे म्हणाल्या की, ग्राम संवाद यात्रेचे अनुभव ऐकताना मलाही यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. बारा दिवसात आपण सर्व एकाच परिवाराचे सदस्य झालात हि खरोखर आनंदाची गोष्ट आहे. आमच्या जैन परिवारातही वेगवेगळ्या वयोगटातील १८ सदस्य एकत्रित राहतात याचा अनुभव…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची बद्धा स्वच्छता आमचा ध्यास’ या अभियानात प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची जिल्ह्यातील चार तालुक्यात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने, प्रसिद्ध वक्ते राहुल सोलापूरकर यांची व्याख्याने, शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव येथील विधी क्षेत्रातील ॲड. संजय राणे आणि उद्योग क्षेत्रातील किरण राणे यांचे वडिल मनोहर देवचंद राणे यांनी अथक अभ्यास व अनुभवाच्या जोरावर लिहिलेल्या अधात्म व धार्मिक विषयावरील भगवत्प्रणित जीवनरेखा व म्हाताऱ्यांनो आनंदात जगा व सुखाने निरोप घ्या या दोन पुस्तकांचे प्रकाशन आज (दि.११) रोजी सायं. ५.३० वाजता मायादेवी नगर येथील रोटरी भवनात होणार आहे. मनोहर राणे हे इंग्रजीचे शिक्षक होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीतेतील काही श्लोकांचे मराठीत निरूपणाचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे अध्यात्म व धार्मिक विषयात वाचन वाढले. संतांचे लेखन त्यांनी वाचले. यातूनच गीतेतील काही निवडक श्लोक व संत वचने या विषयावर राणे यांनी मराठीत लेखन…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन द्वारे अधिकृत “जैन चैलेंज चषक” जळगाव जिल्हा आंतर शालेय (सांघिक) बॅडमिंटन स्पर्धा – २०२४. चे आयोजन दिनांक ९ ते १० फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या स्पर्धांमध्ये १७ वर्षाआतील वयोगटातील मुले व मुलींचे एकूण ३३ संघांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धा मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या शाळांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव कडुन बक्षिस म्हणुन आकर्षक चषक व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी तसेच तायक्वांडो प्रशिक्षक अजित…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी बक्षीस मिळणे तात्पुरती बाब आहे. स्नेहसंमेलन आपण भाग घेतला ही बाब कायम स्मरणात राहते. स्नेहसंमेलनाचे हे दिवस भारावलेले, आनंदमय असतात, असे प्रतिपादन केसीई सोसायटीचे सह सचिव अॅड. प्रविणकुमार जंगले यांनी केले. ते मूळजी जेठा महाविद्यालयाच्या ‘चैतन्य २०२३-२४’ या स्नेहसंमेलनाचे पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे होते. प्रमुख अतिथी म्हणून केसीई सोसायटीचे सह सचिव अॅड. प्रविणकुमार जंगले, केसीई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सं.ना.भारंबे म्हणाले की, धैय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा, त्यासाठी तुम्हाला वेड म्हंटल तरी चालेल , वेडी लोकच इतिहास घडवतात. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात एक…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी पहिला सामना ओम ज्वेलर्स विरुद्ध मनीगुरु यामध्ये मनीगुरु विजयी यामधे ओम ज्वेलर्स संघाने ७९ धावा केल्या होत्या त्या बदल्यात मनीगुरु संघाने ५.३ षटकात ८१ धावा करीत हा सामना ८ गडी राखून विजय मिळवला. दुसरा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी विरुद्ध के. पी. इंटरप्रायजेस यामध्ये अजय बाविस्कर आणि कंपनी विजयी या दोनही संघादरम्यान अजय बाविस्कर आणि कंपनी संघाने १० षटकात ६ गाडी मोबदल्यात १४२ धावा केल्या होत्या त्याबदल्यात के.पी.इंटरप्रायजेस संघाने १० षटकात १२५ धावा केल्या हा सामना अजय बाविस्कर आणि कंपनी संघाने १७ धावांनी जिंकला. तिसरा सामना पियुष हॉस्पिटल विरुद्ध एकविरा प्लाय यामध्ये पियुष हॉस्पिटल विजयी या दोनही…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा काढण्यात आली असून ही रथयात्रा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार आहे. नाशिक ते आनंदवन अशी १४३० कि.मी. ची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार अवयवदाना विषयी जनजागृती करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा वतीने मंगळवारी दुपारी २.०० वाजता विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पुरुषोत्तम पवार, अध्यक्ष व सुनिल देशपांडे, उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे आज मातीचे आरोग्य राखल्यास आपणासही सात्विक अन्न मिळू शकेल , सात्विक आहाराचा जीवनात उपयोग करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले. जळगाव जनता सहकारी बँकेच्या बचत गटाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, डॉ प्राजक्ता देवरे, बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने, संचालक हरिश्चंद्र यादव, संचालिका संध्या देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथि राहीबाई पोपेरे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील असून त्यांना सन २०२० मध्ये देशी वाणांच्या बियाण्यांची जपवणूक केल्याबद्दल…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्ह्याच्या विश्वकर्मा योजना जिल्हा संयोजन पदी विजय रामदास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच देण्यात आले. या निवडीबद्दल विजय शिंदे यांचे राज्याचे ग्रामविकास व पर्यटन ना.गिरीश महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, खा. रक्षाताई खडसे, खा.उन्मेष पाटील,आ. राजूमामा भोळे,आ.संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, माजी आ. स्मिता वाघ, प्रदेश चिटणीस अजय भोळे आदींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Read More