Author: Saimat

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालेला असून त्या संदर्भात तक्रार केल्याचा राग आल्याने एकाने दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा ग्रामपंचायत येथे मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याच्या कारणाने संविधानिक मार्गाने जनतेच्या समोर आर्थिक घोटाळा आणण्यासाठी तसेच वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पिंप्राळा येथील राहुल गोपाळ झाल्टे तसेच मुक्ताईनगर येथील सईद खान शब्बीर खान यांनी तक्रारी केली त्यामुळे पिंप्राळा येथील रामकृष्ण उर्फ मिलिंद झाल्टे यांच्या विरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान राहुल झाल्टे यांनी पिंप्राळा ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झाला संदर्भात 2 मे 2024 रोजी…

Read More

साईमत प्रतिनिधी (विवेक ठाकरे) राज्याचे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पुण्याहून नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर कृषी विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून, डॉ. प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार घ्यावा, असे म्हटले आहे. डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. डॉ. प्रवीण गेडाम यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत नाशिक मनपा आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगले परिचित आहे. शिवाय, त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे…

Read More

साईमत चोपडा प्रतिनिधी रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्यातर्फे आयोजीत कायरोप्रॅक्टिस ट्रीटमेंट शिबीर शहरातील हरेश्र्वर कॉलनी येथील रोटरी भवन येथे संपन्न झाले. ७ दिवस चाललेल्या शिबिराचा तब्बल ७५० रुग्णांना लाभ झाला असून, अनेक रुग्णांना अनेक वर्षांच्या जुन्या दुखण्यापासून मुक्तता मिळाली आहे. यावेळी शिबिरात कुठल्याही प्रकारची गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी, सायटिका, ऍसिडिटी, पोट साफ न होणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना सेवा देण्यात आली. कायरोप्रॅक्टिस थेरपीस्ट डॉ. संदीप नायक, डॉ. राजकुमार सिंगानिया आणि त्यांच्या टिमने सात दिवस सदर कॅम्प घेतला. शरीराच्या नर्वस सिस्टीम आणि हाडांमध्ये आलेल्या त्रासाला ठीक करणाऱ्या या उपचाराचा असंख्य रुग्णांनी लाभ घेतला. कुठल्याही प्रकारचे मेडिसिन अथवा औषध न…

Read More

सकाळी वृत्तपत्रात बातमी वाचली. लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यामुळे मनात विचार आला, आता जाऊन पाहिलंच पाहिजे. रूम पासून प्रदर्शन जवळच असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी प्रदर्शन पाहायला गेलो. अनेक वेगवेगळी आणि आकर्षक चित्र त्या ठिकाणी लागलेली दिसली. प्रत्येक चित्र एक खूप मोठा अर्थ घेऊन डोळ्यासमोर येत होते. त्या चित्रातून चित्रकार आपलं मत आणि आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होता. जशी लेखकाची ताकद लेखणी असते तशीच चित्रकाराची ताकद पेन्सिल असते. तिथे काही लोक चित्रावरून किंमत ठरवत होते. पण मला वाटतं कलेमध्ये भाव करणं हे कलाकारासाठी अपमानास्पद असतं. पण हे त्यांना कोण सांगणार, असो… चित्र पाहत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी जळगावमध्ये मत मोजणी नंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन्स सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेल्या त्या स्ट्रॉंग रूमचे CCTV काही वेळेसाठी बंद पडल्याने चांगलाच गोंधळ उडाला परंतु काही मिनिटातच परिस्थिस्ती पूर्वपदावर आली. वीज पुरवठा खंडित झाल्याच्या कारणाने CCTV चे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाल्याचं प्रशासनाने सांगितलं. मात्र व्हिडीओ चित्रिकरण बंद पडल्यानंतर देखील सुरुच होते, असं प्रशासनान कडून सांगण्यात आले. घडलेल्या या सर्व परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी यांनी सविस्तररित्या सांगितली, चार मिनिटांसाठी डिस्प्ले बंद होते, परंतु व्हिडीओ रेकॉर्डिंग ही सुरुच होती. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सर्व रेकॉर्डिंग दाखवण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची तक्रार नाही. असा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले

Read More

साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी  तालुक्यातील काकोडा येथील रहिवाशी मेंढपाळ नामदेव चोपडे, भरत मदने, भोजू मदने, ज्ञानेश्वर मदने यांचे सर्वांचे मिळून जवळपास 90 ते 100 मेंढी पशुधन उष्मघात मुळे थेरोळा शिवारात मृत्यू मुखी पडलेल्या होत्या. घटनेची माहिती कळताच त्याठिकाणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तहसीलदार गिरीश वखारे , पशू वैद्यकीय अधिकारी यांची 8 ते 9 जणांची टीम, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सोबत घेऊन भेट दिली. या घटनेची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉल वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री डॉ राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना फोन द्वारे दिली. शासन व प्रशासन आपणास सर्वोतोपरी आपणा सोबत…

Read More

साईमत ओझर प्रतिनिधी एकीकडे प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणत एस टी महामंडळ हात दाखवा गाडी थांबवा या पद्धतीने विविध उपक्रम राबवत असताना मात्र काही चालक त्या उपक्रमांचा फज्जा उडवताना दिसत आहे. त्याच झालं असं शुक्रवार दि २४ मे रोजी एक महिला प्रवाशी आडगाव नाका नाशिक येथे दुगाव ता चांदवड येथे जाण्यासाठी नाशिक मनमाड बस ची वाट बघत असताना मनमाड आगाराची बस क्रं एम एच 20 बी एल 3668 ला थांबविण्यासाठी हात केला परंतु संबंधित चालकाने त्याकडे बघून ही बस न थांबावता पुढे नेली, संबंधित महिलेच्या नातेवाईकाने मोटारसायकल ने पाठलाग करून अमृतधाम जवळ बस थांबविली असता बस मध्ये फक्त थोडेच प्रवाशी असल्याचे दिसून…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी वीट भट्टी चालकाकडून २५ हजार रुपयाची लाच घेतल्याचे मौजे शिवरे दिगर येथील महिला तलाठी वर्षा काकुस्ते यांनी कबुल केल्याने, धुळे लाच लूचपत विभागाच्या पथकाने चौकशीअंती त्यांच्या विरुध्द कारवाई करत पाचोरा पोलीस स्थानकात शुक्रवार दि.२४ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर, येथील रहिवासी तक्रारदार यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असुन त्यांना विट उत्पादनासाठी मातीची आवश्यकता असल्याने मातीची वाहतुक करण्याकरीता त्यांनी वर्षा काकुस्ते, तलाठी मौजे शिवरे दिगर यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्या…

Read More

साईमत मुंबई प्रतिनिधी 17 मे गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे उन्हाचा पार कायम आहे तर कुठे अवकाळी पाऊस बरसतोय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार असून येत्या 20 मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असा आहे हवामानाचा अंदाज  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 20 मेपर्यंत अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. असे असताना दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या…

Read More

जळगाव : परेश बऱ्हाटे सध्या लोकसभेची धामधुम सुरू असून राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदान आटोपले असून आता सर्वांना निकालाची उत्सुकता असतांनाच भाजपाचे संकटमोचक तथा ग्रामविकास मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस उद्या १७ मे रोजी आहे. खरं तर, आचारसंहिता असल्यामुळे या वाढदिवसाच्या सेलीब्रेशनवर बऱ्याच प्रमाणात मर्यादा येणार असल्या तरी हजारो कार्यकर्ते आणि लाखो चाहत्यांच्या ह्रदयसिंहासनावर विराजमान झालेल्या जननायकाचा हा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे घटक हे अर्थातच पैसा आणि जातीचे पाठबळ हे होय. याच्या बळावरच कुणालाही यशस्वी राजकारणी होता येते मात्र या दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारचे भक्कम…

Read More