रायसोनी पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गुणदर्शनाचे सादरीकरण केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म.न.पा आयुक्त डॉ विद्या गायकवाड, जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल , सल्लागार प्रेमदादा रायसोनी आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त डॉ विद्या गायकवाड म्हणाल्या की “रायसोनी पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी यांनीं सादर केलेले नाटक, गीते आणी नृत्य यातून जो सर्व धर्म समभाव हा एक मौलिक देशभक्तीपर विचारांची जनजागृती तसेच देशाचा इतिहास व भारतीय संस्कृतीचे दर्शन विध्यार्थ्यानी घडविले. हे कार्यक्रमाचे विशेष. आणी ही स्कूल हा संस्कार विद्यार्थ्यांवर पेरत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो” असे म्हणुन त्यांनी विद्यार्थी, शिक्षक व स्कूलच्या व्यवस्थापक मंडळाचे कौतुक केले.
प्रास्ताविकजी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी केले. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचे संचालक श्रेयस रायसोनी यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here