येवला ः प्रतिनिधी नाफेडचा कांद्या विक्रीसाठी बाहेर पडू देणार नाही, वेळ पडल्यास तो जाळून नष्ट केला जाईल, असा इशारा देतानाच आयकर व ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीनंतर जर कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या तर त्यांचे हात तिथेच छाटू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष ललित बहाळे यांनी येथे दिला. येथील बाजार समिती आवारात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे कांदा उत्पादन व व्यापार परिषद झाली. राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. येत्या 30 जूनपर्यंत वाणिज्य तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची भेटीसाठी वेळ मागण्यात येईल. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन संसदेला घेराव घालण्याचा इशाराही ज्येेष्ठ नेते…
Author: Saimat
पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या आई हिराबेन (heeraben modi) या शनिवारी (१९ जून ) रोजी १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने नरेंद्र मोदी हे आईची भेट घेणार आहेत. गांधीनगर मनपा यावेळी एका रस्त्याला ‘पूज्य हिराबेन मोदी मार्ग’ नाव देणार आहे. हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी, त्य्नाचे मूळ गाव वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही कार्यक्रम सादर करतील. हिराबेन या धाकट्या मुलगा (पंकज) सोबत गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. गांधीनगर येथे येथेही हिराबेन यांचा वाढदिवस घरी साजरा करण्यात येणार आहे. गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचे नाव…
नाशिक ः प्रतिनिधी राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र मान्सून दाखल झाला आहे, परंतु, काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वत्र त्याने दांडी मारली आहे. समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार फूट उंचीपर्यंत असलेल्या स्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युमूलस, क्ल्युमूलस आणि क्युमूलोनिंबस या प्रकारातील ढगांची निर्मिती होत नसल्याने तसेच अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, बुधवारीही मराठवाड्यासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कडक ऊन होते. महाराष्ट्रात मान्सून 11 जून रोजी दाखल झाला असला तरी अनुकूल वातावरण नसल्याने राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होत आहे. खरिपाची तयारी केलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. नैर्ऋत्य मोसमी वारे बुधवारी मराठवाड्याच्या आणखी काही भागात पुढे सरकले…
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 4 महिन्यांनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. काल बुधवारी देशात 12 हजार 133 नवीन रुग्णांची भर पडली. यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी 13 हजार 166 नवीन रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत 7 हजार 601 जणांनी कोरोनावर मात केली असून, 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.गेल्या 24 तासात 4 हजार 24 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 3 हजार 28 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 261…
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ एनडीए व विरोधी आघाडी बहुमताच्या अगदी समीप आहे.विरोधी पक्षही स्वतःला मजबूत म्हणवून घेत आहेत,पण दोघांकडे पुरेसे बहुमत नाही.अशा परिस्थितीत जगनमोहन रेड्डी,नवीन पटनायक आणि केसीआर यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. त्यांच्याशिवाय यूपीए आणि एनडीएचा मार्ग सोपा होणार नाही. छोट्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीए बहुमतापासून 13 हजार मतांनी दूर आहे.रेड्डी किंवा पटनायक यापैकी एकाचा पाठिंबा असेल तर विजय निश्चित होईल. 2017 मध्ये या दोघांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. आता 5 वर्षांनंतर 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीचे चित्र असे असू शकते.सर्वप्रथम,ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबद्दल जाणून घेऊ या… विरोधी पक्षाच्या वतीने पश्चिम बंगालच्या…
यावल प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा मधुकराव चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन यावल व परिसरातील दिव्यांग बांधवांना सायकल वाटपाचा कार्यक्रम दि.15 रोजी सकाळी यावल येथील यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सभागृहात पार पडला.या प्रसंगी जिल्हा परिषद माजी गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व यावल पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, यावल शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड,कृउबाचे माजी सभापती नितिन चौधरी,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीरखान,सकलेन शेख,नईम शेख,हाजी गफ्फार शाह,अजय बढे,पुंडलीक बारी, विक्की गजरे,काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे,कोरपावली सरपंच विलास अडकमोल,माजी सरपंच जलील पटेल,काँग्रेस शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,यावल नगरपरिषदचे माजी नगरसेवक अस्लम शेख,समिर मोमिन,सैय्यद…
ओझर प्रतिनिधी ओझर :- येथील एच ए एल कंपनीच्या सी एस आर निधीतून नव्याने बांधकाम करून देण्यात आलेल्या जि प प्राथमिक शाळेत पहिल्या इयत्तेत दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे पावले उमटवत तसेच त्यांचा सेल्फी फोटो घेत विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव मोठया आनंदात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक विद्यामंदिर मुले क्र २ या शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना आपला शाळेचा पहिला दिवस सदैव स्मरणात रहावा यासाठी विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे उमटविण्यात आले व सेल्फी पॉईंट वर सेल्फी देखील घेण्यात आले.सर्वप्रथम विद्यार्थ्यांसोबत पुस्तकांची दिंडी वाजत गाजत काढण्यात येऊन पहिलीच्या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देत औक्षण करत स्वागत करण्यात आले.त्यानंतर शाळा पुर्व तयारी भाग २ चेही आयोजन करण्यात…
भारत गौरव योजनेअंतर्गत देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन गुरुवारी सकाळी शिर्डीत दाखल झाली आहे. या ट्रेनला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वे सेवेअंतर्गत खासगी ट्रेन प्रथमच धावली आहे. या पहिल्या खाजगी रेल्वेत ८१० प्रवाशांनी कोईम्बतूर ते शिर्डी असा प्रवास केला आहे. रेल्वे विभागाने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला दोन वर्षांसाठी कराराने दिली आहे. ही ट्रेन चालविणार्या कंपनीने कोचमध्ये नूतनीकरण केलं. या ट्रेनच्या कोईम्बतूर ते शिर्डी अशा महिन्याला किमान तीन फेऱ्या होणार आहे. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण २० डबे आहेत. ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल. ट्रेनमध्ये फ्लेमलेस किचनची…
चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने “जन परिवर्तन पॅनलच्या” प्रचाराचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रामदेवता “आनंदामाता मंदिर” याठिकाणी नारळ फोडून करण्यात आला. यावेळी देवीची आरती करून साकडे घालण्यात आले. जनपरिवर्तन पॅनल “छत्री” निशाणी मिळाली असून सध्या पावसाळा सुरु झाल्याने सर्वसामन्यांना छत्रीची आवश्यकता भासत असते. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण व जनपरिवर्तन पॅनलची छत्री कुणाच्या एकाधिकारशाहीला कात्री लावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. जवळपास एक शतकानंतर चाळीसगाव विकास सोसायटीची निवडणूक होत असून आतापर्यंत राजकीय दबाव टाकून, विविध माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. एकप्रकारे मतदारांचा हक्क त्यांच्यापासून डावलला जात होता. संस्थेच्या शेकडो सभासदांना आपण चाळीसगाव विकास सोसायटीचे…
चाळीसगांव-प्रतिनिधी शाळेतील मुलांमध्ये वृक्षारोपण व पर्यावरणाबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी केडगाव ता.दौंड येथील एक मित्र एक वृक्ष ही संस्था वृक्षसंवर्धनावर आधारित स्पर्धेचे आयोजन करत असते, याच धर्तीवर जलमित्र परिवार चाळीसगांव तर्फे सन २०२० पासून हरित चाळीसगांव चषक या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. वृक्षसंवर्धनासाठीच्या ह्या दोन्हीही स्पर्धांना विद्यार्थ्यांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मुलांना स्थानिक झाडांची माहिती व्हावी, झाडांचे फायदे समजावे यासाठी आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थ्याच्या झाडाची सर्वांगीण वाढ विचारात घेऊनच त्यांना बक्षीस दिले जाईल. ह्यावर्षी दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हरित चाळीसगांव चषक…