साईमत जळगाव प्रतिनिधी एका व्यक्तीने ठरवल्यास तो आठ जणांना जीवदान देऊ शकतो त्यासाठी नेत्रदान,त्वचा दान,अवयव दान आणि देहदान करण्याचा संकल्प करावा असे आवाहन कवयित्रीबाई बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल.माहेश्वरी यांनी केले. नेत्रदान, त्वचादान, देहदान याबाबत फेडरेशन ऑफ ऑर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन मुंबई, या सामाजिक संस्थेतर्फे जनप्रबोधन करणारी रथयात्रा मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आली. या निमित्त आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाशिक ते आनंदवन अशी १४३० कि.मी. ची ही रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. प्रा माहेश्वरी आपल्या भाषणात…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी क्विक हेल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा पुरस्कारात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुण्यात झालेल्या एका समारंभात या पुरस्कारांचे वितरण झाले. क्विक हेल फाउंडेशन आणि विद्यापीठातील संगणक शास्त्र प्रशाळा यांच्यात सामंजस्य करार झाला असून या करारान्वये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रशाळेच्या ३८ विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत जनजागृती केली. जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील जवळपास १०० शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन ४० हजार विद्यार्थ्यांमध्ये आणि दहा हजार सामान्य नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आले. सायबर सुरक्षेचे प्रबोधन करण्यात आल्याबद्दल सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवार्ड २०२४ चे…
साईमत जळगाव प्रतिनिधी दि. १४ फेब्रुवारी तसा व्हॅलेंटाइन-डे(प्रेम दिवस) पण उज्ज्वलस्प्राउटर गेल्या २१ वर्षांपासून म्हणजेच २००४ पासून हा दिवस “आजी-आजोबा” दिवस म्हणून विविध पद्धतीने तसेच विविध ठिकाणी साजरा करत असतो, जसे कि मंदिरात, वृद्धाश्रमात आणि शाळेत. यावर्षीचा आजी-आजोबा दिवस हा शाळेत मोठ्या जल्लोषाने साजरा करण्यात आला. आजच्या आजी-आजोबा दिवसाचे उद्घाटन जमलेल्या काही निवडक आजी-आजोबा तसेच प्रशासकीय अधिकारी स्वप्नील बोरसे तसेच समन्वयक सुनयना चोरडिया यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी- आजोबांनकरिता बहारदार नृत्य, गीते तसेच कविता सादर केल्या. आजी-आजोबांच्या मनोरंजना करिता विविध खेळ ठेवण्यात आले होते. सर्व खेळांमध्ये सर्व उपस्थित आजी-आजोबानी उत्फूर्तपणे सहभाग नोंदविला. जवळपास २०० आजी…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालय स्काऊट गाईड शिबिर उत्साहवर्धक व निसर्गरम्य वातावरणात उत्साहात झाले. शिबिराचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. या प्रसंगी गुरुकुल विभाग प्रमुख शशिकांत पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्काऊट म्हणजे काय ? शील, कौशल्य आणि शिस्त यावर रवींद्र सैंदाणे यांनी मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड शिक्षिका सुरेखा शिवरामे व नंदिनी टाकणे यांनी विद्यार्थ्यांकडून विविध व्यायाम प्रकार करून घेतले. त्यात व्यायाम प्रकारात नंदिनी टाकणे यांनी विद्यार्थ्यांकडून ‘एक होता डोंगर’ या कृती गीतावर काही कृती करून घेतल्या. विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगण्यात आला. सांकेतिक खुणा,…
साईमत जळगाव प्रतिनिधी येथील डोहोळे परिवारातर्फे नाशिक येथील सप्तशृंगी गडावरील देवीला दर वर्षीप्रमाणे या वर्षीही मकर संक्रांत पर्व काळात अनघा अजय डोहोळे यांनी तयार केलेल्या हलव्याच्या अलंकाराची सेवा अर्पण करण्यात आली . या वर्षी प्रथमच पारंपरिक दागिन्यामध्ये देवीला घालण्यात येणाऱ्या सोन्याचा पुतळा हार याची हलव्याच्या पुतळा हार तयार करून प्रतिकृती बनवण्यात आली.याची उंची अडीच फूट होती व भव्य असा ८ फुटाचा पद्म हार बनविण्यात आला. त्याच बरोबर तीन फुटाचे ठसठशीत असे हलव्याचे मंगळसूत्र बनविले होते. अडीच फुटाचा कंबरपट्टा. असे भव्य अलंकार बनवून देवीला अर्पण केले. यावेळी अरुण जोशी, जयश्री जोशी, उषा डोहोळे, शेखर डोहोळे यांची उपस्थिती होती.
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालयात इयत्ता १० वी च्या विद्यार्थी शुभेच्छा समारंभ कार्यक्रम उत्साहात झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. संजय घोष यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकरजी गोरे , मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांची उपस्थिती होती. सुरुवातीला शालेय परिसरात नव्याने तयार केलेले सायन्स पार्क, गणित प्रयोगशाळा तसेच नुतनीकरण करण्यात आलेले गुरुकुल कार्यालय, ग्रंथालय आणि जीव- भौतिक प्रयोगशाळेचे ओपचारिक उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले. यावेळी बोलतांना त्यांनी आपल्या…
साईमत जळगाव प्रतिनिधी संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे (BAPS Temple) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि. १४ फेब्रुवारीला होत आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना प्राप्त झाले आहे. धुळे येथील स्वामी नारायण मंदिराचे प्रमुख आनंद स्वामीजी महाराज यांनी हे निमंत्रण अशोकभाऊ जैन यांना प्रत्यक्ष येऊन सन्मानपुर्वक दिले. अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांनी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर जमीन दान केली होती. मंदिराच्या बांधकामासाठी ४०० दशलक्ष संयुक्त अरब अमिराती दिरहम इतका खर्च झाल्याचा अंदाज आहे.…
साईमत जळगाव प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील मांडेवेदिगर/भिलमळी/गारखेडा येथील गावकरी शेत जमिन भोगवटा वर्ग (२) ची भोगवटा वर्ग (१) करुन रितसर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करून मिळाव्या या मागणीसाठी जळगाव येथे आमरण उपोषणास बसले आहे. दि. १३ रोजी भाजपाचे जळगाव पुर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी उपोषणस्थळी गावकऱ्यांची भेट घेत चर्चा केली. सकारात्मक चर्चा होऊन गावकऱ्यांनी उपोषण मागे घेण्यास होकार दिला. यावेळी अमोल जावळे यांनी उपोषण कर्त्यांना सरबत देऊन उपोषण सोडविले. भुसावळ तालुक्यातील मांडेवेदिगर/भिलमळी/गारखेडा येथील शेत जमिन भोगवटा वर्ग (२) ची भोगवटा वर्ग (१) करुन रितसर ७/१२ उताऱ्यावर नोंदी करून मिळाव्या या मागणीसाठी गावकरी आमरण उपोषणास बसले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांना…
साईमत जळगाव प्रतिनिधी डाळ उद्योग, चटई उद्योग, पाईप व ड्रिप उद्योग अशा विविध उद्योगांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जळगावचे नाव गगनभरारी घेत असतांना आता स्मार्ट फार्मास्युटिकल्सने जळगावचे नाव फार्मा क्षेत्रातसुद्धा गाजवले आहे. लघु उद्योग क्षेत्रातील फार्मा मधील शासनाच्या ‘‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट एक्सपोर्टर’’ हा पुरस्कार एक नव्हे दोन नव्हे तर सलग ४ वर्षांसाठी म्हणजे सन २०१८-१९, २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ साठीचा हा पुरस्कार स्मार्ट फार्मास्युटिकल्सने प्राप्त केला आहे. पुणे येथे नुकतेच झालेल्या समारंभात राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत, यांच्या हस्ते तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एम.आय.डी.सी.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उद्योग विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदींच्या उपस्थितीत हॉटेल टिपटॉप येथे…
साईमत जळगाव प्रतिनिधी समाज चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.डी.कोळी यांना महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्यातर्फे नुकतेच बहिणाबाई साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय “आदर्श समाजसेवक पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले. समाज चिंतामणी प्रतिष्ठान संस्था गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील आदिवासी,अनाथ,गरीब, गरजू, वृद्ध अशा विविध घटकांसाठी कार्य करत आहे. या कार्याची दखल घेऊन संस्थापक अध्यक्ष आर. डी.कोळी यांना डॉ. अरविंद नारखेडे यांच्या हस्ते माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, मायाताई धुप्पड, वा.ना.आंधळे, भास्करराव चव्हाण, डॉ. शैलजा करोडे, विलास नारखेडे, विजय लुल्हे, तुषार वाघुळदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.