बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा महाराष्ट्र सदनमध्ये बसविण्यासाठी मुख्यमंत्री करणार पंतप्रधान मोदींकडे मागणी

0
3

नवी दिल्ली: प्रतिनिधी 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray )यांचा पुतळा महाराष्ट्र सदनमध्ये तसेच तैलचित्र नवीन संसदेच्या इमारतीमध्ये लावण्यासाठी सर्व खासदारांनी मागणी केली आहे. त्यावर पंतप्रधान मोदींकडे (PM Modi)पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी सांगितले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते. त्यांनी शिंदे गटाच्या सर्व खासदारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे (Rahul Shewale)यांनी मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात उभारण्याची त्या निवेदनात मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच पंतप्रधानांना निवेदन देणार असल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यातून यूपीएससीच्या अभ्यासासाठी शेकडो विद्यार्थी दरवर्षी दिल्लीला येत असतात. या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा नसल्यामुळे त्यांची खूप गैरसोय होत असते. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी काही निर्देश दिले. जुन्या महाराष्ट्र सदनात १५० मुलांची राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या आरक्षित भुखंडावर ५०० ते ६०० मुलांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थांची राहण्याची सोय होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here