जळगाव ः प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर ईडीतर्फे करण्यात येणाऱ्या कारवाईच्या विरोधात जळगाव जिल्हा काँग्रेसतर्फे काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले. आमदार शिरीषदादा चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी भूपेंद्र जाधव, ज्ञानेश्वर कोळी, जमील शेख, ॲड. अमजद पठाण, सचिन सोमवंशी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच अडवण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दालनात 50 पदाधिकाऱ्यांना सोडण्यास सांगण्यात आले परंतु नंतर अल्पबचत भवनात प्रमुख पदाधिकाऱ्यांना बसण्यात सांगण्यात आले.जिल्हाधिकारी अभिजित…
Author: Saimat
जळगाव ः प्रतिनिधी बांधकामाच्या मंजुरीसाठी मनपाच्या नगररचना विभागाकडे प्रस्ताव दाखल केला जातो. परंतु मंजुरीनंतर प्रत्यक्षात नकाशाप्रमाणे बांधकाम केले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहे. आगामी काळात मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्यास संबंधिताना पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही असा इशारा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिला आहेे. गेल्या महिन्यात वास्तुविशारद, आर्किटेक इंजिनिअर यांची बैठक झाली होती.त्यात या संदर्भात सुचना दिल्या होत्या. बांधकाम प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 17 जून रोजी आयुक्तांसह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही बांधकामांची पाहणी केली. त्यात नकाशाप्रमाणे बांधकाम नसल्याचे आढळून आले आहे.
कोल्हापूर : वृत्तसंस्था अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका तरुणाने सोबत राहणाऱ्या महिलेसह दोन मुलांचा गळा दाबून खून केला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव वेलंग शिरंबे येथे ही घटना गुरुवारी (१६ जून) उघडकीस आली. सविस्तर माहिती अशी की, पोलिसांनी दत्ता नारायण नामदास (मूळ रा. राजेबोरगाव, ता. जि. उस्मानाबाद; सध्या रा. वेलंग (शिरंबे) जि. सातारा) याला अटक केली आहे. दत्तासोबत योगिता दत्ता नामदास (३८) दोन मुलांसह राहत होती. तिचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्याने योगिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतर योगिताच्या तनू आणि समीर या दोन्ही मुलांना झोपेतून उठवले आणि मळ्यातील विहिरीत ढकलून दिले. तिघांचे खून करून घराला कडी लावून तो निघून गेला. अकलूज…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विद्यूत कॉलनीत राहणारे ८८ वर्षीय सेवानिवृत्त वृध्दाला इन्शूरन्स कंपनीच्या नावाने ६२ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या सात संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना दिल्ली व उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी शुक्रवार, दि. १७ जून रोजी सायंकाळी माध्यमांशी बोलतांना दिली. सविस्तर माहिती अशी की, “विद्यूत कॉलनीतील रहिवाशी टिकाराम शंकर भोळे (वय-८८) यांच्याशी नोव्हेंबर २०१७ ते २५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दिपका शर्मा, अनुराग शर्मा व कमलाकरन रेही असे नाव…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सैन्यभरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेचा विरोध उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरला. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, तेलंगण, पश्चिम बंगाल, ओडिशा, दिल्लीसह १३ राज्यांमध्ये हिंसाचार व निदर्शने झाली. या राज्यांतील ४० हून अधिक शहरांमध्ये दंगली झाल्या. रेल्वे व रस्ते अडवण्यात आले. दगडफेकीत सर्वसामान्य नागरिक अडकले. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू, १३ जखमी झाले. १६४ रेल्वे रद्द कराव्या लागल्या. ३१६ विस्कळीत झाल्या. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना रेल्वे मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहन केले आहे. हिंसक आंदोलकांबाबत माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.पी. मलिक म्हणाले की, जाळपोळ आणि हिंसाचार करणारे तरुण सैन्यात भरती होण्याच्या लायकीचे…
वडोदरा : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त अहमदाबादला पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या आईचे पाय धुतले, त्यानंतर डोळ्यांना पाणी लावून आईची पूजा केली आणि आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदींच्या आईनेही वाढदिवसानिमित्त भेटायला आलेल्या मुलाचे तोंड गोड केले. आई हीराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी अहमदाबादला पोहोचले, त्यांनी आईचे पाय धुतले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईचे पाय धुतल्यानंतर पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले. प्रत्येक वाढदिवसाला पंतप्रधान मोदी त्यांच्या आईसोबत असतात, शनिवारीही ते त्यांच्यासोबत होते. पंतप्रधान मोदींनी आई हीराबेन यांना वाढदिवसानिमित्त शाल देऊन त्यांचे तोंड गोड केले. गुजरातमध्ये मातृशक्ती योजनेची सुरुवात शनिवारी पावागड येथील महाकालीचे दर्शन घेतल्यानंतर मोदी हे हेरिटेज वनातील लोकांची भेट…
पाचोरा ; प्रतिनिधी तालुक्यातील आखतवाडे येथील एका ४५ वर्षीय महिलेला किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली असून पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील फिर्यादी विरुध्ददेखील आरोपींनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे की, “पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथील अलकाबाई बाबुलाल धिवरे (वय – ४५) यांनी गावातील दौलत देशमुख यांच्या जागेवरुन सोनाबाई कैलास गढरी यांनी दगड उचलून नेल्याचे सांगण्याच्या संशयावरुन आरोपी सोनाबाई कैलास गढरी, दिपाली कैलास गढरी, कैलास नारायण गढरी व परमेश्वर कैलास गढरी सर्व रा. आखतवाडे ता. पाचोरा यांनी फिर्यादी अलकाबाई बाबूलाल धिवरे यांना जातीवाचक शिवीगाळ करत लाठ्या…
मेष राशी: आज मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्ही अतिरिक्त पैसे कमवू शकता. सामाजिकदृष्ट्या सक्रिय लोकांना इतरांना मदत करण्यात आनंद होईल. तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. तुमच्या नवीन कल्पना आणि कार्यशैलीचे कौतुक केले जाईल. आज ६०% नशिबाची साथ आहे. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. वृषभ राशी: आज वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. काही लोकांना तुमची उदारता आवडेल. पैसे कमावण्याच्या संधी मिळतील. न्यायालयीन प्रकरणे तुमच्या बाजूने होतील. नोकरदार लोकांचे सहकाऱ्याशी वाद होऊ शकतात, काळजी घ्या. व्यावसायिकदृष्ट्या, गोष्टी सुरळीत राहतील आणि तुमची चांगली…
जळगाव : प्रतिनिधी येथील ओरीएन इंग्लिशन मेडियम स्कूलमधी विद्यार्थीनी वेदश्री नितीन झोपे हिने दहावी परीक्षेत 94.60 टक्के गुण प्राप्त करून नेत्रदीपक यश मिळविले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वेदश्री झोपे हिला गणित व सायन्स या विषयांची विशेष आवड असून तिने डिप्लोमा करण्याचे ठरविले आहे. तिला प्राचार्य ब्रुस ॲडरसन शिक्षक निलेश पाटीलल शिक्षिका सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. वेदश्रीचे वडील नितीन झोपे हे ए.टी. झांबरे विद्यालयात तर आई वैशाली झोपे या नंदिनीबाई विद्यालयात शिक्षिका आहेत. तिला आई वडिलांचे देखील मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
यावल ः तालुका प्रतिनिधी विनापरवानगी बोगस शिक्षक भरती संदर्भात जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये शिक्षण विभागातील रागिनी चव्हाण, श्रीमती दिपाली पाटील यांनी यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची चौकशी केली.गेल्या 14 जून 2022 रोजी जिल्हा परिषद जळगाव शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमार्फत ही चौकशी करण्यात आली. नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित शिक्षण संस्थेत विना परवानगी बोगस शिक्षक भरती करण्यात आली तसेच संस्था घटना मुद्दा क्र.25अन्वये संस्थेच्या कार्यरत मंडळाचे डिसेंबर2018 मध्ये कार्यकाळ संपला आहे.असे असताना संस्थेचे अध्यक्ष व संस्थाचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी व धर्मादाय सहआयुक्त यांची परवानगी न घेता बिना परवानगीने अनधिकृतपणे बोगस शिक्षक भरती केली असल्याचे आढळून आले आहे.…