Author: Saimat

जळगाव ः प्रतिनिधी कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या जनरल तिकिटाची सुविधा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जाणाऱ्या 167 गाड्यांसाठी 29 जूनच्या मध्यरात्रीपासून जनरल तिकीट सुरू करण्यात येणार आहे. कोरोनापूर्वी जेवढ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा होती तेवढ्या सर्वच गाड्यांमधून प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या 167 गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सामान्य तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच मासिक पासधारकांनाही सुविधा देण्यात आली आहे. 29 जूनच्या रात्री पासून सुविधा 29 जूनच्या मध्य रात्रीपासून जनरल तिकिटाची सुविधा सुरू होत आहे. रेल्वे…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथून जवळ असलेल्या पुरनाड फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास एका ट्रकमधून निर्दयीपणे कत्तलीसाठी गायी घेऊन जाणार्‍या ट्रक व चौघांना ताब्यात घेतले आहे. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातून अनेकदा परराज्यातून गुरांची वाहतूक करणारी वाहने जात असतात. पोलीस अनेकदा या प्रकारच्या धडक कारवाया करत असतात. अशीच एक कारवाई काल रात्री पाऊण वाजेच्या सुमारास तालुक्यातील पुरनाड फाटा येथे झाली आहे. पुरनाड फाट्याजवळून एचआर ५५ डब्ल्यू-८५६१ या क्रमांकाच्या ट्रकमधून गायींची अतिशय निर्दयीपणे वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेले जात असतांनाची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पुरनाड फाट्याजवळ पोलिसांनी या ट्रकला अडविले असता याच्या चालकासह चौघे जण ट्रक टाकून पळण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना पोलिसांनी…

Read More

​मेष राशी : आज मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. एवढेच नाही तर आज तुमची विचारसरणी सकारात्मक असेल. जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल, तर विस्तार योजना अंमलात आणण्यासाठी ही चांगली वेळ आहे. तुमच्या व्यवसायातील काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात. निरोगी पर्याय निवडल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. ​वृषभ राशी: आज वृषभ राशीचे लोकं परीक्षा किंवा स्पर्धेच्या माध्यमातून नोकरी शोधत असतील किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी सतत प्रयत्न करावेत. कार्यक्षेत्रात सहकार्‍यांसोबत काम करा. विशेष काळजी घ्या. सामाजिक सौहार्द आणि प्रतिष्ठा चांगली राहील.…

Read More

ठाणे: प्रतिनिधी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने जामीन मंजूर केला आहे. तिला अॅट्रोसिटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने अखेर तिला जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात २०२०‌ साली अॅट्रोसेटी कायद्याअंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांनी केतकी चितळेला अटक केल्यानंतर तिला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावली होती. ठाणे न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडली. यावेळी युक्तिवाद होऊन तिला २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तर कळवा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे न्यायालयात…

Read More

मुबई : प्रतिनिधी सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी दिग्दर्शित केलेला ‘दे धक्का’ सुमारे 14 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद चित्रपटाला मिळाला होता. ‘दे धक्का’ चित्रपटाने रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान मिळवले होते आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. येत्या 5 ऑगस्ट 2022 रोजी ‘दे धक्का 2’ रिलीज होणार आहे. नुकताच चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित करुन चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. https://www.instagram.com/tv/Ce0OCZmlTMO/?utm_source=ig_web_copy_link ‘थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय…’, म्हणत हा धमाल टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या टीझरमध्ये पुन्हा एकदा…

Read More

हैदराबाद : वृत्तसंस्था काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ED चौकशीवरून देशभरात काँग्रेसतर्फे निदर्शने सुरू आहेत. हैदराबादेत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याशी केलेल्या गैरवर्तानाच्या व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे. रेणुका चौधरी यांनी पोलिसाची थेट कॉलर पकडल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. पोलिस आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्याचा प्रयत्न करत होते, त्यादरम्यान रेणुका चौधरी यांनी पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यांना ओढण्यास सुरुवात केली. यानंतर इतर महिला पोलिसांनी रेणुका चौधरींनी आवरल्यावर त्याची कशीबशी सुटका झाली. काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी देशभरात निषेध करण्यात करण्यात आला. बहुतांश राज्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते राजभवनांना घेराव करत आहेत. तेलंगणामध्ये अशाच एका आंदोलनादरम्यान रेणुका चौधरी यांनी पोलिस…

Read More

मुंबई : प्रतिनिधी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांची तर, राज्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच, विधान परिषद निवडणुकीत भाजप विजय मिळवेल. निवडणुकीत शिवसेनेची 50 टक्के मते भाजपला मिळतील, असा दावा भेटीनंतर नवनीत राणा यांनी केला. विधान परिषदेत भाजप मजबूत होणार राणा म्हणाल्या, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे कुशल नेतृत्व आणि योग्य नियोजनामुळे भाजपला यश मिळाले. विधान परिषद निडवणुकीत भाजप राज्यसभेपेक्षा मोठा विजय मिळवेल. विधान परिषदेत आमदारांचे मतदान हे गुप्त…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील मोहित नगर परिसरातील रहिवासी तथा येथील रिदयम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन रामचंद्र पाटील(वय 38) यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.17 जून रोजी सकाळी मोहित नगरातील राहत्या घरुन निघेल. डॉ.नितीन पाटील हे निष्णांत भूलरोग तज्ञ होते. डॉ.पाटील यांना कोरोना काळात केलेल्या रुग्णसेवेबद्दल मराठी पत्रकार संघातर्फे मुंबई येथे गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना खान्देश रत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. डॉ.नितीन पाटील यांच्या अकस्मात जाण्याने भुसावळ परिसरातील वैद्यकियसह आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते अंत्यत मितभाषी व मनमिळावू म्हणून ओळखले जात होते.

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून, 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि 17 जून रोजी दुपारी 1 वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे तर निकाला संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमावरून माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद…

Read More

चोपडा : प्रतिनिधी आपल्या देशात केंद्र सरकारमार्फत बेरोजगार, दारिद्रय रेषेखालील नागरिक, महिलावर्ग तसेच दिव्यांग बांधव यांना स्वयंरोजगारातुन उपजीविकेसाठी, शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी होणेकरीता तसेच आर्थिक व राहणीमानाचा स्तर उंचावणेकामी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये दिनदयाळ अंतोदय योजना, मुद्रा कर्ज योजनेसह इतर योजनांचा समावेश असतो. मात्र चोपडा शहरात अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ होतांना दिसत नाही अशी ओरड होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करुन लाभार्थ्यांना न्याय देण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून केल्या जात आहे. चोपडा नगरपरिषदमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत शहरातील दिव्यांग, महिला, अल्पसंख्यांक तसेच दारिद्रय रेषेखालील नागरिकांना स्वयंरोजगाराची योजना उपजिवीकेसाठी राबविण्यात येते. परंतु या लाभार्थ्यांना…

Read More