साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे नुकताच झालेल्या बैठकीत जळगाव महानगराचे समाज सेवक तथा राष्ट्रवादी चे कार्यकर्ते ललित विजयराव नारखेडे यांची राष्टवादी चे सर्वे सर्वा मा .श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांशी अधीन राहून मा . युवक प्रदेश अध्यक्ष मा. महेबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हा अध्यक्ष श्री. रवींद्र भैया पाटील यांच्या मागर्दर्शनाखाली शहर जिल्हा अध्यक्ष यांच्या सोबत पक्ष संघटन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून सर्वसामान्य युवकाच्या विकासात त्याच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी , लोकनेते एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या प्रेरणेने पक्षवाढी साठी ललित विजयराव नारखेडे यांची जळगाव महानगर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असे नियुक्ती पत्र नुकतेच लोकनेते मा एकनाथरावजी खडसे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
प्रसंगी महानगर जिल्ह्याध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी ,समवेत युवक महानगर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी ,,सुनील भैया माळी,व जळगाव जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्तित होते याप्रसंगी मा नाथाभाऊ यांनी शुभेच्छा दिल्या व प्रसंगी पक्ष वाढीसाठी ,महानगर संघटन वाढीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या.