युवासेना जळगाव तर्फे राज्यशासनाचा निषेध

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असे असताना सुद्धा राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असून कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे युवा सेना जळगाव तर्फे आमदार गायकवाड व राज्य शासनाचा निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला.

भारतीय जनता पार्टीच्या आमदार पदाधिकारी यांनी दिवसाढवळ्या चालवलेल्या गुंडगिरी विरोधात सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो याचा निषेध करण्यासाठी युवा सेना जळगाव तर्फे राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी यांच्या नेतृत्वाखाली १७ मजली समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, जिल्हा चिटणीस अंकित कासार, विधानसभा क्षेत्रयुवाधिकारी अमीत जगताप, शहर युवा अधिकारी गिरीश कोल्हे, उपमानगर प्रमुख हर्षल मुंडे, राहुल शिंदे, निलेश जोशी, तुषार पाटील , झैद पटेल , ओम कोळी, मयूर अण्णा गवळी, युवासैनिक राकेश थोरात , संदेश बोंडे, जयेश महाजन, राकेश कोळी, देव सपकाळे, अजिंक्य जैन, उज्वल राजपूत ,पार्थ सावा, विभाग अधिकारी गौरव चंदनकर, युवती अधिकारी दिपाली बाविस्कर, सायली येवले यांसह युवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here