Author: Saimat

सोयगाव : साईमत लाईव्ह तालुका प्रतिनिधी जरंडी ता.सोयगाव येथील सोसायटी निवडणुकीच्या तेरा सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार ता.५ जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे आता जरंडीला राजकीय पडघम वाजू लागले असून सोयगावच्या राजकारणावर ठसा उमटवलेल्या जरंडी सोसायटीची निवडणुकीसाठी रस्सीखेच होणार आहे जरंडी सोसायटीसाठी १३ जागांसाठी ऑगस्ट क्रांती दिनी ता.९ ला मतदान होणार आहे त्यासाठी मंगळवारी ता.५ पासून निवडणुकी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.जरंडी सोसायटीच्या अंतिम मतदार यादीला १७ जून पासून प्रसिद्धी देण्यात येणार असून ता.५ जुलै ते ११ जुलै पर्यत मुदत आहे. उमेदवारांच्या यादीची प्रसिद्धी यास कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती सहकार अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली असून तारीख १२ जुलैला उमेदवारी…

Read More

एरंडोल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी शिवसेनेचे बंडखोर आमदार रातोरात सुरतला गेले. तेथून विमानाने गुवाहाटीला (आसाम) गेले. तेथील पंचतारांकित हॉटेल, जेवण, झाडी, डोंगर पाहून आपल्या मित्राला आमदार शहाजी बापू सांगतात की, काय मज्जा आहे, सर्वच झक्कास… काय हाटील, काय डोंगार, काय झाडी एकदम ओके…. हे वर्णन सोशल मीडियावर खूपच भाव खात असून बंडखोर आमदार शहाजी बापू रात्रीतून एकदम फेमस झाले आहेत. अनेक ठिकाणी भाषणांमधून देखील कोणाची टराटरा उडवायची असेल तर लगेच म्हणतात काय डोंगार…. एरंडोलला देखील असाच सुखद अनुभव पहिल्याच दिवशी कॉलेजला गेलेल्या तरूणाने कसं होतं कॉलेज… यावर बोलला की, काय चिखाल, काय घाण, काय कालीज, काय सां. बा. रस्ता एकदम…

Read More

यावल  : साईमत लाईव्ह प्रतिनिधी  हतनूर पाटबंधारे उपविभागातील यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाडळसे शाखा बंद आहे का असा प्रश्न संबंधित शेतकऱ्यांना पडला आहे. जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनूर पाटबंधारे उपविभाग यावल तालुक्यातील हतनुर धरण पाडळसे शाखा कार्यालयाची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता पाटबंधारे विभागाने पाडळसे शाखा बंद केली आहे का इत्यादी अनेक प्रश्न संबंधित शेतकरी आणि नागरिकांमध्ये उपस्थित केले जात आहे पाडळसे शाखा कार्यक्षेत्रात सिंचन क्षेत्रावर नियंत्रण कोणाचे? संबंधित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शाखा अभियंता शेतकऱ्यांना कुठे भेटतात याबाबतची चौकशी जळगाव पाटबंधारे कार्यकारी अभियंता यांनी करून पाडळसे शाखा तात्काळ सुरू करावी अशी मागणी परिसरातून…

Read More

यावल : साईमत लाईव्ह प्रतिनिधी  यावल तालुक्यातील आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही?असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालन कर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसापासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि इतर नागरिकांना गाई,म्हशी,शेळ्या,मेंढ्या,पाळीव कुत्रे इत्यादी प्राण्यांवर,पशुंवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे पशुवैद्यकीय डॉ.आणि कंपाउंडर, संबंधित…

Read More

साईमत लाइव्ह  मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मनाला जातो. ठाकरे यांना आडसूळ यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रता आडसूळ यांनी आपली खदखद व्यक्त केली. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसेच आजारपणात विचारपूसही न केल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. सिटी कोऑपरेटिव्ह कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यावेळी पक्षाने साधी विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील उद्धव ठाकरे पाठीशी उभे राहिले नाही.…

Read More

मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार ( Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाले आहेत. या सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्या जातील, असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी व्यक्त केला आहे. शिंदे गट(Shinde Govt) आणि भाजपचे सरकार सहा महिन्यातच कोसळणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी केले. मात्र सरकार कोसळणार असे सांगणे हे विरोधकाचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. तसेच शिंदे-फडणवीस यांची जोडी फेविकॉलपेक्षा मजबूत असल्याचेही ते म्हणाले. तसेच कडू यांनी मंत्रिपदाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. मंत्रीपदापेक्षा मतदार संघातील विकास…

Read More

नवी दिल्ली : देशभरातील, गावोगावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी पतसंस्था म्हणजेच विकास सोसायट्या (पीएसीएस) आता अजूनच बळकट होणार आहेत. या विकास सोसायट्यांना लवकरच पेट्रोल-डिझेल विक्री, रेशन दुकानेही चालवण्यासह बँकिंग व्यवहार आणि इतरही अनेक कामे करण्यास परवानगी दिली जाणार आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंत्रालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या ‘पीएसीएस मॉडेल उपविधी’ मसुद्यात हे नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारे आणि इतर भागधारकांकडून 19 जुलैपर्यंत त्यावर हरकती, सूचना मागवल्या आहेत. सध्या विकास सोसायट्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नियंत्रणाखाली गावागावांमध्ये शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचे मुख्य काम करतात. पीक कर्जाबरोबरच खते, बियाणे, शेतीची अवजारे यासाठीही सोसायट्या कर्जपुरवठा करतात. त्यांना व्यावयाभिमुख करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव :  तालुका प्रतिनिधी १५ जून ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान वनमहोत्सवानिमित वन परिक्षेत्र सोयगांव प्रादेशिक अंतर्गत निंबायती ता.सोयगाव येथे सहाय्यक वनसंरक्षक सिल्लोड श्रीमती पी.पी.पवार मॅडम तसेच सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मिसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव वनपरिक्षेत्र वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक एस.एस. हिरेकर, यांच्या उपस्थीतीत ग्रामपंचायत व मोतीमाता मंदिर परिसरात गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वनरक्षक एस.एस.हिरेकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना प्रत्येकाने वृक्षारोपण करावे व वृक्षांचे प्रमाण वाढवावे असे आवाहन करीत उपस्थितांना वृक्षांचे संगोपन व वनाचे महत्व समजावून सांगितले यावेळी निंबायती सरपंच विशाल गिरी,उपसरपंच सलमान तडवी, पोलीस पाटील मूलचंद राठोड,भागचंद चव्हाण,नारायण राठोड,मा.सरपंच राजू पाटील,पुनमचंद चव्हाण, करण पवार,…

Read More

जळगाव : साईमत लाईव्ह  तालुक्यातील नंदगाव येथील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सुटले असून गावातील गटारी ऐन पावसाळ्यात तुडुंब भरल्या आहेत.यामुळे गावात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच गावातील पथदिवेही मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी गावातील आबालवृद्धांना रहदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे गावकरी त्रस्त झाले असतानाच ग्रामपंचायत मात्र सदरच्या तक्रारींकडे कानाडोळा करून कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नसल्यामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशातच नंदगावमधील निम्म्याहून अधिक गटारी या तुडुंब भरून या गटारींतील घाणपाणी गावातील रस्त्यांवरून वाहत आहेत. या दुर्गंधीमुळे गावातील आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ऐन पावसाळ्यात या घाणपाणीमुळे गावात विविध प्रकारची रोगराई पसरण्याची शक्यता…

Read More

जळगाव : साईमत लाईव्ह  गत आठवड्यात जिल्हा भर गाजा वाजा झालेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील मोठ्या घोटाळ्याची खरी सूत्रधार हे दुसरे तिसरे कोणी नसून वरिष्ठ अधिकारीच आपल्या कनिष्ठांना आदेशित करून अभय देतांना समोर आलेत. पी एम पाटील नामक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात असलेले कर्मचाऱ्यांनी शासकीय कागदपत्रे खाजगी ठिकाणी नेवून आलेल्या शासकीय कामांची वाटप फक्त आणि फक्त आर्थिक धोरणावर करीत जवळपास प्रत्येक कामाचे १० टक्के इतपत रुपये घेऊन सरळ सरळ बाहेर कामे वाटप केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर जेव्हा सुशिक्षित बेरोजगारांनी ठिय्या आंदोलन केले तेव्हा नाममात्र काम देऊ चे आश्वासन देऊन त्या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. लेखी तक्रारींची दखल न घेत त्या…

Read More