Author: Saimat

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रिम कोर्टामध्ये आज झालेल्या सुनावणीमध्ये शिवसेनेने व्हीप बजावलेल्या १६ बंडखोर आमदारांवर सुनावणी पूर्ण होईपर्यंत कुठलीही कारवाई करू नये, असे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तसेच, तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला असून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची स्थिती जैसे थे राहणार आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करणाऱ्या 16 आमदारांविरोधात शिवसेनेनं (Shivsena) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठापुढे सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी विनंती…

Read More

मुंबई : प्रतिनिधी साईमत लाईव्ह राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ४० आमदार असल्याने संख्याबळाअभावी शिवसेनेला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळू शकलेले नाही. त्यामुळे विधानसभेत सर्वात मोठा विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस समोर आल्याने विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची निवड करण्यात आली आहे. तर विधानसभापाठोपाठ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेला मिळण्याबाबत साशंकता आहे. अशातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार आहे. विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत. यामध्ये आमच्याकडे विधान परिषदेत सर्वाधिक १३ सदस्य आहे. त्यामुळे…

Read More

शेंदुर्णी : प्रतिनिधी साईमत लाईव्ह खानदेश चे प्रति पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या व भगवान श्री त्रिविक्रम महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या शेंदुर्णी एकादशीला लाखो भाविकांनी दोन वर्षानंतर भगवंताचे नयन मनोहर रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानिमित्ताने विविध संख्या, पतसंस्था ,नगरपंचायत,राष्ट्रीय, विद्यार्थी परिषद , सामाजिक राजकीय संस्था संघटना , नगरसेवक यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी फराळ चहा, दूध, केळी, वाटप करण्यात आले. सकाळी महापूजा व अभिषेक रात्री अकरा वाजता आमदार गिरीश महाजन, जामनेरच्या नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड, जिल्हा परिषदेच्या सदस्य सरोजिनीताई गरुड, पं दिनदयालाजी उपाध्यक्ष पत संस्थेचे चेअरमन अमृत खलसे, शेंदुर्णीच्या नगराध्यक्ष…

Read More

यावल : प्रतिनिधी साईमत लाईव्ह  येथील तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी तालुक्यातील सावखेडासिम येथील अजय आत्माराम पाटील यांची तर सचिवपदी अतुल निळकंठ यादव यांची येथील तालुका खरेदी विक्री संघाचे सभागृहात गुरुवारी झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली आहे.मराठा सेवा संघाच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. मुकेश येवले हे होते. येथील तालुका मराठा सेवा संघाच्या कार्यकारणीची निवड यासह विविध विषयावर येथील तालुका खरेदी विक्री संघाची सभागृहात,गुरुवारी सायंकाळी बैठक संपन्न झाली बैठकीत तालुकाध्यक्षपदी अजय पाटील तर सचिवपदी अतुल यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.अन्य कार्यकारणीत उपाध्यक्षपदी मोहराळे येथील धनराज जिजाबराव पाटील,के. यु.पाटील,बी.डी.पाटील,यांची तर कार्याध्यक्षपदी डी.बी.पाटील, सहसचिवपदी उंटावद येथील महेश पाटील,कोषाध्यक्षपदी दहिगावचे संदीप बाळकृष्ण पाटील,यावल…

Read More

उमाळे : साईमत लाईव्ह प्रतिनिधी श्रद्धेला मानवी एकात्मतेची गुंफण देणारी, परस्परांमधील आत्मीयता , आदर आणि बंधुभाव टिकवून ठेवणारी वारकरी संप्रदायाची परंपरा निरंतर सुरू राहावी , सर्वावरील कोरोनाचे सावट पूर्णपणे निघून जावे, ही मनोकामना ठेवत. आज आषाढी एकादशी निमित्ताने , माध्यमिक विद्यालय उमाळे ता.जि.जळगांव येथे , मुख्याध्यापक गणेश सोनवणे सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली , इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांस्कृतिक वेशभूषा परिधान करत लेझीम, पाऊली , विठ्ठलाच्या नामघोषासह दिंडी काढली, त्याप्रसंगी ग्रामपंचायत उमाळे येथील प्रथम नागरिक सौ. संगीता योगेश खडसे – सरपंच आणि श्री. योगेश खडसे यांच्या…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं चित्र आहे. यामुळे रस्तेही पाण्याखाली गेले आहे. अशात आता विसरवाडी गावाजवळील पुल पाण्याखाली गेल्याने नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. महामार्गावर तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या असून पावसामुळे वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. नवापूर तालुक्यात काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे. यामध्ये नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. अशात पावसाचा जोर वाढल्यामुळे नेसू, सरपणी, नागण नद्यांना पूर आला आहे. यामुळे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. संबंधित वाहतूक अजून काही तास खोडांबळण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या मार्गावरून वाहतूक वळवली असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगाव तालुक्यात 2 आमदार आणि 3 खासदार लाभलेले आहेत. तरीपण तालुक्याच्या विकास हा कासावापेक्षा हळू होत आहे. रस्ते म्हटलं म्हणजे एखाद्याच ठिकाणी रस्ता सापडावा असा. नाहीतर सगळीकडे फक्त गाराच गारा आणि चिखलाचे साम्राज्य. नुकतेच विद्यमान आमदार श्री उदयसिंह राजपूत यांनी मंजूर केलेला 5 कोटी रुपयांचा रस्ता सुद्धा राहिला तो कागदावरच. नागरिक आता बोलतात की,काय तो रस्ता,काय तो सोयगाव तालुका आणि काय ते लोकप्रतिनिधी. सगळं एकदम ok मध्ये आहे. सरकारी दवाखाना बघितला तर तिचं परिस्तिथी,पशुवैद्यकीय दवाखाना तर विचारूच नका. तिथे पत्ते खेळणाऱ्या गडींचाच डाव. आणि इतर सर्व सुविधा फक्त कागदोपत्री. लोकप्रतिनधींनी थोडंसं तर गावाच्या विकासावर भर…

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सोयगाव पोलीसांचा औरंगाबाद दंगा काबू पथकाद्वारे सोयगाव शहरांमध्ये पोलीसांचे पथसंंचालन करण्यात आले.यावेळी औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुदाम शिरसाट यांनी दि.९ शनिवार रोजी जुना बाजार चौक,वाल्मीपुरा,बस स्थानक,छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पथसंंचलन करण्यात आले. हे पथसंंचालनाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित, ज्ञानेश्वर सरताळे,गणेश रोकडे, रवींद्र तायडे ,राजू बर्डे,सादिक तडवी, अजय कोळी, महिला पोलीस कर्मचारी कविता कांदे, पो.कॉ.म्हस्के, श्रीकांत घागरे, यांच्यासह होमगार्ड जवान उपस्थित होते.

Read More

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी सोयगांव येथील कै. बाबुरावजी काळे स्कूल मध्ये “आषाढी एकादशी” निमित्त बालवारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी वारकऱ्यांच्या वेशात पोषाख परिधान करून आले होते त्याचप्रमाणे शाळेतील विद्यार्थी हा संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत आला असुन विद्यार्थ्यांनी टाळ, मृदंगाच्या चालीवर ठेका धरला व मुला – मुलींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला दिंडी ही शाळेच्या आवारातुन छ.शिवाजी महाराज चौक ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शिवाजी नगर येथे दिंडीची सांगता झाली.त्यातच विद्यार्थ्यांना फराळ पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती.या दिंडीत शाळेचे शिक्षक श्री ज्ञानेश्वर एलीस, एकनाथ कोलते, प्रणव कुलकर्णी मनिषा पाटील, शितल पगार, आशा पंडित, नम्रता…

Read More

साईमत लाईव्ह उमाळा प्रतिनिधी तालुक्यातील उमाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी  संगीता खडसे यांची बिनविरोध  निवड झाली. यासाठी उपसरपंच  सुरेश कंखरे, माजी सरपंच राजू  पाटील, सदस्य योगेश सोनवणे,  संदीप बिर्‍हाडे, राजेंद्र पाटील यांचे  सहकार्य लाभले. संगीता खडसे या राष्ट्रवादी युवकचे योगेश खडसे यांच्या पत्नी आहेत.या  निवडीबद्दल  त्यांच्यावर  अभिनंदनाचा वर्षाव होत  आहे.

Read More