मुंबई : गुवाहाटीतील हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर गटातील १५ – १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा पर्यावरण मंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. पण ठाकरे गट हा दावा करत असला तरी प्रत्यक्षात हॉटेलमध्ये सर्व आमदार एकत्रितपणे मजेत राहत असल्याचे अनेक व्हिडीओ व छायाचित्र आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1541474148412600320?s=20&t=3Iu-Ny5aZCigd2RA3LLlHg सोमवारी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, आमच्या संपर्कात नसलेल्या दुसऱ्या गटातील आमदार पळून गेलेले आहे. त्यांच्यामध्ये परत येण्याचे धाडस आणि नैतिकता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकृतीमुळे चोवीस तास काम करणे शक्य नव्हते, तरीही ते काम करत होते. त्या काळात हे षडयंत्र रचलं गेले. ज्यांना पुन्हा…
Author: Saimat
सोयगाव तालुका प्रतिनिधी जलसंधारण विभागाच्या पाझर तलावाच्या सांडव्यावरून शेतकऱ्यांचा शेतीसाठी रस्ता संबंधित ठेकेदाराने बंद करून पर्यायी धरणाच्या खालून करून दिलेला रस्ता हा चुकीच्या पद्धतीचा असल्याने चुकीच्या रस्त्यावरून शेतीची पेरणी केलेली आहे त्यामुळे संबंधित ठेकेदाराने जुना वापरता रस्ता बंद करून चुकीचा रस्ता दिल्याने शेतकऱ्यांची शेतीकडे जाण्यासाठी वापर बंद झालेला आहे त्यामुळे सोमवारी बहुलखेड्यातील संतप्त दोनशे शेतकऱ्यांनी पाझर तलावात जलसमाधीचा निर्णय घेतला होता.शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची कुणकुण लागताच महसूल विभागाने दखल घेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी करून आंदोलन एक दिवसासाठी स्थगित करण्याबाबत विनवणी केल्यावरून शेतकऱ्यांचा आंदोलनाचा झेंडा खाली उतरविला होता परंतु अद्यापही पाझर तलावाच्या घटनास्थळी संबंधित ठेकेदाराने भेट दिलेली नव्हती.त्यामुळे बहुलखेड्यात खळबळ उडाली होती.…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त येत आहे. करोनाची लागण झालेली असली तरी प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. अजित पवार डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1541367049477410824?s=20&t=EwsLRrSMjrbrnB8k4_lppA “कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन” काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
नवी दिल्ली : विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी सुरू केलेली अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद केला. उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल असताना त्यांना अपात्रतेची नोटीस देण्याचा अधिकार आहे काय?, असा सवाल उपस्थित करत उपाध्यक्षांनी पहिल्यांदा बहुमत सिद्ध करावं, नंतर त्यांना नोटीस देण्याचा अधिकार आहे, असं नीरज कौल म्हणाले. तर विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीसीनंतर सदस्यांना उत्तर द्यायला १४ दिवसांचा वेळ द्यायला हवा होता, पण केवळ ४८ तास दिले गेले. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेली नोटीस रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. आता हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. शिवसेनेकडून होत असलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. यासंदर्भात आज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यात आता आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिंदे गट मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहे. एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) फोन करुन सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. मनसेकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. परंतु आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अन्य काही नेत्यांची…
साईमत लाईव्ह मेहुणबारे ता. चाळीसगांव प्रतिनिधी येथील तिरपोळे रोड लगत असलेल्या मारुती मंदिराजवळ बैलगाड्याच्या साह्याने गिरणा नदी पात्रातून वाळू उत्खनन करून याच मंदिराजवळ साठवण करून, वाळू गौण खनिजाचे विना परमिट चोरटी वाहतूक केली जात आहे. तसेच खडकी धरण मशिदवाडी रस्त्यालगत या ठिकाणावरून विना परमिट , अवैधरित्या मुरूम व दगडाचे उत्खनन व वाहतूक केली जात आहे. महसूल विभाग कोमात व वाळू मुरूम दगड माफिया जोमात !!! गेल्या अनेक दिवसांपासून हे वाळू चोरीचे अभियान नियमीत व जोमात सुरू असूनही, येथे नियुक्त महसूल चे अधिकारी व कर्मचारी अर्थपूर्णरित्या कानाडोळा करीत आहेत. नियमितपणे व दररोज वाळू ,मुरुम व दगडाची विना परमिट व अवैधरित्या…
साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी येथील नगर पालिका प्रशासनाने मुलभूत सुविधाबाबत चालविलेल्या अक्षम्य दिरगाईचा “समतेचे निळे वादळ” या सामाजिक संघटनेच्या वतीने भरदिवसा दिवा दाखवून लक्ष वेधण्यात आले आहे. पाणीपुरवठा,साफसफाई,दिवाबत्ती आदी मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर पालिकेची असतांना या महत्त्वपूर्ण विषयाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. मलकापूर शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजना,न.प.फंड व अन्नाभाऊ नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत रेल्वे स्थानका जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ,तहसिल चौक,हनुमान चौक,गाडगे बाबांच्या पुतळ्याजवळ,बस स्थानकाजवळ,शहीद संजयसिंह राजपूत यांचे स्मारकाजवळ,गांधी चौक व पिलूतकीया आदी ठिकाणी हायमास्ट लँप मंजूर केले.शिवाजीनगर स्थित छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ नगर पालिका फंडातून तर शहीद अब्दूल हमिद चौक भिमनगर-रामदेवबाबा नगर प्रवेश द्वारावर…
बंडखोर आमदारांवर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात येत आहे. जयसिंगपूरमधील बंडखोर आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याविरुद्ध शिवसैनिक रसत्यावर उतरले आहेत. मात्र, नेमके त्याचवेळेस यड्रावकरांचे समर्थकही तिथे आल्यामुळे यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून आले. जयसिंगपूरमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे समर्थक त्यांना पाठिंबा देण्यासाठी यड्रावकरांच्या कार्यालयाबाहेर एकत्र आले होते. मात्र, शिवसैनिकही नेमके त्याच वेळेस मोर्चा घेऊन यड्रावकरांच्या कार्यालयाजवळ आले. यड्रावकर समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आल्यामुळे दोघांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर शिवसैनिक आणि पोलिसांमध्येही झटापट झाल्याचे दिसून आले. मंत्रिपद देऊनही तुम्ही बंडखोरी का केली ? असा प्रश्न शिवसैनिक यड्रावकरांना विचारत आहेत. तर यड्रावकर समर्थकांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी…
मुंबई : मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात या घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यासंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. राऊत यांना उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नसल्याचे ट्विट करत म्हटले आहे. मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान… महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे…