केसीईच्या पी.जी.त रक्त तपासणी शिबिर

0
3

साईमत जळगाव प्रतिनिधी

के.सी.ई सोसायटीच्या पी. जी. कॉलेज येथे वाषिर्क स्नेहसंमेलन ‘ह्रिदम-२४’ अंतर्गत मोफत रक्त तपासणी शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. केतन नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिराचा लाभ १३५ जणांनी घेतला.

या वेळी प्राचार्य डॉ.व्ही. एस. झोपे, समन्वयक डॉ. आर. एम. पाटील, प्रा. संदीप पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच महालॅब एच.एल.एल.चे धीरज पानपाटील, भावना पाटील, चेतन धनगर, संदीप सुरवाडे व इतर यांनी रक्त तपासणी चाचण्यांसाठी योगदान दिले. रक्त तपासणी शिबिरात मधुमेह निदानासाठी रक्तातील साखर, सीबीसी काउंट आदींचे मूल्यांकन करण्यात आले. ॲनिमिया, लूकेमिया सारख्या अनेक प्रकारचे विकार ओळखण्यासाठी रक्ताचे नमुने घेण्यात आले.

रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. या शिबिराचा लाभ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालय परिसर व परिसर बाहेरील नागरिकांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here