पावसात भिजून सोयगावात पोलिसांचा रुटमार्च…आषाढी व बकरी ईदच्या निमित्ताने चोख बंदोबस्त…

0
2

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सोयगाव पोलीसांचा औरंगाबाद दंगा काबू पथकाद्वारे सोयगाव शहरांमध्ये पोलीसांचे पथसंंचालन करण्यात आले.यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दि.९ शनिवार रोजी जुना बाजार चौक,वाल्मीपुरा,बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पथसंंचलन करण्यात आले. हे पथसंंचालनाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित, ज्ञानेश्वर सरताळे,गणेश रोकडे, रवींद्र तायडे ,राजू बर्डे,सादिक तडवी, अजय कोळी, महिला पोलीस कर्मचारी कविता कांदे, पो.कॉ.म्हस्के, श्रीकांत घागरे, यांच्यासह होमगार्ड जवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here