राष्ट्रीय लोक अदालतीत ३५०७ प्रकरणे निकाली

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन ३ मार्च रोजी जिल्हा न्यायालयात करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपुर्व अशी एकुण ३५०७ प्रकरणे निकाली काढण्यात आले.

न्यायाधीश वृंद, वकिल वृंद, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजुचे पक्षकार यांचे मदतीने २६४५ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत ८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्यामाध्यमातुन एकुण रक्कम रुपये १६५,६०,३६,३०१/- वसुल करण्यात आले. दिनांक २७/०२/२०२४ ते दि. ०२/०३/२०२४ पर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्ह मध्ये एकुण ७०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
दिवाणी न्यायाधीश एन. जी. देशपांडे याचे पॅनल क्रमांक ४ ने घटस्पोट प्रकरणी समोपुदेशानातून पती – पत्नी मध्ये समेट घडुन आणला त्यांनी आपआपसातील मतभेद विसरुन पुन्हा नव्याने संसाराची सुरुवात करण्याचे ठरविले. आज रोजी घटस्फोट घेण्याचे प्रकरणांची संख्या बघता’ सदर प्रकरण घटस्फोट घेणा-या पक्षकारांसाठी एक आदर्श ठरणार आहे त्यामुळ या दांमत्यांचे सवत्र कौतुक होत आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यु.एस.एम. शेख यांच्या मार्गदर्शनात जिल्हा न्यायाधीश-१ एस. एन. राजुरकर, जिल्हा न्यायाधीश-२ बी. एस. वावरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. पी. सय्यद, जिल्हा वकिल संघांचे अध्यक्ष अॅड. रमाकांत आर. पाटील, जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. अनिल पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता एस. जी. काबरा, पॅनल न्यायाधीश एस. आर. पवार, जे. जे. मोहिते, पी. पी. नायगांवकर , एन.जी. देशपांडे, आर. वाय. खंडारे, आर. आय. सोनवणे , वसीम देशमुख , जिल्हा वकील संघाचे सचिव अॅड कल्याण पाटील, लोकअभिरक्षक कार्यालय प्रमुख अॅड. अब्दुल कादीर, उप मुख्य लोकअभिरक्षक मंजुळा मुंदडा व त्यांचे सहकारी, पॅनल अॅड. स्मिती आर. झाल्टे, अॅड संदीप एस. ठाकरे, अॅड अजय पी. पाटील, अॅड नेहा खैरनार, अॅड रोहिना शेख, अँड प्रकाश पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधिक्षक सुभाष एन. पाटील, कनिष्ठ लिपीक आर. के. पाटील, कनिष्ठ लिपीक प्रमोद ठाकरे, गणेश निंबोळकर, हर्षल नेरपगारे, जयश्री पाटील, पवन पाटील, राहुल माकोडे, प्रकाश काजळे, सचिन पवार आदिंनी परीश्रम घेवुन लोक अदालत यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here