नुतन तहसीलदार शीतल राजपूत यांचे नानाश्री फाऊंडेशनतर्फे स्वागत

0
1

साईमत जळगाव प्रतिनिधी

जळगाव येथे नव्याने बदलून आलेल्या तहसीलदार शीतल राजपूत यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून नानाश्री फाऊंडेशनतर्फे त्यांचे जळगावनगरीत स्वागत करण्यात आले.

जळगावचे तहसीलदार नामदेव पाटील यांची अलीकडेच बदली झाली होती. यानंतर त्यांच्या जागी फुलंब्री येथून शीतल राजपूत यांची बदली झाल्याचे शासकीय आदेश जारी करण्यात आले होते. यानंतर त्यांनी नुकतेच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून जळगाव ग्रामीणतर्फे नानाश्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी पदाधिकारींनी तालुक्यातील सर्वात मोठी समस्या वाळूचोरी संदर्भात राजपूत यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजपूत यांनी गावागावातील जनतेने खासकरून तरुणाईने स्थानिक पातळीवर एकत्र येऊन याबाबतीत लढा उभारण्याचे सांगितले. तसेच मी स्वतः याविषयी दखल घेऊन गस्त घालणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले.
यावेळी नानाश्री फाऊंडेशनचे नंदकिशोर सोनवणे, संभाजी सपकाळे, आनंदा कोळी, नरेंद्र सोनवणे, स्वप्निल सोनवणे, अजय सोनवणे, प्रमोद सपकाळे, रितेश कोळी, गोपाळ महाजन आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here