शॉर्टकट मार्ग न स्वीकारता दीर्घकाळ अभ्यासाचे उपासक रहावे – प्रा डॉ जतीन मेढे

0
5

साईमत जळगाव प्रतिनिधी

विद्यार्थ्यांन जीवन जगण्याविषयीचा तसेच यश संपादन करण्यासाठी शॉर्टकट मार्ग न स्वीकारता दीर्घकाळ अभ्यासाचे उपासक रहावे, माणसाचे आयुष्य खूपच कमी आहे. असे प्रतिपादन कला व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतिन मेढे यांनी केले. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या. माध्यमिक शिक्षक सदन येथील कै.रा.या. प्रचंड सभागृहात शिक्षक पाल्यांचा गुणगौरव सोहळ्या प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य निळकंठराव गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर जयश्री महाजन, कला व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. जतिन मेढे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्य अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष जे. के. पाटील, जिल्हा समन्वयक समितीचे अध्यक्ष यू. यू. पाटील, ‘माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर. एच. बाविस्कर, जुक्टो जेष्ठ मार्गदर्शक प्रा सुनील गरुड, ग. स. सोसायटीचे संचालक मंगेश भोईटे, योगेश सनेर. जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी सेक्रेटरी जी. आर. चौधरी , पतपेढीच्या माजी संचालिका तथा मुख्याध्यापक संघ वार्तालाप संपादिका साधना लोखंडे, पतपेढीच्या माजी संचालिका तथा महानगर टी. डी. एफ. उपाध्यक्षा पुष्पा पाटील, भुसावळ सोसायटी चे माजी अध्यक्ष डी. ए. पाटील, कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एन. ओ. चौधरी, कलध्यापक संघाचे जिल्हा सेक्रेटरी अरुण सपकाळे, श्री भारंबे , भुसावळ पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील , पतपेढीचे माजी मानद सचिव मनोहर सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचा अहवाल पतपेढीचे अध्यक्ष एस. डी. भिरुड सर यांनी सांगितला. अध्यक्षीय भाषणातून निळकंठ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या जीवनातले अनुभव सांगून शिक्षण हा मानवी जीवनाचा अलंकार आहे शिक्षणामुळे मानवी जीवनाची व व्यक्तिमत्त्वाची उंची वाढते असे आग्रही प्रतिपादन केले.
यावेळी विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच आदर्श शिक्षकांचा स्मृतिचिन्ह व बोधचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन यांनी केले व आभार खजिनदार संजयकुमार सांगळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व संचालकांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here