Author: Saimat

हैदराबाद : वृत्तसंस्था काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ED चौकशीवरून देशभरात काँग्रेसतर्फे निदर्शने सुरू आहेत. हैदराबादेत काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याशी केलेल्या गैरवर्तानाच्या व्हिडिओची सध्या चर्चा सुरू आहे. रेणुका चौधरी यांनी पोलिसाची थेट कॉलर पकडल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. पोलिस आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्याचा प्रयत्न करत होते, त्यादरम्यान रेणुका चौधरी यांनी पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून त्यांना ओढण्यास सुरुवात केली. यानंतर इतर महिला पोलिसांनी रेणुका चौधरींनी आवरल्यावर त्याची कशीबशी सुटका झाली. काँग्रेस पक्षातर्फे गुरुवारी देशभरात निषेध करण्यात करण्यात आला. बहुतांश राज्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते राजभवनांना घेराव करत आहेत. तेलंगणामध्ये अशाच एका आंदोलनादरम्यान रेणुका चौधरी यांनी पोलिस…

Read More

मुंबई : प्रतिनिधी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फडणवीस यांची तर, राज्यातील प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच, विधान परिषद निवडणुकीत भाजप विजय मिळवेल. निवडणुकीत शिवसेनेची 50 टक्के मते भाजपला मिळतील, असा दावा भेटीनंतर नवनीत राणा यांनी केला. विधान परिषदेत भाजप मजबूत होणार राणा म्हणाल्या, राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे कुशल नेतृत्व आणि योग्य नियोजनामुळे भाजपला यश मिळाले. विधान परिषद निडवणुकीत भाजप राज्यसभेपेक्षा मोठा विजय मिळवेल. विधान परिषदेत आमदारांचे मतदान हे गुप्त…

Read More

भुसावळ ः प्रतिनिधी शहरातील मोहित नगर परिसरातील रहिवासी तथा येथील रिदयम हॉस्पिटलचे संचालक डॉ.नितीन रामचंद्र पाटील(वय 38) यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.17 जून रोजी सकाळी मोहित नगरातील राहत्या घरुन निघेल. डॉ.नितीन पाटील हे निष्णांत भूलरोग तज्ञ होते. डॉ.पाटील यांना कोरोना काळात केलेल्या रुग्णसेवेबद्दल मराठी पत्रकार संघातर्फे मुंबई येथे गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना खान्देश रत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. डॉ.नितीन पाटील यांच्या अकस्मात जाण्याने भुसावळ परिसरातील वैद्यकियसह आरोग्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते अंत्यत मितभाषी व मनमिळावू म्हणून ओळखले जात होते.

Read More

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून, 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवार दि 17 जून रोजी दुपारी 1 वाजता राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे तर निकाला संदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी समाजमाध्यमावरून माहिती दिली आहे. या परीक्षेसाठी औरंगाबाद…

Read More

चोपडा : प्रतिनिधी आपल्या देशात केंद्र सरकारमार्फत बेरोजगार, दारिद्रय रेषेखालील नागरिक, महिलावर्ग तसेच दिव्यांग बांधव यांना स्वयंरोजगारातुन उपजीविकेसाठी, शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी होणेकरीता तसेच आर्थिक व राहणीमानाचा स्तर उंचावणेकामी अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये दिनदयाळ अंतोदय योजना, मुद्रा कर्ज योजनेसह इतर योजनांचा समावेश असतो. मात्र चोपडा शहरात अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांना लाभ होतांना दिसत नाही अशी ओरड होत आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करुन लाभार्थ्यांना न्याय देण्याची अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून केल्या जात आहे. चोपडा नगरपरिषदमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत शहरातील दिव्यांग, महिला, अल्पसंख्यांक तसेच दारिद्रय रेषेखालील नागरिकांना स्वयंरोजगाराची योजना उपजिवीकेसाठी राबविण्यात येते. परंतु या लाभार्थ्यांना…

Read More

येवला ः प्रतिनिधी नाफेडचा कांद्या विक्रीसाठी बाहेर पडू देणार नाही, वेळ पडल्यास तो जाळून नष्ट केला जाईल, असा इशारा देतानाच आयकर व ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाढीनंतर जर कांदा व्यापाऱ्यांवर धाडी टाकल्या तर त्यांचे हात तिथेच छाटू असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष ललित बहाळे यांनी येथे दिला. येथील बाजार समिती आवारात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेतर्फे कांदा उत्पादन व व्यापार परिषद झाली. राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. येत्या 30 जूनपर्यंत वाणिज्य तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांची भेटीसाठी वेळ मागण्यात येईल. त्यानंतरही वेतन न मिळाल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन संसदेला घेराव घालण्याचा इशाराही ज्येेष्ठ नेते…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या आई हिराबेन (heeraben modi) या शनिवारी (१९ जून ) रोजी १०० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने नरेंद्र मोदी हे आईची भेट घेणार आहेत. गांधीनगर मनपा यावेळी एका रस्त्याला ‘पूज्य हिराबेन मोदी मार्ग’ नाव देणार आहे. हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी, त्य्नाचे मूळ गाव वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही कार्यक्रम सादर करतील. हिराबेन या धाकट्या मुलगा (पंकज) सोबत गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. गांधीनगर येथे येथेही हिराबेन यांचा वाढदिवस घरी साजरा करण्यात येणार आहे. गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचे नाव…

Read More

नाशिक ः प्रतिनिधी राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र मान्सून दाखल झाला आहे, परंतु, काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वत्र त्याने दांडी मारली आहे. समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार फूट उंचीपर्यंत असलेल्या स्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युमूलस, क्ल्युमूलस आणि क्युमूलोनिंबस या प्रकारातील ढगांची निर्मिती होत नसल्याने तसेच अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, बुधवारीही मराठवाड्यासह पश्‍चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कडक ऊन होते. महाराष्ट्रात मान्सून 11 जून रोजी दाखल झाला असला तरी अनुकूल वातावरण नसल्याने राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होत आहे. खरिपाची तयारी केलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. नैर्ऋत्य मोसमी वारे बुधवारी मराठवाड्याच्या आणखी काही भागात पुढे सरकले…

Read More

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 4 महिन्यांनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. काल बुधवारी देशात 12 हजार 133 नवीन रुग्णांची भर पडली. यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी 13 हजार 166 नवीन रुग्ण आढळले होते. गेल्या 24 तासांत 7 हजार 601 जणांनी कोरोनावर मात केली असून, 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.गेल्या 24 तासात 4 हजार 24 रुग्णांची नोंद करण्यात आली असून, 3 हजार 28 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 261…

Read More

नवी दिल्ली ः  वृत्तसंस्था  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ एनडीए व विरोधी आघाडी बहुमताच्या अगदी समीप आहे.विरोधी पक्षही स्वतःला मजबूत म्हणवून घेत आहेत,पण दोघांकडे पुरेसे बहुमत नाही.अशा परिस्थितीत जगनमोहन रेड्डी,नवीन पटनायक आणि केसीआर यांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. त्यांच्याशिवाय यूपीए आणि एनडीएचा मार्ग सोपा होणार नाही. छोट्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीए बहुमतापासून 13 हजार मतांनी दूर आहे.रेड्डी किंवा पटनायक यापैकी एकाचा पाठिंबा असेल तर विजय निश्‍चित होईल. 2017 मध्ये या दोघांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. आता 5 वर्षांनंतर 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीचे चित्र असे असू शकते.सर्वप्रथम,ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याबद्दल जाणून घेऊ या… विरोधी पक्षाच्या वतीने पश्‍चिम बंगालच्या…

Read More