केसीई सोसायटीचे इंजिनियरिंग व मॅनेजमेंट महाविद्यालयात रंगतेय स्नेहसंमेलन 

0
2

साईमत जळगाव प्रतिनिधी

खान्देश कॉलेज ऑफ एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात स्वयंम २ के २४ स्नेहसंमेलन जल्लोषात सुरू आहे. यात विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची उधळण सुरू आहे. यानिमित्त ६ मार्च पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

या स्नेहसंमेलनात रांगोळी, मेहंदी, संगीत खुर्ची, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. मॅनेजमेंट पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकी विभागातून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत ४८, मेहंदी स्पर्धेत ५२, संगीत खुर्ची स्पर्धेत १२० स्पर्धक, तर अंताक्षरी स्पर्धेत १२ समूह सहभागी झाले.
कार्यक्रमादरम्यान सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अंताक्षरी स्पर्धेत सहभागी होऊन सर्वांचे लक्ष वेधले. सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूड डे, चॉकलेट डे, हैलोवीन डे, साडी डे, ट्वीन डे अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाच्या प्राचार्या जयश्री नेमाडे होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असलेले सुप्त गुण तसेच नवनवीन तंत्रज्ञान कौशल्य याचा उपयोग करण्यास सांगितले. याच दिवशी बॉलिवूड डे साजरा केला गेला.
यावेळी प्राचार्य डॉ.संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. प्रज्ञा विखार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉ.श्रीकांत तारे, पॉलिटेक्निक समनव्यक डॉ.सी.एस. पाटील व सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्नेहसंमेलन प्रमुख चेतन पाटील, सचिन नाथ व इतर प्राध्यापक व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here