आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांचा प्रारंभ

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर पायरेक्सीया २०२४ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ झाला. नेत्ररोग तज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केलेल्या गोलंदाजीवर माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी चेंडू टोलवित स्पर्धेला सुरूवात करून दिली. तसेच डीन डॉ. प्रशांत सोळंके यांनी देखिल जोरदार फलंदाजी करीत स्पर्धेच्या प्रारंभात रंगत आणली.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित या क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील ३२ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन केले.
या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नेत्ररोग तज्ञ तथा केशव स्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. धर्मेंद्र पाटील हे उपस्थित होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. पियुष वाघ, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते केक कापून आणि चषकाचे अनावरण करून स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. पहिला सामना लातूर विरूध्द बीएचएमएस महाविद्यालय जळगाव या संघांमध्ये खेळला गेला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here