जळगाव ः प्रतिनिधी टी. एम. नगर येथील रहिवासी तथा फुले मार्केट व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद टोपणदास मंघवानी (वय 74) यांचे मंगळवारी महाबळेश्वर येथे हृदयविकाराने निधन झाले. सिंधी समाजात उच्चशिक्षित, सुसंस्कृत व सेवाभावी व्यक्तित्व अशी हिरानंद यांची ख्याती होती. ते अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, केशवस्मृती सेवा संस्था समूह, कंवरनगर एज्युकेशन सोसायटी, जनता बँक या संस्थांशी जुळलेले होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, मुलगा, पुतण्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.ते प्रेम मंघवानी यांचे वडील होत.
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी काथार कंठहार वाणी समाज सेवा संघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात त्रैवार्षिक हिशेब, ताळेबंद वाचन व घटना दुरुस्ती करणे यावर चर्चा झाली.त्यानंतर जीवन गौरव पुरस्काराचेे वितरण करण्यात आले.अध्यक्षस्थानी विजय वाणी हे होते. यावेळी म्हाडाचे सभापती संजय केणेकर हे उपस्थित होते. सभेत अनंत वाणी यांना जीवन गौरव, वसंत बाविस्कर, विजय वाणी, सुधाकर वाणी, मुकुंद वाणी, नंदकुमार नांदेडकर, डी. एल. वाणी, मोहनदास वाणी, नारायण वाणी, नंदकिशोर कामळस्कर यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तसेच संजय केणेकर, राजेंद्र फुलंब्रीकर, डॉ. विजय बाविस्कर, दीपाली वाणी, वासुदेव वाणी, अजय कामळस्कर, रेखा वाणी यांनाही सन्मान पत्र देण्यात आले. अनिल वाणी यांनी सूत्रसंचालन…
जळगाव ः प्रतिनिधी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून देशभरात तणाव निर्माण झाला आहे. याबाबत कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करणे, स्टेटस ठेवणाऱ्यांवर पोलिस सुमोटो कारवाई करून गुन्हा दाखल करणार आहेत. पोलिस ठाणे, सार्वजनिक ठिकाणी गैरकायद्याचे लोक गोळा करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. नूपुर शर्मा यांच्या संदर्भात पोस्ट करणाऱ्यांवर संबंधित पोलिस ठाण्यात तीन गुन्हे आत्तापर्यंत दाखल झाले आहेत. तर यावल पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन जमावावर एक गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना गर्दी करणाऱ्यांवर नजर आहे. पोलिस ठाण्यात…
जळगाव ः प्रतिनिधी कापूस लागवडीला वेग आला आहे. गेल्या आठवडाभरात बागायती कापूस लागवडीची लगबग सुरू झाली आहे. तब्बल दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात पाच लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होत असते त्यापैकी दोन लाख हेक्टरवर बागायती कापसाची लागवड होते. यावर्षी ठिबक सिंचनावर ही लागवड वाढली आहे. कापसाला गेल्या हंगामात मिळालेल्या चांगल्या दरामुळे यावर्षी कापसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झालेली आहे. 3 जूनपासून कापसाच्या बियाणे विक्रीवरील बंदी उठवल्यानंतर ठिबकवरील कापूस लागवडीला वेग आला आहे. जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. पावसामुळे वेग… पूर्वमोसमी पावसाने जिल्हाभरात हजेरी लावली आहे. पुढील आठवड्यात मान्सूनचे आगमन होण्याची…
जळगाव ः प्रतिनिधी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यात राबवण्यात आलेला ‘स्कूल कनेक्ट प्रोग्रॅम’सह आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर थेट अभियांत्रिकीत प्रवेश मिळणार आहे. या कारणाने यंदा आयटीआयचे प्रवेश वाढू शकतात. दहावीच्या परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झाला नसला तरी निकालाची वाट न पाहता शासकीय आयटीआयच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध झाली आहे. 17 जूनपासून 21 ट्रेडच्या 940 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 जूनपासून संकेतस्थळावर माहिती पुस्तिका उपलब्ध आहे. त्याचा लाभ इच्छुक विद्यार्थ्यांना घेता येईल. दोन ट्रेड मंजुरीसाठी प्रस्ताव इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, ऑपररेटर मेकॅनिकल मशिनिष्ट ट्रेड वाढीव जागांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दिला आहे. मंजुरीनंतर प्रवेश संख्या वाढेल. 17 जूनपासून अर्ज नोंदणी व निकालानंतर प्रवेश सुरू होतील.…
जळगाव ः प्रतिनिधी महापालिकेत गेल्या चार वर्षांपासून रिक्त असलेल्या शहर अभियंतापदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एम. जी. गिरगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी ते पदभार स्वीकारणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे राज्यमंत्री असताना त्यांनी ओएसडी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. नवनियुक्त शहर अभियंता गिरगावकर हे मूळचे नांदेड येथील असले तरी गेल्या पंधरा वर्षांपासून मुंबईत स्थायिक आहेत. वसई विरार महापालिकेत त्यांची एका वर्षासाठी शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना मजीप्रा येथील मूळ पदावर पदस्थापना मिळाली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी शासनाकडे पत्र पाठवून शहर अभियंतापदी शासकीय अधिकारी नियुक्तीची विनंती केली…
जळगाव ःप्रतिनिधी येथील आयएमए आणि रिजनल व स्टेट ऑर्गन ॲण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेन, केईएम हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान’ जनजागृती या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव आयएमएच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत अवयवदान गरज व प्रक्रिया या विषयी डॉ.अमित भंगाळे यांनी तर ब्रेनडेड संकल्पना याबद्दल डॉ.तेजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली. मानवी अवयवाचे प्रत्यारोपण, त्याविषयीचा कायदा 1994 व सुधारणा या विषयी डॉ.राहुल चिरमाडे यांनी तर डॉ.सचिन सरोदे अवयवदानाविषयीचे व्हिडिओ सादर केले. रोटो, सोटोच्या संचालक व केईएम हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुजाता पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात…
जळगाव ः प्रतिनिधी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये काल विद्यार्थ्यांचे ढोल ताशाच्या गजरात व फुलांचा वर्षावाने स्वागत करण्यात आले. स्माईली पेन्सीलचे वाटप करण्यात आले. कोरोनानंतर पहिल्यांदाच प्रत्यक्ष शाळेत येता आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. अनुभूती स्कूलमधील मुख्याधपकांसह सर्वच शिक्षिक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. शाळेत पहिल्या दिवसापासून हसत-खेळत शिकता यावे यासाठी अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या समाजकल्याणाच्या विचारधारेतून विविध शैक्षणिक उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस कायम स्मरणात राहवा यासाठी भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यशस्वेीतेसाठी शिक्षक- शिक्षकेतर व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
मेष राशी: मेष राशीच्या लोकांसाठी व्यवसायातील मागील कामे मार्गी लावण्यासाठी आजचा काळ उत्तम आहे. तुम्हाला काही नवीन लोक भेटतील, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना बनवू शकता. सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणार्यांसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आज कामाच्या ठिकाणी प्रभाव राहील. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल. आज ८०% नशिबाची साथ आहे. शिवलिंगाला पाणी अर्पण करा. वृषभ राशी: वृषभ राशीच्या लोकांच्या काही सवयी सुधारल्यास तुमचा दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणुकीतून मिळालेल्या पैशाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तारुण्याचा दिवस आनंदात जाईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथे रात्री उशीरा एकाने केलेल्या चाकू हल्ल्यामध्ये तीन तरूण जखमी झाल्याची घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेली माहिती अशी की, १५ १५ जुनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास किनगावातील शाह नामक तरूणाने तौसीफ समीर तडवी (वय१९ ), शरीफ लुकमान तडवी ( वय १९) व सद्दाम नवाज तडवी (वय २०) या तीन युवकांवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला. यात हे तिन्ही तरूण गंभीर जखमी झाले असून तिघांनाी यावलच्या ग्रामीण रुग्णातयात दाखल करण्यात आले आहे. या तिघांवर वैद्यकीय अधिकारी डॉ अमीत तडवी व त्यांच्या आरोग्य कर्मचार्यांनी प्रथमोपचार करून यातील दोन जणांना पुढील उपचारासाठी जळगाव वैद्यकीय विद्यालयात पाठवणार…