एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीला राज्य स्पर्धेत ७ पदके

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

केसीई सोसायटीच्या एकलव्य क्रीडा संकुलातील एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीमध्ये सराव करणाऱ्या १०खेळाडूंची समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुल, शेगाव येथे झालेल्या २३ व्या एरोबिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघात निवड झाली होती. सदर स्पर्धा या महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या मान्यतेने झाल्या.

या स्पर्धेत विविध वयोगटात उत्कृष्ट कामगिरी करत एकलव्य जिम्नॅस्टिक्स अकॅडमीच्या खेळाडूंनी ५ रौप्य आणि २ कांस्य पदके जिंकली. सदर स्पर्धेत गायत्री देशपांडे व कृष्णाई रेंभोटकर या अनुभवी खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केली, तर नवोदित खेळाडूंपैकी नमित दळवी, आयुष वंजारी व माही फिरके यांनी पदार्पणातच उत्कृष्ट कामगिरी केली.
महिला एकेरी प्रकारात अनुष्का चौधरीने चतुर्थ स्थान प्राप्त केले, तर पुरुष एकेरी प्रकारात नमित दळवी व कैवल्य जोशी यांनी अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान पटकावले. या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. निलेश जोशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच सोबत डॉ. निलेश जोशी यांनी स्पर्धेतील पंच मंडळाची देखील जबाबदारी सांभाळली. या यशाबद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, जळगाव जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटना सचिव प्रवीण पाटील, अक्षय सोनवणे तसेच सर्व पालकांनी खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here