मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे. शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे. ही आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (कंसातील आकडे…
Author: Saimat
यावल ः प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात आज साडेबारा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच स्वीकारतांना एका नायब तहसीलदारास रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे.लाच स्वीकारताना पकडण्याची ही त्यांची दुसरी वेळ आहे.मुक्तार फकिरा तडवी असे या नायब तहसिलदाराचे नाव आहे. यावल तहसीलदार कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नसल्याने सर्रासपणे टेबलवर पैसे घेतले जात असल्याची सुद्धा जोरदार चर्चा तालुक्यात आहे नाशिक जवळील सप्तशृंगी देवीच्या परिसरात लाखो रुपये खर्चून एका महसूल अधिकाऱ्याकडून भव्य दिव्य बांधकाम सुरु असल्याचेसुद्धा जळगाव जिल्ह्यात महसूल कार्यक्षेत्रात व राजकारणात बोलले जात आहे.बदली करून आणणाऱ्या लोकप्रतिनिधीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने मतदार संघात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यावल तालुक्यात एक…
जळगाव ः प्रतिनिधी राज्य शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समर्पित आयोगामार्फत होणारे चुकीचे कामकाज तत्काळ थांबविण्यात यावे, अन्यथा अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्यातवतीने राज्यभर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समता परिषदेच्या जळगाव जिल्हा शाखेतर्फे देण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देवून या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. निवेदन देतांना समता परिषदेचे कार्याध्यक्ष वसंत पाटील, युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, हेमरत्न काळुंखे, नितीन महाजन, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, समर्पित आयोगाने सर्वांच्च न्यायालयास अपेक्षित असलेला इंम्पेरिकल डाटा दारोदारी…
जामनेर प्रतिनिधी येथील जामनेरपुरा परिसरातील इंदिराबाई ललवाणी कनिष्ठ महाविद्यालयात सर्व कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांचे आज फुलपुष्प देऊन स्वागत पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी.जी.अत्तरदे, यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रा.विजय पाटील, प्रा.सोनूसिंग पाटील, प्रा.रवींद्र शेले,प्रा.दिनेश न्हावकर, प्रा.मनीषा घडेकर, प्रा.उज्ज्वला सावळे, प्रा.माधुरी तायडे, प्रा.कोमलसिंग परिहार,प्रा.समीर घोडेस्वार(क्रीडा शिक्षक) इ.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई : प्रतिनिधी तुम्ही नवीन एलपीजी गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत. यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी १४५० रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला अधिक ७५० रुपये म्हणजेच २२०० रुपये द्यावे लागणार आहेत. कंपन्यांनी केलेला हा बदल १६ जूनपासून लागू होणार आहे. दोन सिलिंडरसाठी ४४०० रुपये सिक्युरिटी पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलिंडर ७५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला १५०० रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला ४४०० रुपये सिक्युरिटी म्हणून…
फैजपूर l प्रतिनिधी गजानना हॉस्पिटल फैजपूर मध्यरात्री १२ वाजता केले रक्तदान फैजपूर येथील गजानन प्रसुतीगृह हॉस्पिटलमध्ये मोठा वाघोदा येथील माहेर वाशीण महिलेस प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्रीची बारा वाजेची वेळ होती, आणि पेशंट अशक्त असल्यामुळे चार बॅग रक्त पाऊच ची आवश्यकता होती. ती डॉक्टरांनी उपलब्ध करण्यासाठी पेशंटच्या वडील नातेवाईक यांना सांगितले. मात्र मध्यरात्रीचे १२ वाजेची वेळ असल्याने काय करावं तेच उमजेना. अशी अवस्था समोर होती. त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये उपस्थित मोठा वाघोदा येथील प्रगतिशील शेतकरी कुंदन काशिनाथ (गोटू सेंड) यांनी मोठा वाघोदा ग्रामपंचायत चे सरपंच मुबारक (राजू)अलिखा तडवी यांच्या भ्रमणध्वनीवरून कळवली सरपंच यांनी लगेच १२:०५ ला फैजपूर येथील…
नवी दिल्ली ः जेवणाखाण्याचे पदार्थ, फळे-भाज्या आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने ठोक महागाई दर (डब्ल्यूपीआय) 15.88 टक्क्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. हा 30 वर्षांत याचा सर्वात उच्च स्तर आहे.याआधी ठोक महागाई ऑगस्ट 1991 मध्ये यापेक्षा(16.06 टक्के) होता. या वर्षी एप्रिलमध्ये दर 15.08 टक्के आणि गेल्या वर्षी मेमध्ये 13.11 टक्के होता. हा एप्रिल 2021 पासून सतत 14 व्या महिन्यात 10 टक्केवर आहे. सलग तिसऱ्या महिन्यात यात वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक पतधोरण निश्चित करताना किरकोळ महागाई दराच्या आकड्याला प्राधान्य देते.सोमवारी आलेल्या किरकोळ महागाईच्या आकड्यांत मे दरम्यान ही मासिक आधारावर 7.79 टक्के वरून घटून 7.04 टक्के नोंदली आहे मात्र, ही सलग पाचव्या…
नवी दिल्ली ः देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या 24 तासात 8 हजार 826 नवीन रुग्ण आढळले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांची संख्याही 52 हजारांच्या पुढे गेली आहे. इकडे, दिल्लीत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 1000 च्या पुढे गेली आहे. गेल्या 24 तासांत येथे 1,118 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 500 रुग्ण बरे झाले तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, सक्रिय रुग्ण 3,177 आहेत. मध्यप्रदेशात 381 सक्रिय रुग्ण मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 43 नवीन रुग्ण आढळले आहेत.तेथे 1 रुग्णाचा मृत्यू झाला.यानंतर संक्रमितांची संख्या 10,43,221 वर पोहोचली आहे. -19 मुळे एकूण मृतांची संख्या 10,739 वर पोहोचली…
जांजगीर : वृत्तसंस्था छत्तीसगडमधील जांजगीर-चंपा जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या राहुलची 106 तासांच्या बचाव मोहिमेनंतर काल रात्री उशिरा सुटका करण्यात आली.बचावानंतर लगेचच त्याला बिलासपूरच्या अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आले. गेल्या शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहुल 60 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि लष्कराने हे ऑपरेशन अविरत आणि अथकपणे पार पाडले. यादरम्यान त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. हे देशातील सर्वात मोठे बचाव कार्य असल्याचे बोलले जात आहे. खड्ड्यात सापही आला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते. ते राहुलच्या नातेवाइकांच्या संपर्कातही होते. काल रात्री त्यांनी सोशल मीडियावर बचाव कार्याच्या यशाची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मोहिमेदरम्यान एक…
चंद्रपूर येथील इरई धरणावर ५८० कोटी रुपये खर्च करून १०५ मेगावॅटचा तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. १५ महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार असून यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी ५८० कोटींचा खर्च येणार असून याची क्षमता १०५ मेगावॅट असणार आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधले. यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा केला जातो. या धरणावर सौर ऊर्जा पार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून…