भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षातील सर्व इच्छुकांना मंत्रिमंडळात स्थान देता येणार नाही हे स्पष्ट केले. यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यात भाजपकडून धक्कातंत्राचा वापर करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातील 13 ते 14 जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याने भाजपमधील इच्छुकांना आापला नंबर लागणार की नाही, अशी धाकधूक आहे. शिवसेना – भाजप युतीच्या काळात कॅबिनेट आणि राज्यमंत्री म्हणून जवळपास 43 जणांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्या काळात मंत्रिपद भूषवलेले काही जण कुठल्या ना कुठल्या कारणाने आता पुन्हा मंत्रिपदावर दिसणार नाहीत. कसे बदलणार चित्र? 2014 ला भाजपचा मुख्यमंत्री असताना ज्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते,…
Author: Saimat
जळगाव : प्रतिनिधी स्व. ॲड. सिताराम (बबन भाऊ )बाहेती यांचे जयंती निमित रोहन बाहेती आयोजित जळगाव जिल्हा कॅरम असो.च्या मान्यतेने व जैन इरिगेशन यांच्या सहकार्याने 31 जुलै व 1 आगस्ट 2022 दरम्यान जिल्हा मानांकन व निवड कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी व वयस्कर गटात होईल. कांताई हॉलमध्ये ही स्पर्धा होणार असून विजेत्यांना तब्बल 10 हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज जळगाव कॅरम असोसिएशनच्या माध्यमद्वारा कॅरम असोसिएशनला संलग्न असलेल्या जिल्ह्यातील खेळाडूंनी आपली नावे 29 जुलाई 2022 पर्यंत जिल्हा कॅरम संघटनेकडे नोंदवावीत असे आवाहन कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेशाम कोगटा व सरकार्यवाह नितिन बरडे…
जळगाव : प्रतिनिधी रोटरी क्लब जळगाव स्टार्स व सुगोकी गृप पाळधीतर्फे वृक्षारोपण तसेच सहा हजार वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला. तालुक्यातील वराड बुद्रुक येथे 28 एकर जागेमध्ये सहा हजार वृक्ष लावण्याचा संकल्प आहे.त्याचे संगोपनसुद्धा क्लब व सुगोकी गृप करणार आहे.अध्यक्षस्थानी जिनल जैन हे होते. सागर मुंदडा, धनराज कासट, करण ललवाणी, विपुल पटेल, सचिन बलदवा, हर्षल कटारिया, जिगर पटेल, चिराग शहा, निमित कोठारी, निकुंज बियाणी, हर्षल देशमुख, आर्यन मणियार, आकाश पोद्दार, प्रकल्प प्रमुख पुनीत तलरेजा, मधुर झवर उपस्थित होते. या उपक्रमासाठी धनराज कासट यांनी सहकार्य केले.
पुणे : प्रतिनिधी इंदापूर तालुक्यात एक शिकाऊ विमान कोसळल्याची ( plane crashed )धक्कादायक घटना घडली आहे. कडबनवाडी येथे हे शिकाऊ विमान कोसळले आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या विमानात एक महिला पायलट प्रशिक्षण घेत होती. बारामतीतील विमानतळावरून सकाळी या विमानाने उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीत ‘कार्व्हर एव्हिएशन’ मार्फत महिला पायलट यांना प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले. ही घटना समजताच शेजारील पोंदकुले वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. या महिला पायलटला…
भुसावळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षणापासून कुणी वंचित राहू नये म्हणून वयोगट 6 ते 18 च्या शाळाबाह्य मुला मुलींचे सर्वेक्षण करून शाळाबाह्य आढळणाऱ्या मुला मुलींना वयानुरूप शाळेत दाखल करावे असे असताना शाळाबाह्य विद्यार्थी यांना शाळेच्या प्रवाहात आणले जाते परंतु पुन्हा एक-दोन वर्षात ते शाळाबाह्य होतात असे अनुभव येत असतो. मात्र यास अपवाद ठरत भुसावळच्या युक्ती चोरडिया या शाळाबाह्य विद्यार्थीनीने शिक्षण प्रवाह येऊन दहावीच्या परीक्षेत 75 टक्के गुण मिळवत गरुड भरारी भरारी घेतली आहे. दरम्यान , मिशन झिरो ड्रॉप उपक्रमाचे युक्ती चोरडिया जिल्ह्यातील रोल मॉडेल ठरू शकते अशी प्रतिक्रीया शिक्षण क्षेत्रात उमटत आहे. शिक्षण प्रवाहात विद्यार्थी निरंतर टिकला पाहिजे…
शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटाचा रस्ता धरला. काही दिवसांपूर्वी ते दिल्ली येथे गेले होते, तेथे त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यानंतर ते आता शिंदे गटात सामिल झाले आहेत. हा शिवसेनेला आणि जालना जिल्ह्यासाठी धक्का मानला जात आहे. दिल्लीतही शिंदेना भेटले? अर्जून खोतकर हे काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. खासदारांची बैठक ज्या दिवशी झाली त्याच दिवशी शिंदे यांची खोतकर यांनी महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली होती अशी मतदारसंघात चर्चा होती. त्यानंतर आता थेट तेच शिंदे गटात सामिल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्जून खोतकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जात होते. त्यांच्या…
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचे स्टार कपल अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री कैटरिना कैफ (Katrina Kaif)आणि विक्की कौशल, (Vicky Kaushal)या जोडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण, या लोकप्रिय जोडीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना ही धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सावधगिरी बाळगत या जोडीने सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणीची तक्रारही नोंदवली आहे. माहितीच्या बळावर सध्या या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्याबाबत अजून अद्याप काही माहिती झालेले नाही, अशी माहिती मिळते आहे.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ आज सकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये 10.15 वाजता घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश एन. व्ही. रामण्णा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. हे माझे सौभाग्य राष्ट्रपतीपदाची शपथ घेतल्यानंतर मुर्मू म्हणाल्या की, देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव येत्या काही दिवसांतच साजरा करणार आहे. देशाच्या राष्ट्रपती बनने माझे सौभाग्य आहे. देशाच्या जनतेचे मी आभार मानते. समाजाच्या प्रत्येक घटकासाठी मी काम करणार आहे. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, मी माझी जीवनयात्रा ओडिसातील भुमीतून सुरु केली. आदिवासी समाजातून असलेली मी भारताची राष्ट्रपती झाले. लोकशाहीची ही ताकद आहे की, आदिवासी समाजातील, एका छोट्या गावातील मुलगी देशाच्या राष्ट्रपतिपदी झाली. प्राथमिक…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी श्री संत मुक्ताबाई मंदिर जुने कोथळी येथील श्री सद्गुरु जोग महाराज मठ येथे हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगर च्या वतीने वन संवर्धन दिनाचे निमित्त तसेच डॉक्टर तेजांशू सरोदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तेजांशु सरोदे यांनी गेल्या वर्षभरापासून कलम केलेले घरी वाढवलेल्या वडाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळेला हॅप्पी माईंड फाउंडेशन मुक्ताईनगरचे सर्व सभासद श्री डिगंबर खर्चे प्राध्यापक सौ छाया खर्चे, डॉ प्रणिता सरोदे, डॉ मयुरी शुभम खर्चे, डॉ शुभम खर्चे, डॉ. सोपान पाटील मुक्ताई पॅथॉलॉजी लॅब, ज्येष्ठ श्रीमती सुशीला बाई पाटील चांगदेव,सौ शारदा वाल्मीक चव्हाण, श्री सचिन भाऊ खोसे तसेच वारकरी संप्रदायाचे श्री वाल्मीक महाराज उपस्थित होते