मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची कोर्टात सुरू असलेल्या लढाईला आज यश आले. राज्यातील राजकारणात सध्या फारच तणावपूर्ण परिस्थिती असताना ओबीसी समाजासाठी एक चांगली बातमी मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसीं समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य केला असून दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील जनतेने जल्लोष केला. या मुद्द्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मत व्यक्त केले. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे मला समाधान मिळाल्याचे म्हटले आहे. ही श्रेय…
Author: Saimat
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने तालुक्यातील राजदेहरे येथील पुरातन ऐतिहासिक किल्ल्यावर रविवार दिनांक १७ जुलै रोजी दुर्गसंवर्धन मोहीम घेण्यात आली असून या मोहिमेत जवळपास 30 दुर्गसेवक दुर्गसेविकांनी सहभाग घेऊन किल्ल्यावरील दगड मातीच्या भरावाने बुजले गेलेले पुरातन पाण्याचे टाके सर्व दगड आणि माती काढून पुन्हा मोकळे करण्यात आले तसेच किल्ल्यावर असलेला प्लास्टिक कचरा जमा करून नष्ट करण्यात आला. या किल्ल्यावर पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या परवानगीने पुढील जे कामे करता येतील त्यासाठी संपूर्ण किल्ल्याची पाहणी करून नोंदी देखील घेण्यात आले आहेत लवकरच या किल्ल्यावर स्थानिक राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशन व सह्याद्री प्रतिष्ठानचे वतीने पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरातील मुख्य रस्ता त्यासह परिसरातील रस्त्याची गेल्या चार वर्षांपासून समस्या निर्माण झाली होती. यासाठी येथील नागरिकांनी इंद्रप्रस्थ नगर येथून मोर्चा काढून एस . के . ऑईल मिल जवळील मुख्य चौकात रस्ता रोको करून महापालिका प्रशासनाचा व नगरसेवकांचा निषेध नोंदविला. सविस्तर वृत्त असे कि शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन परिसरात रस्त्यात खड्डे कि खड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील नागिरकांनी नेहमी महापौर व आयुक्त याना निवेदन व त्याचा पाठपुरावा हि केला परंतु कुठलेही नियोजन मनपा प्रशासन करीत नसल्याने नागरिकांनी एकत्र येऊन हा रास्ता…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्रीच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिंदे हे एकटेच दिल्लीला गेले आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासोबत नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुढचे पाऊल नेमके काय असणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. खासदारांसोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेना खासदारांच्या बंडाबाबत आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आमदारांना फोडल्यानंतर आता ते खासदारांना आपल्या गटात सामील करण्याच्या तयारीत आहेत. सुप्रीम कोर्टात(SC) बुधवारी होणाऱ्या सत्ता संघर्षावरील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा हा दौरा असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदारसुद्धा बंड करण्याच्या तयारीत…
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे नुकताच झालेल्या बैठकीत जळगाव महानगराचे समाज सेवक तथा राष्ट्रवादी चे कार्यकर्ते ललित विजयराव नारखेडे यांची राष्टवादी चे सर्वे सर्वा मा .श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांशी अधीन राहून मा . युवक प्रदेश अध्यक्ष मा. महेबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र भैया पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या सोबत पक्ष संघटन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सर्वसामान्य युवकाच्या विकासात त्याच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी , लोकनेते एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या प्रेरणेने पक्षवाढी साठी ललित विजयराव नारखेडे यांची जळगाव महानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली…
साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून त्यांना स्वस्त धान्य मिळणे है अतिशय आवश्यक आहे.परंत् शासनाने स्वस्थ धान्य कपात करून गोरिगरीबावर उपासमारीची वेळ आणलेली आहे.त्या करिता शासनाने स्वस्त धान्य कपातीचे निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे यावल तहसीलदार यांना निवेदन देऊन केली. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील बेघर भूमिहीनांना तात्काळ ग्रामपंचायतीने रहिवास प्रयोजनार्थ जागा उपलब्ध करून किवा गोरगरीब गरजू कुटुंब ज्या जागी वास्तव्यास असतील त्या जागा नियमीत करून ग्रामपंचायत नमुना नं.8ला नोंद करण्यात यावी.आमच्या मागण्या या जनहिताच्या असून तात्काळ आपण मार्गी लावून गोरगरिवांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात…
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. आतापर्यंत अनेक नगरसेवक आणि नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिवसेनेचे (Shivsena) कट्टर समर्थक असणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांनीही पक्षाच्या नेते पदाचा राजीनामा दिला आहे. आपणपदाचा राजीनामा का दिला, याबाबत कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. रामदास कदम यांचे उद्धव ठाकरेंना पत्र : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) माझी शिवसेना नेते पदी नियुक्त केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पहायला मिळाले, असे म्हणत रामदास कदम यांनी पत्राच्या माध्यमातून आपली…
नागपूर : वृत्तसंस्था दोन वर्षे कोरोनामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले. काहींच्या नोकऱ्या गेल्या तर काहींनी घरी बसून काम केले. कोरोनामुळे जगभरात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. काहींच्या घरचे कमावते पुरुष कोरोनाने मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांची जगण्याची आशा संपली होती. कर्ता पुरुष गमावल्याने घरात लागणारा हातभार कमी झाला. काहींच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे व्यवसाय बुडाले तर काहींचे संसार उध्वस्त झाले. मात्र घडलेले सर्व मागे टाकून आता कुठे माणूस स्थिरावला आहे. जीवनाची गाडी दोन वर्षानंतर पुन्हा रुळावर आली आहे. पण त्यातही सरकारने महागाई वाढवून सामान्यांना संकटात टाकले आहे. वीजबिल असो किंवा ये-जा करणारे साधन, घरघुती वापराचे गॅस असो किंवा फोन मधला रिचार्ज सर्वांच्या किमती…