पद्मश्री डॉ. व्ही.बी.कोलते इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये चढाओढ

0
3

साईमत लाईव्ह मलकापूर प्रतिनिधी

 स्थानिक लोकसेवा शिक्षण बहुद्देशीय मंडळाद्वारे संचालित पद्मश्री डॉ.व्ही.बी.कोलते कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मध्ये विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक व विद्यार्थी यांच्यामध्ये चढा ओढ निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. नुकतेच दहावी व बारावीच्या राज्य परिक्षा मंडळाचा निकाल जाहीर झाला.त्यामध्ये हे शिक्षण झाल्यावर निश्चितच नोकरी मिळत असते.त्यामुळे उत्साह दाखवीत प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
      नुकतेच यावर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये या महाविद्यालयाला एन.बी.ए.चे मानांकन मिळालेले आहे. सदर मानांकन हे ज्या संस्थांना प्राप्त होते.त्यांचे शिक्षण हे आंतर राष्ट्रीय व्यावसायिक कंपन्यांसाठी निगडीत असलेल्या कायद्यांना अनुसरून जे कॉलेज पात्र असेल त्यांना च दिले जात असते. ते या कॉलेजला मिळाले आहे.
 सन २०१० मध्ये सुरु झालेल्या या कॉलेज ने अत्यंत अल्प कालावधीत म्हणजे केवळ 10 वर्षांच्या आत प्राप्त केले. आज रोजी पश्चिम विदर्भ व पश्चिम खानदेशातून नामांकन मिळवणारी हि एकमेव संस्था आहे.या महाविद्यालयात तंत्र निकेतन सोबतच पदवी तथा पदव्युत्तर पदवी (मास्टर ऑफ इंजिनीरिंग)अर्थातच एम.ई. पर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.सोबतच मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अल्प संख्यांक वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर शासनातर्फे दिल्या जाणार्री शिष्यवृत्ती देऊन अगदी मोफत स्वरुपात शिक्षण दिले जाते. तसेच येथे शिकत असलेल्या ९० टक्के पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चांगल्या व नामांकित कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू ड्राईव राबवून नोकरीच्या संधी कॉलेज उपलब्ध करीत असतात. त्यामध्ये जॉन डीअर,पुणे,टाटा कंपनी, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, कमिन्स इंडिया पुणे, प्रिकॉल पुणे यांसारख्या सुप्रसिद्ध कंपन्यांचा सहभाग आहे.
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या अटीतटी च्या काळात सुद्धा येथील प्राध्यापक वर्गाने ऑन लाईन पध्दतीने क्लासेस घेऊन विद्यार्थ्यांना अभ्यासात मागे पडू दिले नाही.त्याचेच फळ म्हणून येथील एका विद्यार्थ्याला सॉफटवेअर कंपनी मध्ये २७ लाख रु.प्रती वर्ष या पगाराची नोकरी मिळाली.
कोलते महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी, मेकेनिकल अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, कॉम्पुटर सायन्स अभियांत्रिकी ई.शाखांमधील शिक्षण दिले जाते.विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळीच डिग्री वा डिप्लोमा पूर्ण पणे पास झाल्याबरोबर कमीत कमी पंधरा ते वीस हजार महिन्याची नोकरी देण्याची हमी दिली जाते.पण सोबतच विद्यार्थ्यांची जिद्द्द व मेहनत गरजेची असते. कारण कोणतेही यश हे जिद्द मेहनत चिकाटी या त्रीसुत्रीवरच अवलंबून असते.आजच्या स्पर्धेच्या युगांत कोणीही शिक्षण झाल्याझाल्याच नोकरीची हमी देत नाही.पण इंजिनीरिंग हि अशी शाखा आहे की जि नोकरीची १०० %हमी देते. असा ठाम विश्वास मोठ्या स्वाभिमानाने कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिल खर्चे सर यांनी व्यक्त केले. नुकत्याच राज्य परिक्षा मंडळाचे दहावी व बारावीच्या परिक्षाचे निकाल जाहीर करण्यात आले.यामुळेपॉलीटेक्निक,पदवी,च्या प्रवेशासाठी विद्यार्थी मोठ्या आशेने या संस्थेकडे प्रवेश मिळावा म्हणून आशावादी दृष्टीकोनांतून पाहत आहे. फक्त बुलढाणा जिल्हाच नव्हे तर आजूबाजूच्या जळगाव,अकोला, अमरावती, वाशीम,तथा नंदुरबार सारख्या दुरदुरच्या जिल्ह्यातून प्रवेशासाठी आस लावून बसले आहे. यामधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अगोदरच पद्मश्री डॉ.व्ही.भि.कोलते कॉलेज ऑफ इंजिनीरिंग,मलकापूर ला प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविली आहे. त्यामध्ये कु.कोमल रमाकांत राणे,रा.भालेगाव.(रण)९०.२०%) शिवानी प्रकाश सपकाळ रा.चाळीस बिघा,मलकापूर ९२% भूषण नरहरी निम्बोलकर रा.नरवेल ता.मलकापूर ९१.२०% कु.नेहा विजय पवार रा.शिवाजीनगर मलकापूर ९०.८० %कु.श्रुती राजेश करांडे रा.घानखेड ता.मलकापूर ९०.२० % कु.योगिता विजयराव देशमुख रा.कुलमखेल ८९.६० % कु.वैष्णवी अशोक वाघ मलकापूर ८९.२० % अंकित प्रभाकर शेजोळे रा.माकनेर ता मलकापूर ८८.00% बुद्धभूषण देविदास वले रा. मोताळा ८७.२०% कु.तनुजा रामराव देशमुख रा.शिव कॉलोनी मलकापूर ८६.00% यांसारखे बहुसंख्य गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रवेशास प्रथम क्रमांकाची पसंती दर्शविली आहे. व इतर विद्यार्थांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here