Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी येत्या जून २०२४ पासून महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. जवळपास ८०० अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्या प्रसंगी ते बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभागाचे आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उदघाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दि. ९ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात झाले. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी होते तर प्र-कुलगुरु प्रा.एस.इंगळे यांचीही उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाषणाच्या आधी विद्यार्थी व विद्यार्थिनींना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यामध्ये…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगाव येथे नव्याने बदलून आलेल्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून नानाश्री फाऊंडेशनतर्फे त्यांचे जळगावनगरीत स्वागत करण्यात आले. जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची अलीकडेच बदली झाली होती. यानंतर त्यांच्या जागी फुलंब्री येथून शीतल राजपूत यांची बदली झाल्याचे शासकीय आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर त्यांनी नुकतेच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून जळगाव ग्रामीणतर्फे नानाश्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पदाधिकारींनी तालुक्यातील सर्वात मोठी समस्या वाळूचोरी संदर्भात राजपूत यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजपूत यांनी गावागावातील जनतेने खासकरून तरुणाईने स्थानिक पातळीवर एकत्र येऊन याबाबतीत लढा उभारण्याचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप सोहळा दि. ९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी पासून ते दहावीपर्यंत विवेकानंद प्रतिष्ठानच्या मुलभूत तत्वानुसार सर्वांग अष्टपैलू व्यक्तित्व घडवले जाते. हे संस्कार घेऊन ती मुले समाजात स्थापित करून एक नवे अथांग असे मुक्त आकाश यांच्या प्रगतीसाठी खुले झाले आहे. या भूमिकेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय सदस्य धनंजय जकातदार, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे तथा शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी कस्टर्ड महासंघाच्या सन 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. सदर कॅलेंडरचे प्रकाशन जळगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खलील शेख , प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक विजय पवार , गटविकास अधिकारी जळगाव अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिनदर्शिकेचे जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये विनामूल्य वितरण दरवर्षीप्रमाणे मोफत करण्यात येणार आहे. प्रसंगी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे ,कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सचिव ब्रह्मानंद तायडे, कोषाध्यक्ष प्रमोद लोंढे , , शिक्षक संघटनेचे सचिव राजू वानखेडे , तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे , ज्येष्ठ सल्लागार गोपीचंद भालेराव , एस के कांबळे सर , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विभागीय…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विद्यार्थ्याना जागतिक दर्जाचे शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना कृतियुक्त शिक्षण तसेच स्वानुभवातून शिक्षण देणे महत्वाचे ठरते. याच उद्देश्याने प्रगती विद्यामंदिर शाळेतील उपक्रम शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देत त्यांचा कृत्युयुक्त सहभाग घेऊन त्यांना प्रकाश सरळ रेषेत प्रवास करत असतो हे पटवून दिले. यात त्यांनी तीन सामान आकाराचे पुठठे घेऊन त्यांना सामान भागावर एक छिद्र पाडले. यानंतर ते तीन पुठठे एका सरळ रेषेत ठेवून त्यांचे छिद्र एका सरळ रेषेत येतील असे असा पद्धतीने ठेवले यानंतर एका बाजूला पेटती मेणबत्ती ठेवले व दुसऱ्या बाजूने विद्यार्थ्यांला सांगितले कि त्या बाजूने छिद्रामध्ये बघ…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलीसी-२०२३ च्या धर्तीवर यंदाचा ‘एड्युफेअर-२०२४’ आयोजित केला आहे. दि. ९, १०, ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान खान्देश सेंट्रल मॉलच्या मैदानावर संध्याकाळी ४ ते ९ वाजेदरम्यान ही मनोरंजनातून शिक्षणाची सफर करता येईल. हडप्पा संस्कृतीचे ऐतिहासिक दर्शन हे एड्युफेअरचे आकर्षण असेल. ‘खेळता खेळता शिका व शिकता शिकता खेळा’ ह्या संकल्पनेवर आधारित एड्युफेअरमध्ये १४ झोन असून १०० पेक्षा जास्त खेळ अनुभवता येतील. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे चार वयोगटानुसार खेळांची विभागणी केली आहे. यामध्ये भाषिक कौशल्याला चालना देणाऱ्या इंग्रजी, हिंदी, मराठीमध्ये अनेक खेळ आहेत. चांद्रयान-३च्या यशस्वीतेवर विज्ञान झोन, नासा, रशियाच्या स्पेस कार्यावर अनेक वर्किंग मॉडेल्स असतील,…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी नुतन मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ग्रामीण भागातील शाळेकडे लक्ष द्या तसेच यावल तालुक्यातील नायगाव येथील शाळेला संरक्षक भिंत उभारा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विरेंद्र भोईटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, नूतन मराठा विद्या प्रसारक मंडळ, जळगाव संस्थेची नायगाव ता.यावल येथील सातपुडा माध्यमिक विद्यालय या शाळेत गेल्या आठवड्यात अज्ञात चोरट्यांनी पोषण आहाराची चोरी केली आहे.दरवाजे तोडफोड करणे असे मागे दोन तीन वेळेस झाले आहे.तरी वरिष्ठ संचालक मंडळातील एकही अधिकारी,संचालक यांचे शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. शाळेला संरक्षक भिंत नाही अशा आशयाचे निवेदन रावेर लोकसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विद्यार्थी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म.न.पा आयुक्त डॉ विद्या गायकवाड, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , सल्लागार प्रेमदादा रायसोनी आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ विद्या गायकवाड म्हणाल्या की “रायसोनी पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी यांनीं सादर केलेले नाटक, गीते आणी नृत्य यातून जो सर्व धर्म समभाव हा एक मौलिक देशभक्तीपर विचारांची जनजागृती तसेच देशाचा इतिहास व भारतीय संस्कृतीचे दर्शन विध्यार्थ्यानी घडविले. हे कार्यक्रमाचे विशेष. आणी ही स्कूल हा संस्कार विद्यार्थ्यांवर पेरत असल्याचा…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असे असताना सुद्धा राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असून कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे युवा सेना जळगाव तर्फे आमदार गायकवाड व राज्य शासनाचा निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या आमदार पदाधिकारी यांनी दिवसाढवळ्या चालवलेल्या गुंडगिरी विरोधात सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो याचा निषेध करण्यासाठी युवा सेना जळगाव तर्फे राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी भूमिका…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या १०खेळाडूंची समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल, शेगाव येथे झालेल्या २३ व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघात निवड झाली होती. सदर स्पर्धा या महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने झाल्या. या स्पर्धेत विविध वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या खेळाडूंनी ५ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली. सदर स्पर्धेत गायत्री देशपांडे व कृष्णाई रेंभोटकर या अनुभवी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली, तर नवोदित खेळाडूंपैकी नमित दळवी, आयुष वंजारी व माही फिरके यांनी पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात अनुष्का चौधरीने चतुर्थ स्थान…

Read More