पलोड स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप सोहळा उत्साहात

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप सोहळा दि. ९ फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. नर्सरी पासून ते दहावीपर्यंत विवेकानंद प्रतिष्ठानच्या मुलभूत तत्वानुसार सर्वांग अष्टपैलू व्यक्तित्व घडवले जाते. हे संस्कार घेऊन ती मुले समाजात स्थापित करून एक नवे अथांग असे मुक्त आकाश यांच्या प्रगतीसाठी खुले झाले आहे. या भूमिकेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय सदस्य धनंजय जकातदार, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर गोरे हे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे तथा शाळेचे प्राचार्य प्रविण सोनावणे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी मिलिंद पुराणिक, शाळेच्या मार्गदर्शिका संगीता तळेले, समन्वयिका स्वाती अहिरराव, सह समन्वयक विकास कोळी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये सिद्धी राणे.आर्या चौधरी ‘ मृदुला महाले यांनी नृत्य सादर केले तर ओजस्विनी देसले हिने गीत सादर केले . यानंतर जान्हवी शेंडे, सई देसले, तनुष भंगाळे यांनी शाळा व शाळेतील शिक्षक यांच्यामुळे आपले व्यक्तिमत्व कसे बदलत गेले हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर शिक्षकांच्या वतीने अतुल मनोहर, संगीता तळेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे सहसचिव विनोद पाटील , विवेकानंद प्रतिष्ठानच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , ज्ञानेश्वर वाघ, शशिकांत पाटील, हेमराज पाटील , किशोर पाठक, उमाकांत इंगळे . प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे, प्रतिष्ठानचे सांस्कृतिक विभाग प्रमुख किरण सोहळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इम्रान खाटिक यांनी केले .तर आभार प्रदर्शन मनोज भादुपोता यांनी केले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here