साईमत जळगाव प्रतिनिधी येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पायरेक्सीया २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ झाला. नेत्ररोग तज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केलेल्या गोलंदाजीवर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी चेंडू टोलवित स्पर्धेला सुरूवात करून दिली. तसेच डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी देखिल जोरदार फलंदाजी करीत स्पर्धेच्या प्रारंभात रंगत आणली. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन केले. या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नेत्ररोग तज्ञ तथा केशव स्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. धर्मेंद्र पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे…
Author: Saimat
साईमत जळगाव प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रासायनिक तंत्रज्ञान प्रशाळेत नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात प्रा.डॉ.जी.ए.उस्मानी यांना “लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” देण्यात आला. प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.जे.बी.नाईक, सुहान्स केमिकल्स जळगावचे संचालक, उद्योजक संदीप काबरा व रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गनी मेमन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेली ३० वर्षे अध्यापन, विद्यापीठात वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची संकल्पना रुजवणे, विद्यापीठाचे विविध स्तरावर त्यांनी केलेले प्रतिनिधित्व, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचलन, कवी, लेखन, उद्बोधक अशा अनेक गोष्टींमध्ये आपला ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
साईमत जळगाव प्रतिनिधी नशिराबादला कोट्यवधीची कामे कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची भक्कम साथ यामुळेच सर्वसमावेशक विकास होत आहे. मतदार हाच माझा समाज असून विकास हेच माझे ध्येय आहे. एकीकडे कामे सुरू असतांना तुम्ही विरोधाला विरोध म्हणून कितीही टिका करा; मी विकासकामे करत राहणार असून टिकेला विकासकामातून उत्तर देत आहे. ग्रामविकासात विघ्न आणणाऱ्यांना झूगारून विकास कामे करीत असून विकास कार्यात खोडा घालणाऱ्यांना जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. 57 कोटीची पाणी योजना मंजूर झाली असून पाण्याचे आरक्षणावरील शिक्कामोर्तब झाला आहे. त्याचा जीआर सुद्धा याप्रसंगी दाखवण्यात आला. नाशिराबादाचा प्रत्येक माणूस हा “आपला माणूस” असल्याने गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच 70 कोटींच्याभुयारी…
साईमत जळगाव प्रतिनिधी रुग्ण सेवेत रुग्णवाहिकेचे अनन्य साधारण महत्व असून रुग्णवाहीकेमुळे रुग्णांना जलद गतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे.शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा , आवश्यक साधन सामग्री मिळवून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सजग राहावे.असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय अशा 25 रुग्णालयाचे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त 77 आरोग्य आरोग्य केंद्र असे मिळून 102 रुग्णालयामध्ये नवीन यंत्र सामुग्रीचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण…
साईमत जळगाव प्रतिनिधी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन ३ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपुर्व अशी एकुण ३५०७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. न्यायाधीश वृंद, वकिल वृंद, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजुचे पक्षकार यांचे मदतीने २६४५ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत ८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये १६५,६०,३६,३०१/- वसुल करण्यात आले. दिनांक २७/०२/२०२४ ते दि. ०२/०३/२०२४ पर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी न्यायाधीश एन. जी. देशपांडे याचे पॅनल…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ खान्देश सेंट्रल परिसरात असलेल्या संत बाबा हरदासराम कॉम्प्लेक्समध्ये दुकाने खरेदीसाठी जळगावातील दोन व्यापारी भावंडांनी ३ कोटी ७३ लाख रुपये दिले होते. अनेक वर्ष होऊनही दुकाने मिळत नसल्याने तसेच दिलेली रक्कमही परत न दिल्याने शहर पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून बांधकाम व्यावसायिक साहित्या परिवारातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील फुले मार्केटमध्ये महेंद्र रोशनलाल नाथानी (५०) व त्यांचे भाऊ आनंद नाथानी यांचे कपड्याचे दुकान आहे. महात्मा फुले मार्केटमधील गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ते दुसरीकडे दुकान घेण्याच्या विचारात होते. एका कार्यक्रमात त्यांची बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांच्याशी भेट…
साईमत जळगाव प्रतिनिधी गावाच्या एकीच्या जोरावर गावातील कोणते काम अशक्य नाही. आता निवडणूक संपली असल्याने गावातील मतभेद विसरून गावाची एकजूट कायम ठेवून एकोप्याने “गावाचा विकास ” साध्य करा. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून , बंजारा तांड्यातील उर्वरित विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असून रामदेववाडी ते कुऱ्हाडदे रस्त्याचे डांबरीकरण करून त्यासाठी ४ कोटीचा निधी लवकरच मंजूर करणार असून शेती रस्त्याना प्राधान्य देवून गाव अंतर्गत गटार बधाकामासाठी व रस्ते काँक्रिटीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ठेवावी. असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते रामदेववाडी…
साईमत जळगाव प्रतिनिधी खान्देश कॉलेज ऑफ एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्वयंम २ के २४ स्नेहसंमेलन जल्लोषात सुरू आहे. यात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण सुरू आहे. यानिमित्त ६ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या स्नेहसंमेलनात रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. मॅनेजमेंट पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी विभागातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत ४८, मेहंदी स्पर्धेत ५२, संगीत खुर्ची स्पर्धेत १२० स्पर्धक, तर अंताक्षरी स्पर्धेत १२ समूह सहभागी झाले. कार्यक्रमादरम्यान सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अंताक्षरी स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड डे, चॉकलेट डे, हैलोवीन डे,…
साईमत जळगाव प्रतिनिधी वैद्यकीय महाविद्यालयात ३ मार्च रोजी नवजात बालकांना ‘ दो बुंद ‘ पोलीओ लसीचा डोस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देऊन पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर उपस्थित होते. देशभर ३ मार्च रोजी पल्स पोलीओचे नवजात पालक ते पाच वर्षाच्या बालकांना हा डोस देण्यात येतो. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणाचे डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या नियोजनात हे काम सुरु आहे.
साईमत जळगाव प्रतिनिधी के.सी.ई सोसायटीच्या पी. जी. कॉलेज येथे वाषिर्क स्नेहसंमेलन ‘ह्रिदम-२४’ अंतर्गत मोफत रक्त तपासणी शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. केतन नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा लाभ १३५ जणांनी घेतला. या वेळी प्राचार्य डॉ.व्ही. एस. झोपे, समन्वयक डॉ. आर. एम. पाटील, प्रा. संदीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महालॅब एच.एल.एल.चे धीरज पानपाटील, भावना पाटील, चेतन धनगर, संदीप सुरवाडे व इतर यांनी रक्त तपासणी चाचण्यांसाठी योगदान दिले. रक्त तपासणी शिबिरात मधुमेह निदानासाठी रक्तातील साखर, सीबीसी काउंट आदींचे मूल्यांकन करण्यात आले. ॲनिमिया, लूकेमिया सारख्या अनेक प्रकारचे विकार ओळखण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात…