साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनीधी येथील चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस ‘ या विषयावर ऑनलाईन शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस या विषयावर तालुका विधी सेवा समिती , चाळीसगाव आणि वकील संघ चाळीसगाव तसेच व्हीजन क्लासेसचे संचालक प्रा.धनंजय पाटील यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिबीर घेण्यात आले. शिबीराची प्रस्तावना व सूत्रसंचालन तालुका वकील संघाच्या सचिव अॅड. माधुरी बी . एडके यांनी केली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंग केले यांनी मार्गदर्शन केले.…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी पुढे जाणाऱ्या कारने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील महिलेसह मुलगा जखमी झाल्याची घटना भुसावळ रोडवरील राष्ट्रीय महामार्गावरील कपूर पेट्रोल पंपाजवळ घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी की,मुक्ताईनगर तालुकयातील इच्छापूर येथील रहिवासी सुमाबाई लक्ष्मण बेलदार (वय-५०) ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार २७ जून रोजी सुमाबाई ह्या आपल्या मुलगा गोपाळसह दुचाकी (एमएच १९ सीएच २८३१) ने जळगावात आल्या होत्या. काम आटोपून पुन्हा जळगावून इच्छापूर येथे दुचाकीने जात होते. गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढे असलेल्या कपुर पेट्रोल पंपाजवळून दुपारी ३ वाजेच्या सुमारास जात असतांना त्यांच्या दुचाकीच्या पुढे (एमएच ०४…
साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी : संजय राऊत (Sanjay Raut) यांना आम्ही महत्त्व देत नाही. ते केवळ फिल्मी डायलॉग मारतात. सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून आमचाच विजय होईल, संपूर्ण ठाणे जिल्हा आमच्या पाठीशी आहे, असा विश्वास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी व्यक्त केला. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना (Shivsena) असून लवकरच नवीन सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला. सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. टेंभीनाका परिसरात शिंदे समर्थकांनी मोठी गर्दी केली. संजय राऊत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्यात. शिंदे समर्थक आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर गेलेत. शिंदे म्हणालेत की, आम्ही शक्तिप्रदर्शन करत…
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना संपवत आहेत, म्हणून पुन्हा भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी मागणी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. यात, बंडखोरांचा राष्ट्रवादीवर जास्त राग आहे. यासाठी काही घटनांचा दाखल दिला जातो आहे. शिवसेनेतील कोकणामधल्या असंतोषाबाबत आदित्य ठाकरे यांनी आदिती तटकरे यांचा घरी घेतलेला पाहुणचार कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सतत तनातणी सुरू होती. तटकरे गट – खासदार सुनील तटकरे आणि कन्या व जिल्ह्याच्या पालक मंत्री आदिती तटकरे हे शिवसेनेला त्रास देतात, अशी शिवसेनेच्या नेत्यांची तक्रार होती. आमदार भरत गोगावले ही तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाने (SC) ११ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहे. यावेळी त्यांच्यासोबत सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी सोबत आहे. फडणवीस दिल्लीतील वरीष्ठ नेते अमित शहांसह इतर नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदेही दिल्लीच्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे हे आठवड्याभरापासून गुवाहाटीमध्ये तळ ठोकून आहे. मात्र कालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आजपासून भाजपमध्ये वेगवान घडामोडी घडत आहेत. दिल्लीत भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक बोलावली…
साईमत लाईव्ह जामनेर प्रतिनिधी शहरातील सारस्वत समाज बांधवांनी सामाजीक व शैक्षणीक उपक्रमांसाठी खुल्या भुखंडाची मागणी नगरपालीकेकडे केली असुन मुख्याधीकारी चंद्रकांत भोसले यांना सोमवारी निवेदन दिले. समाजाच्या शिष्टमंडळाने या बाबत आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन व उपनगराध्यक्ष प्रा शरद पाटील यांची भेट घेऊन मागणी केली असता त्यांनी अनुकुलता दर्शवीली आहे. मुख्याधीकारी भोसले यांना निवेदन देतांना जगदीश शर्मा, राजु शर्मा, मोहन सारस्वत, कैलास शर्मा, महेंद्र शर्मा, निलेश शर्मा, जीतू शर्मा, एड.अनिल सारस्वत, मनोज शर्मा, अनिल शर्मा, रमेश शर्मा आदी उपस्थीत होते.
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून खाली पडून ३६ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, “अकोला तालुक्यातील चिखलगाव येथील दिनेश डोंगरे हा तरुण रेल्वेने प्रवास करीत होता. आज सोमवार, २७ जून रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास भादली ते भुसावळ स्टेशन दरम्यान, अपलाईनवरील खांबा क्रमांक ४३२/२८ दरम्यान, रेल्वेतून पडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्टेशनमास्टर यांनी नशिराबाद पोलिसांना देताच पोलीस कर्मचारी सुधीर विसपुते यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी जिल्हास्तरावरील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे आहे आदिवासी विभागात कोट्यावधी रुपयांचा निधी येत असतो जिल्ह्यात 34 अनुदानित आश्रम शाळा आहेत.गेल्या दिवाळीत आदिवासी विभागातून शासकीय स्तरातून जवळच्या तालुक्यातील प्रतिनिधींना देण्यासाठी 2 लाख 40 हजार रुपये गोळा करण्यात आले होते. ही जमा झालेली रक्कम जिल्ह्यातील एका ठिकाणचे सर्व प्रतिनिधी माझ्या खिशात आहे असे सांगून एका प्रतिनिधीने कोणत्याही प्रतिनिधीला न सांगता आपल्या सहकारी प्रतिनिधीच्या नावावर 1 लाख 40 हजार रुपये घेतले आणि ते कोणालाही वाटप केले नाही ती संपूर्ण रक्कम त्या प्रतिनिधीने एकट्याने पचविली.ही सर्व वस्तुस्थिती इतर कोणत्याही प्रतिनिधींना माहिती नाही (आणि इतर प्रतिनिधींना दोन वर्षापूर्वी मिळालेल्या गिफ्ट…
धुळे : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसोबत बंडखोरी करत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यांच्या बंडखोरीत आमदार, मंत्र्यांसह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले हे देखील सामील झाले. यामुळे येथील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत `दे दणका` मोर्चा काढून त्यांचा निषेध केला. तसेच या बंडखोरीमागे भाजपचा हात असल्याचा आरोप संतप्त शिवसैनिकांनी केला. या मोर्चादरम्यान ‘आले शंभर, गेले शंभर, उद्धव ठाकरे एक नंबर, अशा घोषणाही शिवसैनिकांनी केल्या आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ती मनोहर चित्रमंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चातून व्यक्त झाली. यात महिला शिवसैनिकांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.…