जळगाव : प्रतिनिधी
स्व. ॲड. सिताराम (बबन भाऊ )बाहेती यांचे जयंती निमित रोहन बाहेती आयोजित जळगाव जिल्हा कॅरम असो.च्या मान्यतेने व जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने 31 जुलै व 1 आगस्ट 2022 दरम्यान जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी व वयस्कर गटात होईल. कांताई हॉलमध्ये ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना तब्बल 10 हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज जळगाव कॅरम असोसिएशनच्या माध्यमद्वारा कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली नावे 29 जुलाई 2022 पर्यंत जिल्हा कॅरम संघटनेकडे नोंदवावीत असे आवाहन कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा व सरकार्यवाह नितिन बरडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंज़ूर खान 9970647868 व सय्यद मोहसिन 70206 73357, प्रमुख पंच गणेश लोडते 90113 49954 संपर्क साधावा. या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपदासाठी जिल्हा संघ निवड़ होणार आहे.